मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

नवरात्रीत 5 बळी, तुमच्यावरही मृत्यूचं संकट; शेवटचे 2 दिवस गरबा खेळताना सावधान!

नवरात्रीत 5 बळी, तुमच्यावरही मृत्यूचं संकट; शेवटचे 2 दिवस गरबा खेळताना सावधान!

गरबा खेळताना मृत्यू.

गरबा खेळताना मृत्यू.

नवरात्रीत गरबा खेळताना आतापर्यंत 5 तरुणांचा मृत्यू झाल्याची प्रकरणं समोर आली आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Priya Lad

मुंबई, 03 ऑक्टोबर :  गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या निर्बंधात साजरा होणारा नवरात्रोत्सव यंदा धुमधडाक्यात साजरा होत आहे. त्या दोन वर्षांची कसर बऱ्याच जणांनी यावर्षी भरून काढली. यंदा गरब्यातील उत्साह ओसांडून वाहत आहे. शेवटचा दिवस तर नेहमी गाजवलाच जातो. त्यामुळे तुमचाही असाच गरबा खेळण्याचा प्लॅन असेल तर सावध राहा. कारण नवरात्रोत्सवाचा असाच उत्साह तरुणांच्या जीवावर बेतला आहे. गरबा खेळताना तरुणांचा मृत्यू झाला. गरबा खेळता खेळता या तरुणांना हार्ट अटॅक आला आणि त्यांचा जीव गेला.

दहीहंडीदरम्यान उंचावरून पडून मृत्यू झाल्याच्या घटना तुम्हाला माहिती असतील. पण आता गरबा खेळतानाही मृत्यू झाल्याच्या घटना समोर आहेत.  नवरात्रीच्या उत्साहात काही तरुणांनी आपला जीव गमावला आहे.  सलग दरदिवशी गरब्यामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याची बातमी कानावर पडते आहे. महाराष्ट्रातच 4 आणि गुजरातमध्ये एक असे एकूण 5 बळी या नवरात्रीत गेले आहे.

हे वाचा - हृदयद्रावक! विरारमध्ये गरबा खेळताना युवकाचा मृत्यू, बातमी ऐकताच वडिलांनीही सोडला जीव

1) विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी येथे राहणारा मनीष नरपत जैन आपल्या बिल्डिंगच्या आवारात गरबा खेळत होता त्यावेळी त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला.

2) डोंबिवलीत राहणारा 27 वर्षीय ऋषभ लहरी मंगे भानुशाली मुलुंडमध्ये गरबा खेळायला गेला होता, तेव्हा त्याला हार्ट अटॅक आला.

3) वाशिममध्ये गोपाल इन्नानीला गरबा खेळताना हार्ट अटॅक आला.

4) तर वाशिमच्याच सुशील काळेला गरबा खेळून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी हार्ट अटॅक आला.

5) गुजरातच्या तारापूरमधील 21 वर्षीय वीरेंद्र सिंगचा गरबा खेळताना हार्ट अटॅक आल्याचा व्हिडीओही व्हायरल होतो आहे.

तारापूर येथे आदी शिवशक्ती सोसायटीमध्ये गरबा खेळत असताना एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.

#tarapur #graba pic.twitter.com/zeKgnwiuAh

— News18Lokmat (@News18lokmat) October 2, 2022

नवरात्रीच्या उत्साहात एकामागोमाग एक घडलेल्या या धक्कादायक घटना. त्यामुळे गरबा खेळताना तरुणांना येणारा हार्ट अटॅक हा चिंतेचा विषय झाला आहे.

First published:

Tags: Health, Lifestyle, Navratri