मराठी बातम्या /बातम्या /heatlh /सॅलड खाताना आवर्जून टाळा या चुका, नाहीतर हेल्दी फूडचा होईल भलताच परिणाम

सॅलड खाताना आवर्जून टाळा या चुका, नाहीतर हेल्दी फूडचा होईल भलताच परिणाम

कच्चा कांदा खाल्ल्याने रक्तातलं युरिक ऍसिडच कमी होत नाही तर, शरीराला अनेक फायदे मिळतात. त्यासाठी कच्च्या कांद्याचं सॅलड बनवू शकता किंवा रिकाम्या पोटी किंवा जेवणाबरोबर खाऊ शकता.

कच्चा कांदा खाल्ल्याने रक्तातलं युरिक ऍसिडच कमी होत नाही तर, शरीराला अनेक फायदे मिळतात. त्यासाठी कच्च्या कांद्याचं सॅलड बनवू शकता किंवा रिकाम्या पोटी किंवा जेवणाबरोबर खाऊ शकता.

सॅलड खाणं ही चांगली सवय आहे. मात्र सॅलड खाताना काही गोष्टी नक्की लक्षात ठेवल्या पाहिजेत.

मुंबई, 2 मार्च : शरीराला फिट ठेवण्यासाठी सॅलड खाणं नेहमीच आवश्यक असतं. कच्चं सॅलड खाल्ल्यानं शरीराला अनेक पोषकतत्व मिळतात. याच कारणाने बहुतांश लोक सॅलड खाण्यास प्राधान्य देतात. (benefits of eating salad)

तुम्हालाही जेवणात सॅलड खायचं असेल तर त्याबाबत काही गोष्टी माहीत असल्याच पाहिजेत. चुकीच्या पद्धतीमुळं शरीरावर होणारे वाईट परिणाम यातून रोखता येतील. सोबतच फिटनेसही राखला जाईल. सॅलड कधी आणि किती खाल्लं पाहिजे हे समजून घ्या. (things to avoid while eating salad)

आधीपासून कापू नका सॅलड

सॅलड जेव्हाही खाल, साधंच खा. अनेक लोक सॅलडवर मीठ टाकतात. हे टाळलं पाहिजे. या गोष्टीचंही ध्यान ठेवा, की सॅलड खाण्याआधी केवळ थोडावेळ आधी कापा. खूप आधीपासून कापलेलं सॅलड खाऊ नका. सॅलड उघड्यावरही नका ठेऊ. (how to eat a salad)

जेवणाआधी खा (when to eat a salad)

सॅलड खाल तेव्हा ते खाण्याच्या आधी खा. खाण्याच्या एक तास आधी तुम्ही सॅलड खाऊ शकता. सॅलडमधून तुम्हाला प्रथिनं, तंतुमय पदार्थ, जीवनसत्व मिळतात. यातून वजन कमी करण्यासही मदत होते. शिवाय भूक कमी लागते. वजनही नियंत्रणात राहतं. हेच जर तुम्ही जेवणासोबत सॅलड खाल तर पचनतंत्र आणि आतड्यांवर जास्त दाब पडतो. हे आरोग्यासाठी चांगलं नाही.

हेही वाचा मधूर चवीबरोबरच चिकू आरोग्यासाठीही फायदेशीर; जाणून घ्या चिकूचे आश्चर्यकारक फायदे

रात्री नका खाऊ (ideal method to eat salad)

तुम्ही फ्रूट सॅलड खात असाल तर रात्री ते टाळा. शिवाय जेवल्यावर लगेचचसुद्धा ते नका खाऊ. यातून तुमच्या तब्येतीला नुकसान होईल. हे तुम्ही दिवसा कुठल्याही वेळी खाल तर चालेल.

हेही वाचा हे काय भलतंच! बिअरमध्ये चितेची राख मिसळून पबबाहेरील नाल्यात अस्थी विसर्जन

सॅलड साधं असावं.

सॅलड जितकं साधं असेल तितकं चांगलं. साधं सॅलडच आवर्जून खा. यात क्रीम, विविध तेलं इत्यादी टाकू नका. शिवाय मीठ, चाट मसाला इत्यादी टाकणंही टाळा. यातून सॅलडमधली पोषकतत्व कमी होतात.

(Disclaimer - या लेखात दिलेली सगळी माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारलेल्या आहेत. news 18 Marathi याला दुजोरा देत नाही. याची अमलबजावणी करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

First published:

Tags: Fitness, Food, Health, Health Tips