Home /News /heatlh /

Health Benefits: जायफळचे औषधी गुणधर्म वाढवतील तुमचं सौंदर्य

Health Benefits: जायफळचे औषधी गुणधर्म वाढवतील तुमचं सौंदर्य

जायफळ तसं प्रकृतीला गरम आहे. जास्त वापराने त्रास होऊ शकतो. डोळ्यांची जळजळ, डोकेदुखी,चक्कर येणं, त्वचेवर लाल चट्टे येणं, तोंड सुकणं असे त्रास होऊ शकतात.

जायफळ तसं प्रकृतीला गरम आहे. जास्त वापराने त्रास होऊ शकतो. डोळ्यांची जळजळ, डोकेदुखी,चक्कर येणं, त्वचेवर लाल चट्टे येणं, तोंड सुकणं असे त्रास होऊ शकतात.

गोड पदार्थाची चव वाढवण्यासाठी किंवा मसाल्याच्या (Spices) पदर्थातही जायफळ वापरतात. जायफळ तेलाचाही वापर आयुर्वेदात (Ayurvedaa) केला जातो.

    दिल्ली 17 मे : आयुर्वेदात(Ayurvedaa) अशी अनेक गुणकारी औषधं (Curative Medicine) आहेत ज्यांच्या वापर अत्यंत सोपा असला तरी त्याच फायदे (Benifits) जास्त आहेत. काही पदार्थ तर, आपल्या घरातच सहजपणे मिळतात. अगदी मसाल्याच्या पदार्थांमध्ये वापरले जाणारे पदार्थही काही आजारांवर उपचारासाठी वापले जातात. काही पदार्थ थेट वापरता येतात. तर, काही पदार्थांवर प्रक्रिया करुन किंवा तेल (Oil) स्वरुपातही वारले जातात. जसं की जायफळ. मिरिस्टिका वृक्षच्या बी ला जायफळ असं म्हणतात. जायफळाचा वापर जेवणात करतात. गोड पदार्थाची चव वाढवण्यासाठी किंवा मसाल्याच्या (Spices) पदर्थातही वापरतात. जायफळ तेलाचाही वापर आयुर्वेदात केला जातो. हा एक इंडोनेशीयन पदार्थ आहे. (मोठी बातमी! उपचारासाठी, लसीकरणासाठी Aadhaar card अनिवार्य नाही,UIDAI कडून दिलासा) त्वचेसंबंधी समस्या असो वा आरोग्यासंबंधी, जायफळामध्ये तो प्रत्येक गुण आहे, जो या सर्व समस्यांचं समाधान आहे. जायफळात फायबर, थियामिन, व्हिटॅमीन बी 6, फॉलेट, कॉपर, मॅक्लिग्रॅन, मॅग्नेसिअम सारखे पोषक तत्व असतात. जायफळ तेल औषधांमध्ये आणि कॉस्मेटिकमध्ये वापरलं जातं. याला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. याचं तेल आरोग्याच्या बर्‍याच समस्यांवर मात करण्यात मदत करतं. ऍन्टीबॅक्टेरीयल अनेक वेळा जळ्याजवळ व्हायरस, बॅक्टेरीचा तोडांत चिकटून राहतात. जायफळ मध्ये ऍन्टीबॅक्टेरियल (Antibacterial) गुणधर्म असतात. त्याने तोंडाचा दुर्गंध कमी होतो. त्यामुळे याच्या तेलाचा वापर टुथपेस्टमध्ये केला जातो. जायफळात ऍन्टीइमफ्लामेंन्ट्री  (Anti-inflammatory)गुण असतात. पाण्यात काही थेंब टाकून गुळण्या केल्याने हिरड्याचा सुज कमी होते आणि दात दुखीही कमी होते. (Corona: राज्यात वाढत्या रुग्णसंख्येला ब्रेक मात्र मृत्यूदर चिंता वाढवणारा) मनस्वास्थ्यासाठी जायफळ तेल स्ट्रेस आणि ऍन्जायटीचा त्रास कमी करतं. जायफळ तेलाचा वापर आरोमा थेरिपीमध्ये केला जातो. त्याचा वापर डिफ्युजर मध्ये टाकून केला जातो. जेवणाची चव वाढवतं जायफळ तेलाचा वापर मसालेदार पदार्थ, मिठाई किंवा बेकरी प्रोडक्टमध्ये केला जातो. जायफळाने पदार्थाची चव वाढते. सांधेदुखीत उपयोगी सांध्याना सुज आलेली असेल तर, जायफळ तेल लावावं. जायफळ तेलाना सांध्यांची सुज कमा होते. जायफळ तेलात ऍन्टीइमफ्लामेंन्ट्री गुण असतात त्याने स्नायुंमधील तणाव कमी होऊन दुखणंही कमी होतं.   (वऱ्हाड्यांनी भररस्त्यात मारल्या बेडूकउड्या; पाहुण्यांची भलतीकडेच रवानगी) स्किन प्रॉब्लेम जायफळ तेल त्वचेच्या सौंदर्य वाढवतं. यात ऍन्टीऑक्सिडंटची मात्र भरपूर असते. त्यामुळे त्वचेसाठी उपयुक्त असतं. जायफळ तेलाचा वापर एसन्सेशिअल ऑईल मध्ये केला जातो. हे तेल आंघोळीच्या तेलातही वापरलं जातं. जायफळ तेलाने चेहऱ्यावरील सुरुकुत्या, चेहऱ्यावरील डाग आणि काळी वर्तूळं कमी होतात. जायफळ वापराने नुकसान कोणत्याही गोष्टीचा अतिवापर नुकसानदायक असतो. जायफळ तसं प्रकृतीला गरम आहे. त्यामुळे मर्यादित प्रणात न वापरल्यास विपरीत परिणाम दिसायला लागतात. त्यामुळे त्याचा वापर जपून करावा. जास्त वापराने त्रास होऊ शकतो. डोळ्यांची जळजळ, डोकेदुखी,चक्कर येणं, त्वचेवर लाल चट्टे येणं, तोंड सुकणं असे त्रास होऊ शकतात.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Beauty tips, Health Tips

    पुढील बातम्या