नवी दिल्ली, 10 मार्च : रात्रीची शांत झोप दिवसभर आलेला थकवा दूर करते आणि आपल्याला पुढील दिवसासाठी भरपूर ऊर्जा आणि उत्साह देते. जर आपल्याला रात्री झोप (night Sleep) आली नाही, तर रात्र घालवणे जड होते आणि सकाळ होण्याची वाट बघून आपण थकून जातो. आपल्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी झोप खूप महत्वाची आहे. 7-8 तासांची चांगली झोप आपले मन ताजे आणि शरीर तंदुरुस्त ठेवते. पण बदलत्या काळात लोकांना मोबाईलची इतकी सवय झाली आहे, ज्यावर ते मध्यरात्रीपर्यंत व्यग्र राहतात आणि त्यांची तक्रार असते की आम्हाला लवकर झोप येत नाही.
जर तुम्हाला रात्री झोप येत नसेल तर तुमची जीवनशैली आणि तुमचा आहार याला जबाबदार आहे. जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी चहा, कॉफीचे सेवन करत असाल तर ते बंद केले पाहिजे. आहारात निरोगी गोष्टींचा समावेश करा ज्यामुळे तुम्हाला रात्री शांत झोप लागण्यास मदत होईल. रात्री शांत झोप घेण्यासाठी कोणत्या गोष्टींचे सेवन करावे ते जाणून घेऊया.
चांगल्या झोपेसाठी या गोष्टी खा
बदामाचे दूध प्या :
रात्री झोपण्यापूर्वी बदामाचे दूध प्या, तुम्हाला चांगली झोप मिळेल. बदामाचे दूध कॅल्शियमचे उत्कृष्ट स्त्रोत आहे, जे मेंदूला मेलाटोनिन तयार करण्यास मदत करते. मेलाटोनिन हा हार्मोन आहे जो झोपेच्या चक्राचे नियमन करण्यास मदत करतो.
अश्वगंधाचे सेवन करा:
जर तुम्ही झोप न येण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर अश्वगंधा घ्या. औषधी गुणांनी समृद्ध असे अनेक घटक अश्वगंधामध्ये आढळतात. ज्यामुळे तणाव आणि झोप न येण्याच्या समस्येवर मात करण्यास मदत मिळते.
हे वाचा -
कोणतंही ऑपरेशन झाल्यानंतर या 4 गोष्टींची काळजी घ्यायला हवी; लवकर रिकव्हर होतं
पुदीना वापरा :
जर तुम्हाला झोप न येण्याची समस्या असेल तर रात्री झोपताना पुदीनाचा रस पाण्यात मिसळून प्या, तुम्हाला चांगली झोप येईल तसेच पचनही ठीक होईल.
हे वाचा -
डिजिटल मल्टीटास्किंग मुलाच्या मानसिक आरोग्यासाठी घातक - नवेे संधोधन
मध आणि केळीचे सेवन करा:
रात्री झोपताना एक चमचा मध घ्या. तसेच, मध्यभागी एक केळी कापून त्यात एक चमचा जिरे शिंपडा. रात्री नियमितपणे या गोष्टींचे सेवन केल्यास तुम्हाला चांगली झोप मिळेल.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. हे उपाय लागू करण्यापूर्वी कृपया संबंधित तज्ज्ञांशी संपर्क साधा.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.