मराठी बातम्या /बातम्या /heatlh /Health tips वेळीच घ्या माहिती, हे आहेत बोन कॅन्सरचे प्रकार, जाणून घ्या लक्षणं आणि कारणं

Health tips वेळीच घ्या माहिती, हे आहेत बोन कॅन्सरचे प्रकार, जाणून घ्या लक्षणं आणि कारणं

कॅन्सरच्या विविध प्रकारांबाबत जागरूक होऊन वेळीच उपचार घेण्यातच हित आहे.

कॅन्सरच्या विविध प्रकारांबाबत जागरूक होऊन वेळीच उपचार घेण्यातच हित आहे.

कॅन्सरच्या विविध प्रकारांबाबत जागरूक होऊन वेळीच उपचार घेण्यातच हित आहे.

मुंबई, 29 मार्च : कर्करोग हा जगातील सर्वात घातक आजारांपैकी एक आहे. कर्करोगामुळं दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. मात्र योग्य वेळी कॅन्सरचं निदान झाल्यास अनेकांचा जीव वाचवला जाऊ शकतो.  (health tips)

अर्थात दुदैवी गोष्ट ही, की बहुतांश प्रकरणांमध्ये कॅन्सरचा लवकर सुगावा लागत नाही. यामुळं कँसर त्यांच्यासाठी जीवघेणा सिद्ध होऊ शकतो. तसं तर कॅन्सर शरीराच्या कुठल्याही अवयवाला ग्रासू शकतो. मात्र हाडांच्या कॅन्सरबाबत अर्थात बोन कॅन्सरबाबत बोलायचं तर हा एक प्रकार आहे जो हाडांपासून सुरू होऊन सगळ्या शरीरात पसरतो.

जाणून घ्या बॉन कॅन्सरची लक्षणं आणि कारणं (bone cancer types)

बोन कॅन्सरचे प्रकार

बोन कॅन्सर मुख्यतः दोन प्रकारचा असतो. प्रायमरी (प्राथमिक) आणि सेकंडरी बोन कॅन्सर. प्रायमरी बोन कॅन्सर हाडांच्या कोशिकांमध्ये विकसित होतो. सेकंडरी बॉन कॅन्सर शरीराच्या कुठल्या तरी इतर भागात विकसित होऊन मग हाडांमध्ये शिरतो. कॅन्सरचे ऊतक बाहू आणि पायाची वरची हाडं, हिप बॉन, कण्याचं हाड इत्यादींमध्ये वेगानं पसरतात. (bone cancer symptoms)

हेही वाचा पुण्यात कोरोनाचा विस्फोट होत असतानाच अदार पूनावाला यांनी दिली GOOD NEWS

कारणं

अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या मते, बोन कॅन्सरची नेमकी कारणं अजून माहीत झालेली नाहीत. अर्थात अभ्यासकांचं म्हणणं आहे, की याचं कारण जेनेटिक असू शकतं. कुटुंबात कुणी बोन कॅन्सरनं पीडित असेल तर धोका वाढतो. (bone cancer causes)

लक्षणं

बोन कॅन्सर रिसर्च ट्रस्टच्या मते, बोन कॅन्सरची लक्षणं खालीलप्रमाणे असू शकतात (what is bone cancer)

- हाडांमध्ये वेदना

- या वेदना सतत होऊ शकतात. आणि रात्री अवस्था अजून वाईट होऊ शकते.

हेही वाचा Shocking Video! एक्सरसाइज करताना फाटले मसल; बॉडी बिल्डरची झाली भयंकर अवस्था

- हाडांमध्ये सूज

- अचानक एखादं हाड तुटणं

- थकवा, ताप

- अचानक वजन कमी होणं

First published:

Tags: Cancer, Health Tips