मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

तुमच्या शरीरात दिसतात ही लक्षणं; असू शकते Vitamin C ची कमतरता

तुमच्या शरीरात दिसतात ही लक्षणं; असू शकते Vitamin C ची कमतरता

 कापलेली फळं उरली असतील तर, आपण त्यांना फ्रिजमध्ये ठेवून देतो. पण, प्रत्येक फळ ठराविक काळ टिकू शकतात. त्यानंतर त्यातील पोषक घटक संपू लागतात. त्यामुळे अगदी रात्रभर फ्रिजमध्ये राहिलेलं फळ खाऊ नयेत.

कापलेली फळं उरली असतील तर, आपण त्यांना फ्रिजमध्ये ठेवून देतो. पण, प्रत्येक फळ ठराविक काळ टिकू शकतात. त्यानंतर त्यातील पोषक घटक संपू लागतात. त्यामुळे अगदी रात्रभर फ्रिजमध्ये राहिलेलं फळ खाऊ नयेत.

Vitamin C Deficiency: शरीरात व्हिटॅमीन सीची कमतरता (Vitamin C Deficiency) असेल तर, त्याची लक्षणं (Symptoms) दिसायला लागतात. काही असे त्रास (Problem) होतात, ज्यामुळे शरीरात व्हिटॅमीन सी कमी असल्याचं जाणवतं.

    दिल्ली, 31 मे : शरीरासाठी इतर व्हिटॅमीन प्रमाणे व्हिटॅमीन सीचा (Vitamin C)योग्य पुरवठा देखील खूप महत्वाचा आहे. बर्‍याच वेळा आहारामधून (Foods)त्याचा पुरवठा शरीराला (Body) होतो, पण काही वाईट सवयीमुळे शरीरात त्याची कमतरता भासू लागते.हेल्‍थलाइन नुसार धूम्रपान(Smoking),मद्यपानाची(Drinking) सवय असेल आणि खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी(Bad habits of eating) किंवा कोणत्याही प्रकारचे मानसिक आजार  (Mental illness)असल्यास आपल्या शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता (Vitamin C deficiency) निर्माण होते आणि अशा परिस्थितीत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण व्हिटॅमिन सीच्या सप्लीमेंट घ्यायला हव्यात. सर्वसाधारणपणे पुरुषांना दररोज 90 मिलीग्राम व्हिटॅमिन सी आणि महिलांसाठी 75 मिलीग्राम व्हिटॅमिन सी आवश्यक असते. योग्या प्रमाणात न मिळाल्यामुळे बर्‍याच समस्या उद्भवू शकतात. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेची लक्षणं हीलिंग प्रोसेस स्‍लो त्वचेला कोलेजन तयार करण्यासाठी व्हिटॅमिन सी आवश्यक आहे. कोलेजन एक प्रकारचं प्रोटीन आहे, जे त्वचेच्या समस्या कमी करतं. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे,पांढऱ्या रक्तपेशी चांगल्याप्रकारे काम करत नाहीत,ज्यामुळे संक्रमणांशी लढण्याची ताकद कमी होते. अशा परिस्थितीत शरीराला कोणतीही इजा झाल्यास किंवा सूज आल्यास बरं वाटण्यासाठी बराच वेळ लागतो. (Alert! जुना फोन विकताना तो RESET करता का? लीक होऊ शकतो पर्सनल डेटा) हिरड्या आणि नाकामधून रक्तस्त्राव एका संशोधनात असं दिसून आलं आहे की, ज्यांना हिरड्यांमधून रक्तस्त्रावाचा त्रास असतो त्यांनी 2 आठवडे व्हिटॅमिन सी असलेली फळ खाल्ल्यास, त्यांचा त्रास कमी होऊ शकतो. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे नाकातून रक्तस्राव होण्यास सुरूवात होते. वजन वाढ वजन वाढण्याचा संबंध व्हिटॅमिन सीच्या कमतरतेशी असल्याचं एका संशोधनात आढळलं आहे. शरीरात व्हिटॅमिन सीची पुरेशी मात्रा असेल तर, चरबी उर्जेमध्ये रूपांतरित होते. पण, जर शरीरात व्हिटॅमिन सीची कमतरता असेल तर चरबी वाढायला लागते. निर्जीव त्वचाशरीरात व्हिटॅमिन सी नसल्यामुळेही त्वचा कोरडी,निर्जीव आणि प्रॉब्‍लमेटिक होऊ शकतो. व्हिटॅमिन सीमध्ये ऍन्टी-ऑक्सिडेंट असतात जे त्वचेला फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण देतात. (Gold Price Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा वाढ, पाहा लेटेस्ट गोल्ड रेट) थकवा येणं थकवा जाणवत असेल आणि चिडचिडेपणाने वाढला असेल तर, हे शरीरातील व्हिटॅमिन सीच्या कमतरतेचं लक्षण आहे. साइट्रिक फूड खायला सुरूवात केल्यास शरीरातील व्हिटॅमिन सीची कमतरता दूर होईल . प्रतिकारशक्ती कमी नेहमी खोकला,सर्दी,ताप,निमेनिया,मूत्राशयाचा संसर्ग असे त्रास असतील  तर, शरीरात व्हिटॅमिन सी नसण्याची हे लक्षण असू शकतं. नजर कमजोर होणं व्हिटॅमीन सीमध्ये ऍन्टीऑक्‍सीडंट असतात. ज्यामुळे डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं. दररोज व्हिटॅमीन सी घेतल्यास मोतीबिंदू सारखे आजार होण्याची शक्यता कमी होते. ( 'त्या' फोटोतील चेहरा का लपवला? इराफान पठाणच्या पत्नीनं सांगितलं कारण) सांधेदूखी बोन फॉरमेशनमध्ये व्हिटॅमीन सीची भूमिका महत्वाची असते. त्यामुळे व्हिटॅमीन सी कमी झाल्यास सांधेदुखी, हाडांची कमजोरी अशा समस्या व्हायला लागतात. कोणते पदार्थ खावेत पेरू, लिंबू,चेरी,लाल शिमला मिरची, कीवी, संत्र, स्ट्रॉबेरी, पपई, ब्रोकोली, पार्सली हे आहारात असावेत. व्हिटॅमीन सी शरीरात साठवलं जात नाही. त्यामुळे ते दररोज घ्यावं लागतं. शिवाय व्हिटॅमीन सी गरम झाल्यास त्यातील पोषत तत्व संपतात. त्यामुळे शक्यतो भाज्या, फळं कच्ची खावीत.  
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Lifestyle

    पुढील बातम्या