मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

गर्भावस्थेत कधीच घेऊ नका ही गोळी; बाळाच्या मानसिक आरोग्यवर होईल परिणाम

गर्भावस्थेत कधीच घेऊ नका ही गोळी; बाळाच्या मानसिक आरोग्यवर होईल परिणाम

आधी एका मुलाला जन्म दिला नंतर तिला जुळ्या मुली झाला.

आधी एका मुलाला जन्म दिला नंतर तिला जुळ्या मुली झाला.

गर्भावस्थेमध्ये कोणतीही औषधं (Medicine) घेतानाही काळजी घ्यायला हवी. अगदी नेहमी सर्रास वापरण्यात येणाऱ्या सर्दी-तापाच्या या गोळ्या घेण्याआधीसुद्धा डॉक्टरांचा सल्ला (Doctors Advice) घ्यायला हवा.

  • Published by:  News18 Desk

दिल्ली, 8 जून : आपल्या शरीरामध्ये एखादा जीव वाढतो (Pregnant Women) आहे हे कळताच ती स्त्री आनंदाने फुलून जाते. होणार्‍या बाळाविषयी त्याची आई अनेक एक स्वप्न (Dreaming) रंगवत असते. गरोदरपणामध्ये (Pregnancy) सुदृढ जन्माला यावं यासाठी शक्य तितकी काळजी घेते. कुटूंबीय देखील तिला जपत असतात. संतुलित आहार, व्यायाम. डॉक्टरांची भेट वेळोवेळी योग्य औषधं, या सगळ्याच गोष्टींकडे लक्ष दिलं जातं. गर्भावस्थेमध्ये नऊ महिन्यांमध्ये (Nine Months of Pregnancy) प्रत्येक महिन्यात बाळाची वाढ होत असते. सुरुवातीचे तीन महिने तर, जास्त महत्त्वाचे असतात. गर्भावस्थेत कोणतीही गोष्ट करताना, कोणताही पदार्थ खाताना, त्याचा बाळावर काय परिणाम होणार (Effect on baby) याचा विचार केला जातो. जन्माला आलेलं बाळ एखादं व्यंग घेऊन जन्माला आलं तर, जन्मभर ते दुःख पचवावं लागतं. त्यामुळे गर्भावस्थेमध्ये कोणतीही औषधं (Medicine) घेतानाही काळजी घ्यायला हवी. डॉक्टरांचा सल्ला (Doctors Advice) घ्यायला हवा.

यासंदर्भात अमर उजालामध्ये वृत्त देण्यात आलं आहे.गर्भावस्थेमध्ये आईने घेतलेल्या आहाराचा थेट परिणाम बाळावर होत असतो. हा परिणाम दीर्घकालीन सुद्धा असू शकतो. त्यामुळेच औषधं घेताना देखील आईने काळजी घ्यायला हवी.

(कोरोनामुळं भारतात अडकलेल्या विदेशी नागरिकांच्या व्हिसामध्ये 31 ऑगस्टपर्यंत वाढ)

औषधं घेताना डॉक्टरांचा सल्ला

या काळात महिलांना काही त्रास होत असतात. अंगदुखी, पाठदुखी, डोकेदुखी, अशा त्रासांमध्ये घरात असलेली एखादी गोळी खाण्याने दुखणं थांबू शकतं. मात्र, या गोळ्यांचा बाळाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

जाणून घेऊयात चुकीची औषध घेण्याने बाळावर होणारा परिणाम. युरोपियन जर्नल ऑफ युरोलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधन अहवालानुसार गर्भावस्थेमध्ये पॅरासिटॅमॉलचं (Paracetamol) जास्त सेवन केल्यास बाळाच्या मानसिक आरोग्यावरही (Mental health) परिणाम होतो. यामुळे लहानपणीच अटेन्शन डेफिसिएन्सी हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर म्हणजे ADHD हा त्रास सुरू होतो. यासाठी 70 हजार पेक्षा जास्त मुलांचा तज्ञांनी अभ्यास केला.

(पोलीस निरीक्षकानेच केला महिला पोलिसावर अत्याचार, घरी जाऊन केलं धक्कादायक कृत्य)

पॅरासेटामोल खाण्याचे परिणाम

संशोधनानुसार पॅरासेटामोल (Paracetamol) खाणाऱ्या गर्भवती महिलेच्या मुलाचं मानसिक आरोग्य बिघडतं. अभ्यासानुसार 19 टक्के मुलांना ऑटिस्टिक स्पेक्ट्रम कंडीशनचा त्रास झालाय. तर, 21 टक्के मुलांमध्ये ADHDची लक्षणं पाहायला मिळाली आहेत.

गर्भवती मातेने अगदी आवश्यक असेल तेव्हाच डॉक्टरांच्या सल्ल्याने कोणतंही औषध घ्यावं. कारण पॅरासेटामोल सारखं औषध घेतल्यामुळे बाळाचं मानसिक आरोग्य बिघडतं (Mental Health Deteriorates). मुलांमध्ये चिडचिडपणा, लक्ष केंद्रित करता न येणं, गोष्टी विसरणं असे त्रास दिसतात.

(यामी गौतम अडकली विवाह बंधनात; कोणालाही न सांगता गुपचूप केलं लग्न)

गर्भावस्थेत अशी घ्या काळजी

गर्भावस्थेच्या काळामध्ये या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. एखादा त्रास होत असेल तर आराम करावा.

शरीरात हार्मोनल बदल होत असल्यामुळे महिलांचे मूड स्विंग्ज देखील होत असतात डोकेदुखी सारखा त्रास होत असतो अशा वेळी गोळी घेण्यापेक्षा थोडीशी झोप घ्यावी.

या काळामध्ये शरीर हायड्रेट ठेवायला हवं यासाठी वेळोवेळी पाणी पीत राहणं आवश्यक आहे.

कॉफीचं जास्त सेवन, धूम्रपान टाळावं.

मानसिक आणि शारीरिक शांततेसाठी व्यायामाकडे लक्ष द्या.

First published:

Tags: Mother, Pregnancy, Pregnent women, Women