मुंबई, 19 मे : दूध
(Milk) आरोग्यासाठी
(Health) फायदेशीर आहे. ज्यांना दूध प्यायला आवडतं त्यांच्यासाठी दूध पिण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते. काही जण सकाळी उठल्यानंतर दूध पितात तर काही जण रात्री झोपण्यापूर्वी दूध पितात. पण सकाळी की रात्री दूध पिण्याची योग्य वेळ
(Right time to drink milk) कोणती, असा प्रश्न उपस्थित होतो.
अवेळी दूध पिणंही घातक ठरू शकतं. दूध सकाळी प्या किंवा रात्री प्या. जसे त्याचे फायदे आहेत, तसेच त्याचे नुकसानही आहे. दूध पिण्याची योग्य वेळ जाणून घेण्यापूर्वी आधी सकाळी आणि रात्री दूध पिण्याचे फायदे, नुकसान काय आहेत ते पाहुयात.
सकाळी दूध पिण्याचे फायदे
दुधात अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. त्यामुळे सकाळच्या वेळी घेतल्यास आरोग्याला फायदा होतो. यातील कॅल्शियम हाडं मजबूत बनवतात तर पोटॅशियम, फॉस्फोरस, मॅग्नेशियम, प्रोटीन, विटॅमिन्ससारखे गुण दिवसभर अॅक्टिव्ह राहण्यास मदत करतात.
सकाळी दूध पिण्याचे नुकसान
दूध पचायला जड असतं. त्यामुळे ज्यांची पचन क्षमता कमजोर आहे. त्यांना सकाळच्या वेळी दूध प्यायल्यास दिवसभर पोट जड वाटत राहतं. सकाळी दूध प्यायल्याने पोटदुखी आणि अपचनसारखे त्रास होऊ शकतात.
(
Explainer: म्युकरमायक्रोसिसबाबत कशी काळजी घ्याल? आरोग्यमंत्र्यांनी केलं सतर्क)
रात्री दूध पिण्याचे फायदे
रात्री दूध प्यायल्यास पोट भरलेलं वाटतं. त्यामुळे रात्रीच्या वेळी भूक लागत नाही. पोट भरलेलं राहिल्याने झोप शांत लागते. रात्री दूध घेण्याने मन आणि मसल्सही रिलॅक्स राहतात. त्यामुळे चांगली झोप लागते.
रात्री दूध पिण्याचे नुकसान
ज्यांना लॅक्टो इनटॉलरेन्सचा
(Lacto Intolerance) त्रास आहे. त्यांनी चुकूनही रात्री दुध पिऊ नये. त्यांना इन्सुलिनची
(Insulin) समस्या आहे. त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय रात्री दूध पिऊ नये. रात्री दूध प्यायल्यास इन्सुलिन वाढण्याची शक्यता असते.
(
Explainer : लशीचा पहिला डोस घेऊन कोरोना झाल्यास दुसरा डोस कधी घ्यावा?)
दूध पिण्याची योग्य वेळ
आयुर्वेदानुसार
(Ayurveda) दूध पिण्यासाठी रात्रीची वेळ योग्य असल्याचं सांगितलं जातं. दुधात स्लीप इंड्युसिंग
(Sleep induction) गुण असतात त्यामुळे दुध सकाळी पिण्यापेक्षा रात्री पिण्याचा सल्ला दिला जातो. मात्र विज्ञानाचा विचार करता यासंदर्भात कोणतंही संशोधन झालेलं नाही. त्यामुळे दूध केव्हा प्यावं हे प्रत्येकाच्या डायजेशन सिस्टीमवर अवलंबून असतं असं संशोधकांचं मत आहे.
हेल्थलाइन नुसार दूध नेमकं कधी प्यावं याचं योग्य रेकमेंडेशन सांगता येत नाही. मात्र ज्यांना वजन कमी करून मसल्स मजबूत करायचे आहेत. त्यांनी वर्काऊटनंतर दूध घ्यावं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.