मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

त्वचेलाच नाही तर केसांनाही डिटॉक्सची गरज असते, जाणून घ्या हे 3 सोपे उपाय

त्वचेलाच नाही तर केसांनाही डिटॉक्सची गरज असते, जाणून घ्या हे 3 सोपे उपाय

केसांवर केल्या जाणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या हेअर केअर ट्रीटमेंटचा परिणाम अधिक प्रभावी व्हावा असे तुम्हाला वाटत असेल, तर त्यासाठी तुम्ही अधूनमधून केस डिटॉक्स करत राहणे गरजेचे आहे. हे काम तुम्ही घरी सहज करू शकता.

    नवी दिल्ली, 23 सप्टेंबर : केसांना चांगल्या प्रकारे डिटॉक्स करून तुम्ही त्यांना स्वच्छ आणि निरोगी ठेवू शकता. नेमके केस डिटॉक्स कसे करायचे? असा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, हे काम तुम्ही सोप्या घरगुती उपायांच्या मदतीने सहज करू शकता. केसांना डिटॉक्स केल्याने केसांची निगा राखण्याची रोजची दिनचर्या सोपी होते. असे केस डिटॉक्स करा - बेकिंग सोडा - एका भांड्यात एक कप बेकिंग सोडा आणि एक कप कोमट पाणी घ्या. आता केस ओले करा. बेकिंग सोडा आणि पाण्याचे हे मिश्रण केसांना चांगले लावा. आता केसांना हलक्या हाताने मसाज करा. 10 मिनिटांनंतर केस स्वच्छ पाण्याने धुवा आणि कंडिशनर लावा. कंडिशनरऐवजी तुम्ही मध वापरू शकता. तुम्ही हे आठवड्यातून एकदा करू शकता. यामुळे केसांमधील कोंडा आणि अतिरिक्त तेल स्वच्छ होते. हेे वाचा -मूळव्याधीवर रामबाण घरगुती उपाय; औषधांचीही गरज पडणार नाही सफरचंद सायडर व्हिनेगर - चार कप पाण्यात अर्धा कप सफरचंद सायडर व्हिनेगर घाला. शॅम्पू कंडिशनरच्या मदतीने केस स्वच्छ करा. यानंतर हे पाणी ओल्या केसांवर लावा आणि पुसून घ्या. केसांचे डिटॉक्सिफिकेशन होईल आणि त्यामुळे केसांमधील ऍसिडिक घटक सील करण्याचे काम होईल. यामुळे केस चमकदार आणि स्वच्छ राहतात. हे वाचा - तुम्ही तुमच्या तेलकट त्वचेला वैतागलात का? लगेच ट्राय करा 'हे' घरगुती उपाय काकडी आणि लिंबू हेअर डिटॉक्स - एक काकडी सोलून घ्या. आता एक मोठा लिंबू कापून घ्या आणि दोन्ही मिक्सरमध्ये बारीक करा. त्यात इसेन्शिअल तेलाचे काही थेंब घाला. हे मिश्रण शॅम्पूने वापरा आणि केस धुवा. यामध्ये असलेले सायट्रिक ऍसिड केसांना खोलवर स्वच्छ करते आणि स्कॅल्पला आराम देते. तुम्ही ते आठवड्यातून एकदा किंवा दोनदा वापरू शकता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या