Home /News /heatlh /

पोटाची चरबी कमी करण्यासाठी सोपा उपाय, फक्त करा Resistance Bandच्या सहाय्याने हा व्यायाम

पोटाची चरबी कमी करण्यासाठी सोपा उपाय, फक्त करा Resistance Bandच्या सहाय्याने हा व्यायाम

Resistance Band वापरुन घरच्या घरी कमी करा लठ्ठपणा, वाचा सोपे अन् घरगुती उपाय (Photo: Shutterstock)

Resistance Band वापरुन घरच्या घरी कमी करा लठ्ठपणा, वाचा सोपे अन् घरगुती उपाय (Photo: Shutterstock)

या बँडच्या मदतीने तुम्ही हे व्यायाम अगदी घरच्या घरी रोज करू शकता. या व्यायामांसाठी तुम्ही ऑनलाइन व्हिडीओचीही मदत घेऊ शकता.

    नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर : वाढलेलं वजन आणि मुख्यत: वाढलेलं पोट हे अनेकांच्या काळजीचं कारण असतं. पोट कमी करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. त्यातलाच एक उपाय म्हणजे रेझिस्टन्स बँड (Resistance Band). पोटावरची चरबी कमी करण्यासाठी रेझिस्टन्स बँडचा खूप उपयोग होऊ शकतो. कोरोनानंतर आयुष्य हळूहळू सुरळीत होत आहे. या काळात व्यायामाचं, आरोग्याचं महत्त्व सगळ्यांनाच पटलेलं आहे; पण अजूनही अनेक जण व्यायामासाठी (Exercise) जिमला जायचं टाळतात. मग घरातच स्ट्रेंग्थ ट्रेनिंग (Strength Training) वर्कआउट कसं करायचं असा प्रश्न अनेकांसमोर आहे. काळजी करू नका, घरी व्यायाम करूनही तुम्ही वेटलिफ्टिंग (Weight Lifting), स्ट्रेंग्थ ट्रेनिंगचं वर्कआउट करू शकता. त्यासाठी तुम्हाला या रेझिस्टन्स बँडची (Resistance Band) खूप मदत होऊ शकते. हा बँड रबराचा असतो आणि तुमचं वजन, ताकद आणि तुमच्या गरजेनुसार ते उपलब्ध आहेत. या बँडच्या साह्याने तुम्ही अनेक प्रकारचे व्यायाम करू शकता. पोटावरची वाढलेली चरबी या बँडमुळे कमी होतेच. त्याशिवाय शरीराच्या वेगवेगळ्या भागांच्या व्यायामासाठीही हे बँड उपयुक्त ठरतात. याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. इतकंच नाही, तर पायावरची चरबी कमी करण्यासाठीही या रेझिस्टन्स बँडचा चांगला उपयोग होतो. या रेझिस्टन्स बँडमुळे बॉडी टोन होते. त्याचबरोबर फॅट बर्न व्हायलाही मदत होते. आता आम्ही तुम्हाला पोटाची चरबी कमी करण्यासाठी काही एक्सरसाइज सांगणार आहोत. या बँडच्या मदतीने तुम्ही हे व्यायाम अगदी घरच्या घरी रोज करू शकता. या व्यायामांसाठी तुम्ही ऑनलाइन व्हिडीओचीही मदत घेऊ शकता. वाचा : एखाद्या व्यक्तीला वर्षभरात किती घाम येतो? उत्तर ऐकून तुम्हालाही घाम फुटेल फक्त या गोष्टींची आवश्यकता रेझिस्टन्स बँडच्या साह्याने एक्सरसाइज करण्यासाठी तुम्हाला आणखी खूप गोष्टींची आवश्यकता भासणार नाही. त्यासाठी फक्त योगा मॅट आणि हा बँड पुरेसा आहे. बँडची निवड करताना तो खूप हलका आणि तकलादू नाही ना हे अवश्य पाहा. डंकी किक - डंकी किक हा अत्यंत साधा सोपा व्यायाम प्रकार आहे; पण बँडच्या मदतीनं तुम्ही तो कठीण करू शकता. या व्यायामामुळे ग्लूट्स आणि हॅमस्ट्रिंगवर जोर पडतो. वाचा : तुमच्याही शरीरावर चामखिळी वाढल्यात का? घालवण्यासाठी हे घरगुती उपाय ठरतील उपयोगी लेग लिफ्ट्स - लेग लिफ्ट्समुळे तुमच्या मांड्यांच्या बाहेरच्या भागाला खूप मदत होते. या बँडच्या मदतीने जेव्हा तुम्ही हा व्यायाम करता, तेव्हा पूर्ण शरीराला याचा फायदा होतो. ब्रिज पोझ - ब्रिज पोझ हा तुमच्या नितंबाला टोन करण्यासाठी अत्यंत चांगला व्यायाम प्रकार आहे. पूर्ण पायाऐवजी या व्यायामामुळे ग्लूट मसल्स टोन होतात. हे सगळे व्यायाम तुम्ही एरव्हीही करत असाल, पण रेझिस्टन्स बँडच्या साह्याने ते करून बघा. त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल.
    First published:

    Tags: Health, Health Tips, Weight loss

    पुढील बातम्या