मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

दुर्लक्ष नको! लहान मुलांना सतत येणाऱ्या पुरळांमुळे होईल 'एक्झिमा', काय आहे हा प्रकार

दुर्लक्ष नको! लहान मुलांना सतत येणाऱ्या पुरळांमुळे होईल 'एक्झिमा', काय आहे हा प्रकार

Eczema in Children: बऱ्याच काळापासून लहान मुलांच्या (Children) शरीरावर पुरळ येत असतील. तर, त्याकडे अजिबात दुर्लक्ष (Ignore) करू नका. कारण तो एक्जिमाही(Eczema)असू शकतो.

  • Published by:  News18 Desk
दिल्ली, 31 मे : उन्हाळ्यात(Summer)लहान मुलांच्या शरीरावर (Children Body) बहुतेकदा पुरळ येतं. हवामानातला बदल(Climate change), अशक्तपणा, रोग प्रतिकारशक्ती कमी(Low Immunity)असणं, आयर्नची कमतरता(Iren Deficiency) आणि त्वचेवर केमिकल बेस्ड प्रोडक्ट्सचा जास्त वापर अशा अनेक कारणांनी पुरळ येतं. पुरळामुळे मुलांना वेदना होतात, जळजळ होणं, ताप येणं, सूज यासारख्या समस्याही होऊ शकतात. बऱ्याच वेळा यावर घरगुती उपचार (Home Remedies) केले जातात. पण, जास्त दिवस  पुरळ राहिलं तर, त्याकडे दुर्लक्ष करू नये. कारण तो एक्झिमा (Eczema)देखील असू शकतं. एक्जिमाची कारणं मुलांमध्ये एक्झिमाची (Eczema)अनेक कारणं असू शकतात. केमिकल बेस्ड क्रीम-पावडर,लोशन यासारख्या उत्पादनांचा बाळाच्या त्वचेवर वापर. साबणाची रिऍक्शन किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन, धूळ-माती किंवा घाण यांचा संपर्क किंवा सिंथेटीक कपडे घालण्यामुळेही ही समस्या उद्भवू शकते. एक्झिमाच्या (Eczema)त्रासामुळे कुणालाही ही समस्या उद्भवू शकते. (धुम्रपान करणाऱ्यांसाठी जास्त घातक आहे कोरोना, मृत्यूचा 50 टक्के अधिक धोका -) एक्जिमा कसा ओळखणार ? मुलाच्या गालावर,कोपरावर,गुडघ्यावर आणि पाठीवर लाल पुरळ दिसत असेल. पाय,मान आणि मनगटात वारंवार पुरळ उठत असेल. पुळ्यांमधून पू आणि रक्त येत असेल, पुरळ आलेल्या ठिकाणी सूज येऊन पुरळ शरीराच्या इतर भागातही पसरत असेल तर, त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांशी संपर्क साधावा. (Strong Immunity साठी रिकाम्या पोटी खा 7 पदार्थ) कशी घ्याल काळजी ? डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे औषधोपचार सुरु करावा. पण, काही कारणांमुळे बाळाला डॉक्टरकडे नेणं शक्य नसेल. तर, तोपर्यंत घरच्याघरी काही काळजी घेता येईल. साबणा न लानता बाळाला आंघोळ घाला. शॅम्पू आणि तेल यासारखे पदार्थ लावू नका. कॉटनच्या टॉवेलने हलक्या हातांनी शरीर पुसावं. शरीरावर लोशन,क्रिम आणि पावडर सारखं काहीही लावू नका. मुलाला कॉटनचे सैलसर कपडे घाला. लहान मुलांची नखं कापा. त्यांची खेळणी धुऊन साफ. त्यांचा बेड मऊ आणि कोरडा ठेवा.
First published:

Tags: Health Tips, Skin care, Small child

पुढील बातम्या