मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

उन्हाळ्याच्या प्रत्येक समस्येवर रामबाण असं 'या' फळाचं एक ग्लास सरबत

उन्हाळ्याच्या प्रत्येक समस्येवर रामबाण असं 'या' फळाचं एक ग्लास सरबत

बेल फळाच्या गुणकारी फायद्यांविषयी आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे.

बेल फळाच्या गुणकारी फायद्यांविषयी आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे.

बेल फळाचे इतके फायदे तुम्हाला माहितीही नसतील.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 25 मे :  बेलाच्या झाडाची पानं पूजेसाठी वापरली जातात. तर बेलाच्या फुलांचाही उपयोग आपल्याला माहिती आहे. पानं आणि फुलांबरोबर बेलाच्या फळाचाही (Bael Fruit) उपयोग आहे. बेल फळाच्या गुणकारी फायद्यांविषयी आयुर्वेदात (Ayurveda) सांगण्यात आलं आहे. वरून टणक दिसणाऱ्या या फळात आतमध्ये गोड गर असतो. जो चवीला चांगला असतोच पण त्यासोबत आरोग्यासाठीही चांगला असतो. उन्हाळ्याच्या दिवसात बेलाचं सरबत करून प्यायल्याने पोटाला आराम मिळतो.

न्यूट्रिशनिस्ट (Nutritionist) आणि सेलिब्रेटी डायटेशियन ऋजुता दिवेकर (Celebrity Dietitian Rujuta Divekar) यांनी देखील बेल फळाच्या सरबताचं महत्त्व सांगितलेलं आहे. उन्हाळ्यात उष्णेताचा त्रास कमी व्हावा यासाठी बेल फळाचं सरबत प्यावं. असा सल्ला त्यांनी दिला आहे.

बेल फळामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी (Vitamin C) असतं.  प्रोटीन (Protein), बीटा-कॅरोटीन, थायमिन असे अनेक घटक असतात.  त्यामुळे इम्युनिटी (Immunity) वाढते. यात भरपूर फायबर (Fiber) आणि अँटिबॅक्टेरियल (Antibacterial) गुण असतात.

आता बेल सरबत कसं तयार करावं, हेसुद्धा ऋजुता दिवेकर यांनीआपल्या सोशल मीडिया (Social Media) पोस्टमधून सांगितलं आहे.  30 मिलीलीटर पाण्यात कडीपत्ता, जीरं आणि बेलफळाचा गर घालावा. आवडत असल्यास गूळ घालावा. दिवसातून दोन वेळा याचं सेवन करावं. यामुळे पोटाच्या, त्वचेच्या, केसांच्या समस्या संपतात. शिवाय स्ट्रेस हार्मोन कंट्रोल होऊन तणाव कमी होतो. अनेक आजार बरे होतात.

बेल फळाचं  सरबत प्यायल्याने होणारे फायदे

हायपरटेन्शनचा त्रास कमी होतो - बेलफळ हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी उपयोगी आहे. यातील पोटॅशियम (Potassium) हृदयाच्या धमन्या टणक होण्यापासून बचाव करतं. त्यामुळे हृदयाला स्ट्रोकचा धोका कमी होतो. हार्ट अॅटॅकचा (Heart Attack) धोका कमी होतो. हाय कोलेस्ट्रेलॉलला कंट्रोल करतं. यातील पोटॅशियम मूत्रामधून होणारं सोडियमचं अतिरिक्त विसर्जन थांबवतं.

(Almond Oil चे फायदे माहीत आहेत का? त्वचाच नाही तर आरोग्यही सुधारेल)

अँटिबॅक्टेरियल आणि अँटी एन्म्फ्लेमेट्री - बेलफळामध्ये अँटिबॅक्टेरियल  गुण असतात. त्यामुळे फंगल किंवा व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव होतो. तर यातील अँटी एन्म्फ्लेमेट्री (Anti-inflammatory) गुण हिस्टामाइनमुळे येणारी सुज कमी करतात. बेलफळात फ्लेवोनॉइड्स सारखे फायटोकेमिकल्सही असतात. तर, त्यातील अँटीऑक्सिडंट हृदय आणि लिव्हरच्या आजारापासून बचाव करतं.

पोटासाठी फायदेशीर - बेलफळात असंख्य पोषक तत्व असतात. यामध्ये व्हिटॅमीन ए, बी1, बी 2, सी, मिनरल, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि आयर्न असतं. पोटाचे आजार असतील तर बेलफळाचं सरबत त्यावर रामबाण इलाज आहे. त्यामुळे पचनाची समस्या दूर होते आणि गॅस्ट्रिक अल्सरही बरा होतो. पोटातील म्युकोसाचा स्तर बिघडला किंवा गॅस्ट्रिक अल्सरमध्ये ऑक्सिडेटीव्ह ताण वाढल्याने गॅस्ट्रिक अल्सरही होतो. बेलफळामधील फेनॉलिक गॅस्ट्रिक अल्सर कमी करून एँटी ऑक्सिडंट वाढवतं. त्यामुळे पचन व्यवस्था सुधारते.

(आरोग्यासाठी फायदेशीर आहे Broccoli, प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उत्तम!)

केसांना फायदा - बेलफळ पोट आणि हृदयाबरोबर केसांसाठीही फायदेशीर आहे. बेलफळामुळे केस गळती थांबते आणि केसांची वाढही चांगली होते. यातील अँटी मायक्रोबियल गुण स्कॅल्प आणि केसांच्या समस्येत इन्फेक्शनपासून लढतं. शरीरात ब्लड सर्क्युलेशन वाढल्याने केस वाढायला लागता, मजबूत होतात.

त्वचेला फायदा - बेलफळामध्ये पोटॅशिम भरपूर प्रमाणात असतं. रक्तातील वाईट घटक काढून रक्त साफ करण्याचं काम करतं. रक्त साफ झाल्याने त्वचेवर पुरळ येणं, खाज अश्या समस्या कमी होतात. यातील अँटी बॅक्टेरियल गुण त्वचेच संक्रमणापासून संरक्षण करतं. त्यामुळे नितळ त्वचा मिळवायची असेल तर, बेलफळाचं सरबत प्यावं.

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle, Tips