Home /News /heatlh /

दररोज करा फक्त एक योगासन; सायनस, मायग्रेनपासून देईल आराम

दररोज करा फक्त एक योगासन; सायनस, मायग्रेनपासून देईल आराम

या संशोधन अभ्यासाच्या सहलेखिका आणि दिल्ली ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स डिपार्टमेंट ऑफ न्यूरॉलॉजीमध्ये प्रोफेसर म्हणून काम पाहणाऱ्या डॉक्टर मंजिरी त्रिपाठी यांनी 1990 ते 2019 या काळात भारतामध्ये स्‍ट्रोक, अल्‍जाइमर, हेडऍक डिसऑर्डर, ब्रेन कॅन्सर जखम झाल्यानंतर होणारं मेडिकल डिसऑर्डर याची प्रकरणं वाढली असल्याचं सांगितलं आहे.

या संशोधन अभ्यासाच्या सहलेखिका आणि दिल्ली ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स डिपार्टमेंट ऑफ न्यूरॉलॉजीमध्ये प्रोफेसर म्हणून काम पाहणाऱ्या डॉक्टर मंजिरी त्रिपाठी यांनी 1990 ते 2019 या काळात भारतामध्ये स्‍ट्रोक, अल्‍जाइमर, हेडऍक डिसऑर्डर, ब्रेन कॅन्सर जखम झाल्यानंतर होणारं मेडिकल डिसऑर्डर याची प्रकरणं वाढली असल्याचं सांगितलं आहे.

दोन्ही प्रकारच्या डोकेदुखीपासून आराम देणार हे योगासन

    मुंबई, 25 मे :  नियमित व्यायाम (Exercise) आणि योगासनांनी (Yogasana) आपण आपलं आरोग्य चांगलं ठेवू शकतो. प्राचीन काळापासून योगाभ्यासाचं महत्त्व (Importance of Yoga) सर्वांना माहिती आहे. आताच्या बदलेल्या लाईफस्टाईलमध्ये (Lifestyle) तर स्वत:साठी थोडातरी वेळ काढून योगा करायला हवा. योगाने शरीर (Body) आतून सुदृढ राहतं.  त्यामुळे मन शांत राहण्यासाठी, चांगल्या आरोग्यासाठी, अनेक दुखणी बरी करण्यासाठी योगा करण्याचा सल्ला दिला जातो. डोकेदुखीचा (Headache) त्रास असलेल्यांनाही योगा केल्याने फायदा मिळू शकतो. मोबाईल (Mobile) किंवा कॉम्प्युटरवर (Computer) काम केल्यामुळे होणारी डोकेदुखी आता नेहमीची गोष्ट झालेली आहे. कधीकधी जास्त विचार केल्यानेही डोक्यावर ताण (Stress) येतो. डोकेदुखी झाल्यावर आपण गोळ्या औषधं (Medicine) घेतो. पण, त्यामुळे तात्पुरता आराम मिळतो. ओन्ली माय हेल्थनुसार, महाशीर्ष मुद्रा केल्याने या त्रासांमधून सुटका होते. (प्रेग्नंट, ब्रेस्टफिडिंग करणाऱ्या महिलांनाही मिळणार कोरोना लस; पण एक अट) महाशीर्ष मुद्रा (Mahashirsha Mudra) हा एक प्रकारचा योगाभ्यास आहे. महाशीर्ष मुद्रा केल्याने डोकेदुखीमध्ये आराम मिळतो. सायनस (Sinus) आणि मायग्रेन (Migraine) सारख्या आजारातही फायदा होतो. मणक्याच्या आजारातही फायदा होतो. मान दुखणे, पाठण दुखणे आणि कंबरेच्या दुखण्यातही आराम मिळतो. महाशीर्ष मुद्रा करण्याची योग्य पद्धत जाणून घेऊयात. महाशीर्ष मुद्रा कशी करावी? महाशीर्ष मुद्रा (Mahashirsha Mudra) करण्यासाठी सर्वात आधी एका जागेवर शांत बसा. आपले खांदे सैल सोडा. आता दोन्ही हाताचे अंगठे, मधले बोट आणि त्याच्या बाजूचं बोट यांना एकत्र जोडा. करंगळी, अनामिका आणि हात ताठ ठेवा. हळूहळू शांतपणे श्वासोच्छवास करत रहा. या पद्धतीने महाशीर्ष मुद्रेचा अभ्यास केल्यास फायदा मिळतो. ज्यांना सतत डोकेदुखीचा त्रास होत राहतो अशांनी नियमितपणे महाशीर्ष मुद्रा करावी. (Healthy Benefits :आळशीपणा द्या सोडून! सकाळी लवकर उठा; निरोगी राहाल) महाशीर्ष मुद्राचे फायदे मायग्रेनपासून आराम -  हल्लीच्या काळात मायग्रेन (Migraine) त्रास अनेकांना होऊ लागलेला आहे. मायग्रेनचा त्रास सुरू झाल्यास तीव्र डोकेदुखीमुळे कोणतंही काम करताय येत नाही. त्यामुळेच हा त्रास हाऊ नये यासाठी महाशीर्ष मुद्रा करावी. त्यामुळे मायग्रेनचा त्रास बरा होतो. यासाठी काही वेळ ध्यान करावं. त्यामुळे आपला श्वास, तोंड आणि त्याच्या जवळच्या नसा शांत होतात. त्यामुळे मायग्रेन लवकर बरा होतो. 5 ते 10 मिनिटं याच अवस्थेत बसल्याने तीव्र डोकेदुखीतही आराम मिळतो. डोळ्यांसाठी लाभदायक - आपण सगळेच जण आता स्मार्टफोन, कॉम्प्युटर यांचा वापर करतो. पण काळाच्या ओघात त्याचा वापर वाढलेला आहे. त्यामुळे सतत स्क्रिनकडे पाहत राहिल्याने डोळे कमजोर होतात. अशावेळी महाशीर्ष मुद्रा केल्याने डोळ्यांना तात्काळ फायदा होतो. काही वेळ डोळे बंद ठेवल्याने डोक्यातले अनेक विचार कमी होतात आणि डोळेही शांत होतात. शांत झोपही लागतं. तणाव होतो दूर - आजच्या धावपळीच्या काळात ताण येणं नॉर्मल झालेलं आहे. त्यामुळेच आपलं नुकसानही होतं. भारतात 10 व्यक्तीमध्ये 7 जणांना तणावाची समस्या असल्याचं एका संशोधनात पुढे आलेलं आहे. त्यामुळे स्ट्रेसपासून सुटका होण्यासाठी महाशीर्ष मुद्रा काही मिनटं करावी. त्याने आपलं मानसिक आणि शारीरिक त्रास थांबतात. मन शांत आणि प्रसन्न होतं. (कोरोना की आणखी काही; Mucormycosis रुग्ण वाढण्यामागे नेमकं काय आहे कारण?) सायनसच्या त्रासात फायदेशीर - सायनसचा त्रास बरा करण्यासाठी महाशीर्ष मुद्रा फायदेशीर आहे. सायनसच्या आजारात नाकाला गंभीर स्वरुपात संक्रमण झालेलं असतं. सायनसमध्ये नाकाच्या आजूबाजूच्या भागातील छोट्याछोट्या पोकळ्यांमध्ये सूज येते. महाशीर्ष मुद्रेने सायनसच्या आजारात आराम मिळतो आणि सायनसमुळे होणारी डोकेदुखी थांबते. सायनसचा त्रास असणाऱ्यांनी दररोज महाशीर्ष मुद्रा करावी.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips, Lifestyle, Mental health

    पुढील बातम्या