मराठी बातम्या /बातम्या /heatlh /Home Remedies Digestion Problem : अगदी सोपे घरगुती उपाय करतील 'अ‍ॅसिडिटी'पासून सुटका? जाणून घ्या

Home Remedies Digestion Problem : अगदी सोपे घरगुती उपाय करतील 'अ‍ॅसिडिटी'पासून सुटका? जाणून घ्या

'अ‍ॅसिडिटी'पासून हवी आहे सुटका? मग ही बातमी वाचाच

'अ‍ॅसिडिटी'पासून हवी आहे सुटका? मग ही बातमी वाचाच

आजकाल धावपळीच्या काळात स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष न दिल्यामुळे अ‍ॅसिडिटी ही अनेकांसाठी मोठी समस्या बनली आहे.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 18 जानेवारी : आजकाल धावपळीच्या काळात स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष न दिल्यामुळे अ‍ॅसिडिटी ही अनेकांसाठी मोठी समस्या बनली आहे. सध्याच्या बिझी लाईफमध्ये खाण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. यामुळे अ‍ॅसिडिटी होणं सामान्य आहे. तुम्हीही अनेकदा अ‍ॅसिडिटीनं त्रस्त होत असाल, तर आज आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत, जे तुम्हाला अ‍ॅसिडिटीच्या त्रासापासून सुटका देण्यास नक्कीच मदत करतील. ‘झी न्यूज हिंदी’ने याबाबत वृत्त दिलंय.

  पोटामध्ये थोडी जरी गडबड झाली, तर अनेकांचा दिवस खराब जातो. त्यातही एखाद्याला अ‍ॅसिडिटी झाली, तर त्याला नीट जेवताही येत नाही. अ‍ॅसिडिटीमध्ये अनेकांना मळमळ होते. ज्यांना अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो, तेच त्याची वेदना समजू शकतात. खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अशा प्रकारची समस्या उद्भवू शकते. जर तुम्हाला अ‍ॅसिडिटीचा त्रास असेल, तर काही घरगुती उपाय करून तुम्ही अ‍ॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्यांपासून मुक्ती मिळवू शकतो. चला तर, हे उपाय नेमके कोणते आहेत, ते जाणून घेऊयात.

  हे ही वाचा : Pregnancy Tips : शरीरातील हे बदल सांगतात, तुम्ही सहज आई होऊ शकता की नाही

  तुळशीची पानं खा

  तुळशीमध्ये असलेले औषधी गुणधर्म पचनाशी संबंधित समस्या दूर करण्याचं काम करतात. तुळशीची पानं खाल्ल्यानं अ‍ॅसिडिटीची समस्या दूर होते. त्यामुळे पोटात थंडावा येतो. अ‍ॅसिडिटी झाल्यास तुळशीची पानं उकळून त्याचं पाणी प्यायल्यानं हा त्रास दूर होतो.

  गरम पाणी पिण्याचा फायदा

  थंड पाण्यामुळे अ‍ॅसिडिटीची समस्या वाढू शकते. या समस्येपासून मुक्ती मिळवायची असेल, तर जेवल्यानंतर काही वेळानं कोमट पाणी पिणं फायदेशीर ठरतं. त्यामुळे अन्न पचण्यास मदत होते, व अ‍ॅसिडिटीची समस्या दूर होण्यास मदत होते.

  ताक पिणं फायद्याचं

  अ‍ॅसिडिटीपासून झटपट आराम मिळवायचा असेल, तर ताक पिणं खूप फायदेशीर आहे. ताक पोटात थंडावा आणण्याचं काम करतं. जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्यानं अ‍ॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. अशावेळी ताक प्यायल्यानं आराम मिळतो. ताकामध्ये पुदिना मिसळून प्यायल्याने पचनक्रियेसाठी फायदा होतो.

  गूळ खाल्ल्यानं मिळतो आराम

  गुळामध्ये पोषक घटक असतात. हे पचनासाठी फायदेशीर आहेत. गूळ खाल्ल्यानं अ‍ॅसिडिटीमध्ये आराम मिळतो. यामध्ये मॅग्नेशियम आणि फायबर असतात, जे अन्न पचण्यास मदत करतात. गूळ खाल्ल्यानं अ‍ॅसिडिटी आणि गॅसची समस्या होत नाही.

  बदलत्या जीवनशैलीमुळे काही आजार माणसाच्या शरीरात कायमस्वरुपी घर करू लागले आहेत. अ‍ॅसिडिटी हा त्यापैकीच एक आजार आहे. या आजारानं सध्या अनेक लोकांना ग्रासलं आहे. पण काही घरगुती उपाय केल्यास या आजारापासून आराम मिळण्यास नक्कीच मदत होते.

  First published:

  Tags: Health, Health Tips