दिल्ली, 22 मे: उन्हाळा जसा वाढतो तशा अनेक समस्याही तोंड वर काढतात. त्वचा तेलकट होणं, केस गळणं, अंगावर पुरळ येणं आणि पायंची जळजळ होणं हे त्रास सुरु होतात. उन्हाळ्यात लोकांना तळपायाची जळजळ
(Burning soles) होण्याची समस्या असते. या जळजळीमुळे,चालता फिरताना, उभं राहताना पाय दुखतात किंवा पायात टोचल्यासारखं वाटायला लागतं. या जळजळीपासून सुटकेसाठी
(Get rid of burning) काही घरगुती उपाय
(Home Remedies) करता येता. चला जाणून घेऊया.
मीठाच्या पाण्याचा शेक
तळव्यांची जळजळ
(Burning soles) होत असेल तर, अर्धा बादली कोमट पाण्यात दोन चमचे रॉक सॉल्ट
(Rock solt) मिसळा. या पाण्यात 20 मिनीटं पाय ठेवा. नंतर कोरड्या फडक्याने पाय पुसून घ्या आणि मोहरीचे तेल लावा. सतत एक आठवडा हा उपाय करा. यामुळे आराम मिळेल.
मोहरीच्या तेलाने मॉलिश
पायांची जळजळ होत असेल तर, दररोज झोपायण्याआधी 5 मिनिटं मोहरीच्या तेलाने
(Mustard Oil) हलक्या हातांनी आपल्या तळांवर मॉलिश करा. त्याने पायांच्या जळजळीपासून मुक्तता मिळेल.
(हे वाचा- अभिनेत्रीला वाटत होती लग्नापूर्वीच गरोदर होण्याची भीती; केला धक्कादायक खुलासा)
दुधीचा किस
पायांची जळजळ होत असेल तर, आपण दुधीचा उपयोग करु शकतो. दुधी किसा किंवा मिक्सर मध्ये त्याचा बारीक लगदा करा. हा लगदा पायांच्या तळव्यांवर लावा आणि 5 मिनटं मॉलिश करा. यामुळे पायांची जळजळ थांबेल.
नारळाचं तेल
तळव्यांची जळजळ कमी करण्यासाठी, नारळ तेलाने
(Coconut oil) हलक्या हाताने 5 मिनिटं मॉलिश करा. मॉलिश मुळे जळजळ कमी होईल.
(हे वाचा- International Tea Day: चहाप्रेमींसाठी खास 5 प्रकारचे चहा,सर्दी-खोकल्यावर गुणकारी)
बर्फाचा शेक
उन्हाळ्यात तळपायांची जळजळ थांबवण्यासाठी बर्फाच्या बाटलीने पाय शेकवा. पण, ही बाटली प्लेन असायला हवी. अशा बाटतील पाणी भरुन ती डिप फ्रिजरमध्ये ठेवा. बर्फ झाल्यावर पायांखाली ठेवा. पाय हळूहळू मागेपुढे करा. दोन्ही पायांना अशा प्रकारे बर्फाचा शेक द्या. फायदा होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.