Home /News /heatlh /

फॅशन म्हणून नव्हे, आरोग्यासाठी योग्य अंडरगार्मेंट्स हवीत; अंतर्वस्त्रांची कशी काळजी घ्याल? डॉक्टरांचा सल्ला ऐका

फॅशन म्हणून नव्हे, आरोग्यासाठी योग्य अंडरगार्मेंट्स हवीत; अंतर्वस्त्रांची कशी काळजी घ्याल? डॉक्टरांचा सल्ला ऐका

योनी आणि स्तनांचं आरोग्यही महत्वाच

योनी आणि स्तनांचं आरोग्यही महत्वाच

अंतर्वस्त्र मग ते ब्रा (Bra) असो किंवा पॅन्टी (Panties) याबद्दल बोलताना त्यांना फारच अवघडल्यासारखं वाटतं. पण अज्ञानातून किंवा चुकीच्या माहितीतून आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.

    दिल्ली, 6 मे: महिला आपल्या आरोग्याच्या अनेक समस्यांबद्दल बोलतील मात्र, आपली अतर्वस्त्रां (Underwear) बद्दल फारच कमीच चर्चा करतात. किंबहुना अंतर्वस्त्र मग ते ब्रा (Bra) असो किंवा पॅन्टी (Panties) याबद्दल बोलताना त्यांना फारच अवघडल्यासारखं वाटतं. अतर्वस्त्रांची साईज, स्वच्छता, वापर याबद्दल महिला बोलत नाहीत. त्यामुळे अतर्वस्त्रांबद्दलचे अनेक प्रश्न मनात असले तरी त्याची उत्तर मिळत नाहीत. अशात काही गैरसमजांमुळे (Misunderstanding) किंवा चुकीच्या माहितीमुळे नुकसान होऊ शकतं. योग्य ब्रा घातल्यास आणि स्वच्छता ठेवल्यास स्तनांचं (Breast) आरोग्य चांगलं राहतं. तर, पॅन्टीसुद्धा योग्य आकाराची असल्यास आणि स्वच्छता राखल्यास योनीचं (Vagina) आरोग्य चांगलं राहत. आजच्या काळात अतर्वस्त्र हे फॅशनचा भाग झाले आहेत. त्याच्या दिसण्यापेक्षा त्यांचा शरीराला होणारा उपयोग महत्त्वाचा आहे हे लक्षात ठेवायला हवं. डेली मेलने यासंदर्भात सविस्तर माहिती एका लेखात दिली आहे. या विषयासंदर्भात आरोग्य तज्ज्ञांचा सल्लाही महत्त्वाचा आहे, असं या लेखात म्हटलं आहे. ब्रिटीश कॉस्मेटीक सर्जन डॉ. शिरीन लखानी (Dr Shirin Lakhani)  यांच्या मते, इनरवेअर आपल्या शरीराच्या सर्वात जवळ असतात त्यामुळे (कोरोनाग्रस्त बापाला पाणी पाजण्यासाठी लेकीची धडपड; डोळ्यादेखत तडफडून मृत्यू) महिलांनी किमान एक वर्षाने आपले इनरवेअर बदलायला हवेत. त्या सांगतात की इनरवेअर हातांनी साफ करावेत मशीनमध्ये ते स्वच्छ होत नाहीत.  वॉशिंग मशिनमध्ये इनरवेअर धुतल्याने बॅक्टेरिया मरत नाहीत. उलट बॅक्टेरियामुळे त्वचेला त्रास हाऊ इन्फेक्शन होऊ शकतं. इंटिमेट हेल्थ केअर एक्सपर्ट (Intimate Health Expert) आणि पेल्व्हिक हेल्थ केअर कंपनीच्या मॅनेजींग डिरेक्टर (Pelvic Healthcare Company) स्टीफनी टेलर (Stephanie Taylor) सांगत की काही महिला झोपतांना किंवा व्यायाम करताना अंडरवेअर घालत नाहीत त्यामुळे योनीला इन्फेक्शन (Infection) होतं नाही त्यामुळे तुमची योनी आणि स्तन यांचं आरोग्य चांगल राखण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी हे जाणून घेऊयात. (Fitness फंडा; मलायकाने केलेली ही आसनं पाहून तुम्हीही थक्क व्हाल) कशी घ्याल ब्राची काळजी 1 ब्राची साईजचांगली ब्रा म्हणजे ती दिसायला चांगली असा अर्थ होत नाही. ब्राची साईज निवडताना ती जास्त घट्ट किंवा सैल नसावी. ब्रा आपल्या स्तनांच्या आकाराप्रमाणे निवडावी. बेल्ट जास्त घट्ट नसावा. आपण