मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

कोशिंबीरमध्ये वापरा हे पदार्थ; वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर

कोशिंबीरमध्ये वापरा हे पदार्थ; वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर

कोशिंबीरमध्ये टोमॅटो जरुर टाका. त्यामुळे शरीरात ऊर्जा वाढते. याशिवाय वजन कमी करण्यास देखील मदत होते. टोमॅटोत फायबर असतं. जे निरोगी राहण्यासाठी खूप महत्वाचं आहे. टोमॅटो खाल्ल्याने बद्धकोष्ठता होत नाही.

कोशिंबीरमध्ये टोमॅटो जरुर टाका. त्यामुळे शरीरात ऊर्जा वाढते. याशिवाय वजन कमी करण्यास देखील मदत होते. टोमॅटोत फायबर असतं. जे निरोगी राहण्यासाठी खूप महत्वाचं आहे. टोमॅटो खाल्ल्याने बद्धकोष्ठता होत नाही.

चांगल्या आरोग्यासाठी सॅलड (Salad) खायला हवं. सॅलडमध्ये विविध प्रकारच्या भाज्या (Vegetables),फळं (Fruit) आणि मोड आलेली कडधान्य किंवा शेंगदाणे वापरता येतात.

  • Published by:  News18 Desk

दिल्ली, 31 मे : कच्चा भाज्या (Vegetable) किंवा फळ (Fruit) आरोग्यासाठी चांगले आहेत. तर, कोशिंबीरी (Salad) खाणं आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे. कोशिंबीरी बनविणं देखील खूप सोपं (Easy to make)असतं. यासाठी जास्त काही करण्याची आवश्यकता नसते आणि यात भरपूर पौष्टिक घटक (Nutrients) असतात. विविध प्रकारची फळं आणि भाज्या एकत्र करून सॅलड तयार केले जाऊ शकतात.

काही लोक आवड म्हणून कोशिंबीर खातात तर, काही लोक डायटिंगसाठी (Deiting) वापरतात. कोशिंबीर हा व्हिटॅमीन (Vitamins) आणि खनिजं (Minerals) घेण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. त्यामुळे आपल्या आहारात दररोज कोशिंबीरचा समावेश करा. यामुळे केवळ अन्नाची चवच वाढत नाही तर, बद्धकोष्ठता (Constipation) आणि अपचनाचा (Indigestion) त्रासही संपतो.

ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी नियमितपणे कोशिंबीर खावी. कोशिंबीर बनवताना त्यात बर्‍याच गोष्टीं टाकता येतात. अनेक प्रकारच्या भाज्या किंवा फळं एकत्र करून कोशिंबीर बनवता येते. काही लोक कोशिंबीरमध्ये स्प्राउट्स आणि शेंगदाणे देखील टाकतात.

(45 वर्षांनी लहान नवरा कसं करतो प्रेम? 81 वर्षांच्या आजींनी उलगडलं बेडरूम सिक्रेट)

काकडीत 90 टक्के पाणी असतं. याव्यतिरिक्त, व्हिटॅमिन ए, बी 1, बी 6, सी,लोह आणि पोटॅशियम देखील भरपूर प्रमाणात आढळतात. काकडी पोटाशी संबंधित अनेक समस्या देखील दूर करते. काकडीबरोबर सॅलडमध्ये कोणत्या गोष्टी टाकाव्यात ज्यामुळे शरीराचं पोषण होऊन आणि रोगांपासून दूर राहू शकतो हे पाहुयात.

गाजर

कोशिंबीरमध्ये गाजरांचा समावेश करावाच. कारण गाजरात बीटा केरोटीन नावाचं व्हिटॅमीन असतं. जे दृष्टीस चांगली करतं. याव्यतिरिक्त,त्यात ऍन्टिऑक्सिडंट देखील आढळतात,त्यामुळे मधुमेह आणि कर्करोगासारख्या आजारांपासून आपलं संरक्षण होत. गाजर खाल्ल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव होतो.

(केसांचं सौंदर्य वाढवणारी ब्राह्मी डायबेटिज रुग्णांसाठी खूपच फायदेशीर)

टोमॅटो

कोशिंबीरमध्ये टोमॅटो जरुर टाका. त्यामुळे शरीरात ऊर्जा वाढते. याशिवाय वजन कमी करण्यास देखील मदत होते. टोमॅटोत फायबर असतं. जे निरोगी राहण्यासाठी खूप महत्वाचं आहे. टोमॅटो खाल्ल्याने बद्धकोष्ठता होत नाही.

काकडी

उन्हाळ्याच्या दिवसात काकडी खाणं खूप फायदेशीर आहे. त्यात व्हिटॅमिन सी, ए,के,ल्युटन हे पौष्टिक पदार्थ असतात आणि भरपूर पाणी असतं. ज्यामुळे उन्हाळ्यात डिहायड्रेशनचा त्रास होत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात कोशिंबीरमध्ये काकडीचा समावेश नक्कीच करा.

(Strong Immunity साठी रिकाम्या पोटी खा 7 पदार्थ)

संत्र

भाज्यां व्यतिरिक्त,संत्रीही कोशिंबीरमध्ये टाकता येऊ शकते. दररोज कोशिंबीरीमध्ये 1 संत्र टाकू शकता. यात मोठ्या प्रमाणात पोषक घटक आहेत. याशिवाय फ्रुट सॅलमध्येही संत्र वापरता येतं.

First published:

Tags: Health Tips, Vegetables