मराठी बातम्या /बातम्या /heatlh /औषध म्हणून Steroid घेत आहात? या चुका टाळा; अचानक वाढेल वजन

औषध म्हणून Steroid घेत आहात? या चुका टाळा; अचानक वाढेल वजन

कोरोना पेशंटला स्टेरॉईड  दिलं जात असेल तर, जास्त काळजी घ्यायला हवी.

कोरोना पेशंटला स्टेरॉईड दिलं जात असेल तर, जास्त काळजी घ्यायला हवी.

स्टेरॉईड (Steroid) घेताना केलेली छोटीशी चूकही गंभीर परिणाम (Bad Effect) होऊ शकतो. स्टेरॉईड घेताना या गोष्टी लक्षात ठेवा.

दिल्ली , 5 जून : कोरोना काळामध्ये स्टेरॉईडचा (Steroid) वापर औषधं म्हणून केला जातोय. स्टेरॉईड म्हणजे नेमकं काय? हे आता सगळ्यांनाच माहिती झालेलं आहे. कोरोना (Corona) बरा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्टेरॉईडमुळे म्युकोमोरायसिस म्हणजेच ब्लॅक फंगस (Black Fungus) वाढतोय असं तज्ञांचं मत आहे. ज्या लोकांमध्ये ऑक्सिजन लेव्हल (Oxygen Level) कमी व्हायला लागते. अशा लोकांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये (Second Wave of Corona) उपचार म्हणून स्टेरॉईड वापरला जात आहे. स्टेरॉईड वापरामुळे कोरोनासारख्या आजारांमध्ये उपचार होत असली तरी स्टेरॉईड घेताना त्याचं योग्य प्रमाण, वेळ याचीही काळजी घ्यायला हवी. याशिवाय स्टेरॉईड घेताना केलेली छोटीशी चूकही गंभीर परिणाम (Bad Effect) होऊ शकतो. स्टेरॉईड घेताना या गोष्टी लक्षात ठेवा.

स्टेरॉईडचं प्रमाण आणि कालावधी निश्चित करा

तज्ज्ञांच्या मते योग्य परिणामासाठी स्टेरॉईड घेण्याचा कालावधी आणि प्रमाण योग्य असायला हवं. कोरोना रुग्णांमध्ये स्टेरॉईड केव्हा द्यायचं हे डॉक्टर निश्चित करतात. मात्र, कोरोना झाल्यावर सुरुवातीच्या दिवसांमध्ये स्टेरॉईड दिल्याने कोरोना व्हायरस जास्त काळ शरीरांमध्ये राहतो. त्यामुळे रुग्णाला फायद्याऐवजी नुकसान होतं. याशिवाय अतिरिक्त सेवन केल्यामुळे फंगल इन्फेक्शनची भीती वाढते.

(PAN-Aadhaar घरबसल्या करा लिंक; असं तपासा तुमचं Linking Status)

अचानक औषध बंद करू नका

स्टेरॉईड घेताना जशी काळजी घ्यावी लागते तसंच, स्टेरॉईड बंद करतानाही खबरदारी घ्यावी. स्टेरॉईड बंद करताना त्याचं प्रमाण हळूहळू कमी करून बंद करावं लागतं.  डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्टेरॉईड अचानक बंद केल्यास दुष्परिणाम होतात.

डायबिटीस रुग्णांवर परिणाम

डायबिटीजच्या रुग्णांना कोरोना इन्फेक्शनमध्ये स्टेरॉईड घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असेल तर अशा वेळेस नियमितपणे ब्लड शुगर लेवल तपासायला हवी. या शिवाय वेळोवेळी डॉक्टरांच्या संपर्कात रहा. शरीरामध्ये ब्लड शुगर वाढली तर, डायबेटिसच्या रूग्णांमध्ये रक्तातली साखरेची पातळी वाढण्याची भीती जास्त असते.

(या कंपनीच्या शेअर्सनी दिले आठवड्याभरात 100 टक्के रिटर्न्स; फक्त 50 रुपये किंमत)

स्टेरॉईडचे इतर दुष्परिणाम

डॉक्टरांच्या मते जास्त कालावधीसाठी स्टेरॉईड घेतल्याने त्याचे दीर्घकालीन दुष्परिणाम होतात. यामुळे ब्लड शुगर लेव्हल वाढते, स्ट्रेस वाढतो, मूड स्विंग आणि बेचैनी वाढते, चिडचिडेपणा वाढतो, अपचन, छातीत जळजळ, भूक वाढणे, वजन वाढणे अशा समस्या व्हायला लागतात.

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Health