एकच ब्रा दिवसभर घातल असाल तर, कंफर्टचा विचार आधी करावा 2 मटेरीयल डॉक्टर लखानी सांगतात,  सिल्क आणि सॅटिन या कापडाचे ब्रा दिसायला छान असतात पण काही वेळानंतर त्याचा शरीराला त्रास व्हायला लागतो ऍलर्जीं किंवा पुरळ येण्याची शक्यता असते . त्यामुळे शक्यतो कॉटनचे अंतर्वस्त्र आणि ब्रा वापरावेत. सुती कपड्यामध्ये घाम आणि इतर स्त्राव टिपले जातात आणि त्वचा कोरडी राहते आणि इन्फेक्शन होण्याची शक्यता कमी आहे. प्रेग्नेन्सीनंतर महिलांच्या स्तनामधून स्त्राव बाहेर येत असतो अशावेळेस ब्रामध्ये हा स्त्राव शोषला जातो. मृत त्वचाही ब्रावर घासली जाते. (गरीबांच्या मदतीसाठी जॅकलिन उतरली रस्त्यावर; रोटीबँकसोबत करतेय अन्नदान) 3 ब्रा बदलणे डॉक्टर लखानी सांगतात, ब्रा स्नायूंना आधार देण्यासाठी घातली जाते. ब्रा आपले स्तन आणि निपल यांना घासत असतात. त्या घर्षणाने इजा होऊ शकते. त्यातही या काळानंतर ब्राचं इलेस्टीक आणि त्याची शिवण निघालेली असेल. तर, त्यामुळे ब्रा स्तनांना योग्यप्रकारे आधार देत नाही. म्हणूनच दरवर्षी ब्रा बदण्याचा सल्ला त्या देतात. 4 सैल ब्रा किंवा कपडे घरामधून कुठेच जायचं नसेल, घरीच राहणार असाल तर, ब्रा घालणे टाळा किंवा सैल कंफर्टेबल ब्रा घाला. बाजाराक डेली युजसाठी ब्रा उपलब्ध आहेत. झोपताना ब्रा घालणे टाळा असा सल्लाही डॉक्टर देतात. 5 व्यायाम करताना आजकाल महिला व्यायाम करतान जीममध्ये जाताना स्पोर्ट्स ब्रा घालतात. या ब्रा व्यायामासाठी चांगली असल्या तरी, त्या डेली युजसाठी नसतात. व्यायाम करताना कोणत्याही प्रकारची ब्रा घातली तरी, व्यायामानंतर बदलावीच कारण, व्यायाम करताना आलेला घाम त्यात शोषलेला असतो. (तुमच्या जुन्या फोन नंबरवरून चोरी केला जाऊ शकतो पर्सनल डेटा) पॅन्टीची काळजी 1 कापड कसे निवडाल पॅन्टी घेताना फॅशनपेक्षा तिची साईज, आकार, मेटेरियलचा विचार करावा. पॅन्टीच्या कापडाचा योनीच्या त्वचेवर कसा परिणा होईल याचा विचार करण्याचा सल्ला डॉक्ट लखानी देतात. पॅन्टीचं कापड जाड असेल तर, त्याच घर्षण होण्याने त्रास हाईल. मउ सुती कापडाची पॅन्टी नेहमी चांगली. त्याउलट जाळीची पॅन्टी दिसायला चांगली असली तरी दररोज वापरू नये. सॅटिनचं कापड ओलावा शोषून घेत. तेही हानिकार आहे, त्याने बॅक्टेरीया वाढून फन्फेक्शन वाढू शकतं. (Homeopathic औषध Drosera 30 जीवघेणं ठरू शकतं? काय म्हणाले डॉक्टर पाहा) 2 व्यायाम करताना योनीला इन्फेक्शन असेल तर, रात्री झोपतान पॅन्टी न घालण्याचा सल्ला डॉक्टर देतात.आजकाल महिला व्यायाम करताना पॅन्टी घालत नाहीत. हे देखील चांगलं असल्याचं त्या सांगतात. व्यायामासाठी घातलेली पॅन्टी लगेच बदलून धुवू टाकावी. 3 पॅन्टी बदला योनीच्या आपरोग्यासाठी दररोज वापरणारी पॅन्टी 3 महिन्यांनी बदलावी किंवा रोटेशनमध्ये पॅन्टी वापरत असाल तर 6 महिन्यांनी पॅन्टी बदलावी. पॅन्टीचा आकार बलला, साईज बिघडली, इलास्टीक फीट नसेल तर बदलायला हवी. पॅन्टी नियमित धुवायला हव्यात. त्यासाठी चागल्या प्रतीचे डिटर्जंट वापरा.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Lifestyle, Wellness, Women

    पुढील बातम्या