Home /News /heatlh /

covid19 : घर बसल्या तपासा फुप्फुसांची ताकद; जाणून घ्या सोपी पद्धत

covid19 : घर बसल्या तपासा फुप्फुसांची ताकद; जाणून घ्या सोपी पद्धत

डॉ. कुमार यांनी सांगितल्यानुसार घर बसल्या श्वास रोखून फुप्फुसांची ताकद तपासता येते. प्रत्येक covid-19 च्या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज नसते.

    नवी दिल्ली, 07 मे : Covid-19 ची दुसरी लाट (Corona second Wave) जितक्या वेगाने पसरत आहे तितकीच लोकांच्या मनातील भीती वाढत आहे. जर तुम्हाला कोरोना विषाणू संसर्ग (Corona Infection) झाल्याची लक्षणे जाणवत असतील तर स्वतःला विलगीकरण ठेवावे, असं मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. यासाठी RT-PCR चाचणीचा अहवाल येण्याची वाट पाहण्याची गरज नाही. जर तुमचा घसा खराब असेल किंवा सर्दी अंगदुखी, ताप येत असेल, डोके दुखत असेल किंवा जुलाब लागले असतील तर सावधानता बाळगण्यास सुरुवात करावी. मेदांता रुग्णालयातील डॉक्टर अरविंद कुमार यांनी 6 'M' ची काळजी घ्यावी, असे म्हटले आहे. असे केल्यामुळे तुम्ही covid-19 चा सामना करू शकता. एका न्यूज चॅनलशी संवाद साधताना डॉक्टर कुमार यांनी म्हटले आहे. या सहा उपायांद्वारे तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवून सोबतच स्वतःचा फिटनेस तपासू शकता. त्यांनी घरच्या घरीच फुप्फुसांची कार्यक्षमता तपासण्याची ही पद्धत सांगितली. 1. सर्वांमध्ये मिसळू नका - जर तुम्हाला कोरोना संसर्गाची लक्षणे दिसत असतील तर स्वतःला विलगीकरण ठेवा. संक्रमण थांबवण्यासाठी ही बाब खूप आवश्यक आहे. 2. COVID-19  औषधे घेण्यास सुरुवात करा - ताप असेल तर सहा-सहा तासांनी पॅरासिटामोल घेणे सुरू करावे, गरज पडल्यास चार चार तासांच्या अंतरानेही घेऊ शकता, जर डॉक्टरांनी व्हायरल किंवा अँटिबायोटिक औषधे दिली असतील तर ती सुद्धा घेऊ शकता. ताप नसेल तरी पॅरासिटॅमॉल घ्यायला हरकत नाही. डॉक्टर कुमार म्हणाले की, आतापर्यंत याचा परिणाम covid-19 वर होतो का? याचे पुरावे उपलब्ध नाहीत, आपल्या प्रिस्क्रिप्शनमधील कोणतीही औषधे इतरांना घेण्यास सांगू नये. प्रत्येक रुग्णावर वेगळे औषध परिणाम करते याबाबत तुमचे डॉक्टर अधिक चांगल्या रीतीने सांगू शकतील स्वतःच उपचार सुरु करू नयेत. हे वाचा - कोरोना नियमांना तिलांजली देत नागपुरात काढली लग्नाची वरात; 50 हजाराचा दंड 3. (Meals) वेळेवर जेवण घ्यावे - आजारी असताना व्यवस्थित जेवण करावे जेवण घेणे थांबवू नये. चांगला प्रोटीनयुक्त आहार घ्यावा. दररोज दोन अडीच लिटर पाणी प्यावे तसेच ताज्या फळांचा रसही घ्यावा, तेलकट पदार्थ खाऊ नयेत. 4.  (mindset) सकारात्मक मानसिकता ठेवावी. घाबरून जाऊ नये कारण 97  ते 98 टक्के रुग्ण पूर्ण बरे होतात. डॉक्टरांचा सल्ला तब्येतीवर लक्ष ठेवावे, प्रत्येक चार तासांनी ताप तपासावा आणि ऑक्सिजनची पातळी तपासत रहावी. 5. (Movement to hospital) रुग्णालयात जाणे - जर ताप 104 ते 105 फॅरेनहाइटपेक्षा जास्त असेल, छातीत दुखत असेल, प्रेशर आल्यासारखं वाटत असेल, धाप लागत असेल, एकसारखा खोकला येत असेल किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर तुम्हाला रुग्णालयात जाण्याची गरज असते. सकारात्मक राहून तुम्ही रुग्णालयात जावे. हे वाचा - VIDEO : तामिळनाडूला मिळाले नवे मुख्यमंत्री, शपथविधी कार्यक्रमात पत्नीला अश्रू अनावर अशी तपासा फुप्फुसांची ताकद - डॉ. कुमार यांनी सांगितल्यानुसार घर बसल्या श्वास रोखून फुप्फुसांची ताकद तपासता येते, यासाठी बसून मोठा श्वास घ्यावा आणि श्वास रोखून धरावा. तुम्ही रोखू शकता इतका वेळ श्वास रोखून धरावा प्रत्येक तासाला एक वेळा मोठा श्वास घेऊन श्वास रोखण्याचा प्रयत्न करावा. जर तुमचा श्वास रोखून धरण्याचा वेळ रोज दोन-तीन सेकंदांनी वाढत असेल आणि 25 ते 30 सेकंदांहून अधिक असेल तर तुमच्या फुफ्फुसांची फारशी समस्या नाही.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona updates, Coronavirus, Health

    पुढील बातम्या