हे वाचा - Meditation : कोरोना काळात तणावासह आजारांनाही दूर ठेवण्याचा सोपा मार्ग
ओवा आणि काळ मीठ (Carom seeds and black salt) - ओव्याची पूड करून अर्धा चमचा पूडमध्ये एक चतुर्थांश काळ मीठ मिसळावं आणि ते कोमट पाण्यात घ्यावं. याने अॅसिडीटी होण्यापासून आराम मिळतो. हे देखील सकाळच्या सेहरीच्या वेळी घेतल्याने अधिक आराम मिळतो. आवळा रस किंवा मुरंबा (Amla, gooseberry) - आवळा हा अॅसिडीटीवर उत्तम उपाय आहे. इफ्तारीच्या वेळी किंवा नंतर आवळा रस किंवा आवळा मुरंबा खाल्ल्याने अॅसिडीटीचं प्रमाण कमी होतं. याशिवाय सुकलेले आवळा म्हणजेच आवळा कँडी ही खाऊ शकता.हे वाचा - घरीच कोरोनावर उपचार घेताना शरीरातील Oxygen कमी झाल्यास नेमकं काय करावं? पाहा हा VIDEO
बडीशेप किंवा बडीशेप पाणी (fennel) - अॅसिडीटीसाठी बडीशेप किंवा बडिशेप पाणी देखील उपयुक्त ठरतं. इफ्तार झाल्यानंतर बडिशेप पाणी किंवा माउथ फ्रेशनर म्हणून बडीशेप खाऊ शकता. पाणी बनवण्यासाठी एक चमचा बडीशेपमध्ये एक ग्लास पाणी मिसळून हे पाणी उकळून घ्यावे, नंतर गाळून पाणी प्यावे. याने पचनास मदत होते.मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Lifestyle