Home /News /heatlh /

मूड खराब आहे? मग या पाच गोष्टी नक्की कराच! लगेच मूड होईल ठीक!

मूड खराब आहे? मग या पाच गोष्टी नक्की कराच! लगेच मूड होईल ठीक!

दररोज 30 मिनिटं चालण्याने मूड चांगला राहतो. स्ट्रेस,भीती,डिप्रेशन आणि निगेटिव्ह थिंकींग देखील कमी होतं आणि आपल्याला एनर्जीही वाढते. एवढेच नाही तर, मेंटल हेल्‍थ चांगलं राहतं.

दररोज 30 मिनिटं चालण्याने मूड चांगला राहतो. स्ट्रेस,भीती,डिप्रेशन आणि निगेटिव्ह थिंकींग देखील कमी होतं आणि आपल्याला एनर्जीही वाढते. एवढेच नाही तर, मेंटल हेल्‍थ चांगलं राहतं.

सध्याचं आयुष्य हे धावपळीच आयुष्य समजलं जात. कारण आज लोक सतत कोणत्या न कोणत्या धावपळीत असतात. ऑफिस, शिक्षण या सगळ्या धावपळीमुळे स्वतःला वेळ देणेसुद्धा कठीण झालं आहे. या सर्व व्यापामुळे लोकांचं स्वास्थ्य बिघडत आहे.

    मुंबई, 03 मार्च :  सध्याचं आयुष्य हे धावपळीच आयुष्य समजलं जात. कारण आज लोक सतत कोणत्या न कोणत्या धावपळीत असतात. ऑफिस, शिक्षण या सगळ्या धावपळीमुळे स्वतःला वेळ देणेसुद्धा कठीण झालं आहे. या सर्व व्यापामुळे लोकांचं स्वास्थ्य बिघडत आहे. आणि ती मोठ्या प्रमाणात तणावाखाली येत आहेत. या तणावामुळे मूडसुद्धा बिघडत आहे. त्यामुळे लोक मानसिक आजारी बनू लागली आहेत. स्वतःचं आरोग्य बिघडवून घेत आहेत. या तणावातून स्वतःचा बचाव करण्यासाठी तुमचं मूड चांगलं असणं खूप आवश्यक आहे. आणि तुमचा मूड ठीक करायचा असेल तर या पाच गोष्टी नक्की पाहाच, 1)खोल श्वास घ्या(deep breathing)- खोल श्वास घेणे हे एक शास्त्रीय कारण आहे. खोल श्वास घेतल्याने शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. ऑक्सिजनचं प्रमाण वाढल्यानं मेंदू रिलॅक्स् होतो. आणि शरीरात ‘गुड हार्मोन्स’ उत्तेजित होतात आणि आपल्याला एकप्रकारे आनंदी आणि छान वाटू लागतं. 2) गाणी ऐका- (listen to music) जर तुमचा मूड खराब वाटत असेल किंवा तणाव जाणवत असेल. तर तुम्ही आनंद देणारी गाणी ऐकू शकता. त्यामुळे शरीरात एंडोर्फिन हार्मोन उत्तेजित होतात. त्यामुळे तुम्हाला चांगलं वाटू लागतं. 3) खुल्या हवेत जा- (roam around in fresh air) ऑफिस किंवा घरामध्ये असताना तुम्हाला खराब मूड जाणवत असेल किंवा तणाव वाटत असेल, तर थोडासा वेळ काढून बाहेर मोकळ्या वातावरणात जावं. आसपास असणाऱ्या बागेत फेरफटका मारावा. त्यामुळे तुमच्या मूडमध्ये नक्कीच चांगला बदल जाणवेल. (हे पाहा:Corona vaccine ची जादू; फक्त कोरोनाच नाही तर 'या' आजारांनाही देतेय टक्कर  ) 4) स्वयंपाक करा- (cook food) स्वयंपाक हीसुद्धा एक कला आहे. अनेकांना स्वयंपाक करून चांगल वाटत. त्यामुळे मूड खराब वाटत असेल तर पटकन उठून किचन मध्ये जा आणि आपल्या आवडीचा एखादा पदार्थ बनवा त्यामुळे तुम्हाला नक्कीच चांगल वाटेल. 5) हसा- (laugh) माहीत आहे हे थोडं कठीण आहे. मात्र एकदा करून तर पाहा, मूड खराब असेल तर चेहऱ्यावर थोडसं हास्य आणा. त्यामुळे शरीरात आपोआप एक सकरात्मक उर्जा निर्माण होते. आणि मूडसुद्धा ठीक होतो. मूड खराब असेल तर एकदा आरश्यासमोर उभे राहून स्वतःला बघून हास्य करा आणि स्वतःला समजवायचा प्रयत्न करा की सर्व काही ठीक आहे. त्यामुळे सुद्धा तुमचा मूड चांगला होतो.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Health, Health Tips, Lifestyle, Mental health, Wellness

    पुढील बातम्या