Home /News /heatlh /

Rheumatoid Arthritis: पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त त्रासदायक; काय आहेत लक्षणं आणि उपाय?

Rheumatoid Arthritis: पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त त्रासदायक; काय आहेत लक्षणं आणि उपाय?

चालण्याच्या प्रक्रियेत गुढघ्यांचं घर्षण होतं. रोजच्या चालण्यामुळे गुडघ्यांवर ताण येतो. अशावेळेस उलटं चालण्यामुळे गुडघ्याच्या आतील हाडांना सपोर्ट करणाऱ्या स्नायूंवरचा तणाव कमी होतो.

चालण्याच्या प्रक्रियेत गुढघ्यांचं घर्षण होतं. रोजच्या चालण्यामुळे गुडघ्यांवर ताण येतो. अशावेळेस उलटं चालण्यामुळे गुडघ्याच्या आतील हाडांना सपोर्ट करणाऱ्या स्नायूंवरचा तणाव कमी होतो.

काही आजार औषधं घेऊनही बरे होऊ शकत नाहीत. त्यातलाच एक आजार म्हणजे Rheumatoid Arthritis - याला काही लोक संधीवात असंही म्हणतात. स्त्रियांना का असतो अधिक धोका?

    दिल्ली ,19 मे : वयानुसार आपलं शरीर कमजोर होतं जातं. आजार सुरू झाले की, औषधं आणि पथ्य पाळायला लागल्यामुळे माणूस त्रासून जातो. पण, काही आजार औषधं घेऊनही बरे होऊ शकत नाहीत. त्यातलाच एक आजार म्हणजे ऱ्हुमेटॉइड आर्थ्रायटिस (Rheumatoid Arthritis). साध्यांशी संबंधीत आजार आहे. याला संधीवात असंही म्हणतात. वयाच्या तिशीपासून पन्नाशीपर्यंतच्या काळात या प्रकारचा संधीवात होऊ शकतो. ऱ्हुमेटॉइड आर्थ्रायटिस महिला (Women) आणि पुरुष (Men) दोघांनाही होणार आजार असला, तरी महिलांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे. महिलांमध्ये असलेल्या फिमेल हार्मोन्स मुळे महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त आहे. Rheumatoid Arthritis म्हणजे काय? ह्युमेटॉइड आर्थरायटिस हा सांध्यांना सूज येण्यासंबंधीचा आजार आहे. हा एक ऑटोइम्यून (Autoimmune) आजार आहे ज्यात आपली रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) शरीरातील स्वस्थ पेशींनाच नुकसान पोहोचवायल सुरुवात करते. या आजारात सांध्यांबरोबर संपूर्ण शरीर, त्वचा, डोळे, फुप्फुसं, हृदय आणि पेशींवर प्रभाव पडतो. ह्युमेटॉइड आर्थरायटिस मध्ये हाडांची झीज व्हायला लागते आणि त्यामुळे सांध्यांचा आकार बदलायला लगतो. त्यामुळे हातपायाची बोटं वळायला लागतात. सांधेदुखी, वेदना आणि जळजळ असा त्रासही सुरू होतो. Rheumatoid Arthritis ची लक्षणं एकाहून अधिक सांधे (Joints) आणि मसल्स (Mussels) मध्ये वेदना व्हायला सुरुवात होते. साध्यांमध्ये ताठरता, बाक आणि सूज येते. चालताना त्रास होतो. थकवा जाणवतो. कधीकधी बोटांवर गाठ तयार होऊन सूज येतं. वजन कमी व्हायला लागतं, तापही येतो. ह्युमेटॉइड आर्थरायटिस झालेल्या लोकांना सामान्य माणसाप्रमाणे आयुष्य जगणं कठीण होतं. ऱ्हुमेटॉइड आर्थ्रायटिसवर उपाय ऱ्हुमेटॉइड आर्थ्रायटिस आजाराची लक्षणं दिसत असतील तर, त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधा. लक्षणं सुरू झाल्यावर पहिल्या सहा महिन्यात निदान झाल्यास त्रास कमी करता येतो. व्यायाम ऱ्हुमेटॉइड आर्थ्रायटिसमध्ये नियमित व्यायाम करण्याने फरक पडतो. व्यायामाबरोबर रोज जॉगिंग, सायकलिंग, स्विमिंग देखील करु शकता. व्यायामामुळे स्नायूंमध्ये लवचिकता येते. वजन जास्त वजन असलेल्या लोकांना ऱ्हुमेटॉइड आर्थ्रायटिस होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे वजन कंट्रोलमध्ये ठेवावं.  ऱ्हुमेटॉइड आर्थ्रायटिस झालेल्या लोकांनी वजन कमी करण्याकडे लक्ष द्यावं. त्यासाठी आहाराकडे लक्ष द्यावं. मानसिक स्वास्थ हा आजार मानसिक स्वास्थ्याशीही निगडित आहे. तणाव आणि चिंता यामुळे या आजाराची जास्त लक्षणं जाणवतात. त्यामुळे मन शांत ठेवण्यासाठी प्रयत्न करा. चांगली पुस्तकं वाचा. चांगले विचार मनात आणण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे या आजाराची लक्षण कमी होतील.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips, Women

    पुढील बातम्या