मराठी बातम्या /बातम्या /heatlh /मधुमेहींसाठी वरदान आहे नारळपाणी, इतरही असंख्य फायदे, वाचा काय सांगतं संशोधन

मधुमेहींसाठी वरदान आहे नारळपाणी, इतरही असंख्य फायदे, वाचा काय सांगतं संशोधन

त्वचा चमकदार होईल. स्किन टोनर म्हणून नारळाच्या पाण्याचा वापर करू शकता. याशिवाय नारळपाणी नियमितपणे प्यायल्याने त्वचेमध्ये चमकही येते.

त्वचा चमकदार होईल. स्किन टोनर म्हणून नारळाच्या पाण्याचा वापर करू शकता. याशिवाय नारळपाणी नियमितपणे प्यायल्याने त्वचेमध्ये चमकही येते.

Health benefits of coconut water: अनेकदा आपण केवळ आजारी असतानाच नारळपाणी पितो. मात्र याचे फायदे खूप जास्त आहेत.

मुंबई, 2 मार्च : मधुमेह असलेल्या व्यक्तींना आपल्या रक्तातील साखर कायम नियंत्रणात ठेवावी लागते. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांना गोड खाण्याची परवानगी नसते. विशेषतः गोड ज्यूस आणि कोल्ड्रिंक्स घेण्यास त्यांना मनाई असते.

(instructions for diabetic patients)

अशावेळी नारळाच्या पाण्याबाबतही मधुमेहींना शंका येणं साहजिक असतं. यातून रक्तातील साखर वाढणार तर नाही अशी शंका त्यांना असते. मात्र खरी गोष्ट ही आहे, की नारळपाणी नियमित पिल्यानं रक्तातील साखर नियंत्रणात राहते. (coconut water for diabetic patients)

आपल्या देशात मधुमेही रुग्णांची संख्या जवळपास ८ कोटी आहे. ही जवळपास जगातल्या संख्येच्या अर्धी आहे. बदलत्या जीवनशैलीमुळं रोज मधुमेहींच्या संख्येत वाढ होते आहे. या आजारात रक्तातील साखरेची पातळी वाढते. सोबत इन्सुलिन हार्मोन स्रवणं थांबतं. मग रुग्णाला शुगर कंट्रोल करण्याचा सल्ला दिला जातो. असं न केल्यास त्या व्यक्तीला हृदयाशी संबंधित अनेक आजार होऊ शकतात. त्यांचा जीवही जाऊ शकतो.(benefits of coconut water)

हेही वाचा गंभीर आजाराचा सामना करतीये 'ही' चिमुकली, लिंबू पाणी विकून उपचारासाठी जमवते पैसे

काय सांगतं संशोधन 

जगभर नारळपाण्यावर बरंच संशोधन केलं गेलं आहे. यात समोर आलं, की नारळपाणी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. कॅलरीबाबत बोलायचं तर २५० ग्रॅम नारळपाण्यात केवळ ४० ग्रॅम कॅलरी असतात. researchgate.net मध्ये प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टनुसार नारळपाणी मधुमेहींसाठीही फायदेशीर असतं. मधुमेहींना याचं सेवन रोज करता येतं. हे संशोधन उंदरांवर केलं गेलं. संशोधनांना आढळलं, की नारळपाणी पिल्यानं उंदरांच्या रक्तातील साखर कमी झाली. (coconut water for healthy life)

नारळपाण्याचे इतरही फायदे आहेत.

नारळपाण्यात खूप प्रमाणात पोटॅशियम, की जीवनसत्व आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. हे त्वचा आणि केसांसाठी अतिशय चांगलं असतं. उन्हाळयात नारळपाणी जरूर पिलं पाहिजे. यामुळं सनबर्न कमी होतं. डॉक्टर गर्भवती महिलांनासुद्धा नारळपाणी पिण्याचा सल्ला देतात. नारळपाण्यानं बद्धकोष्ठताही कमी होते. गर्भावस्थेत होणारं हार्टबर्नही कमी होतं.

हेही वाचा मधूर चवीबरोबरच चिकू आरोग्यासाठीही फायदेशीर; जाणून घ्या चिकूचे आश्चर्यकारक फायदे

नारळपाणी शरीरात ओलावा टिकवून ठेवतं. यातून तुम्ही किडनी स्टोनपासून वाचू शकता. नारळपाण्यात खूप पोटॅशियम असतं. हे रक्तदाब कमी करण्यास मदत करतं. यात अँटिऑक्सिडंट्स असतात जे रोगप्रतिकारक्षमता टिकवून ठेवतात.

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवायची असेल तर रोज हे करा

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवायची असेल तर व्यायाम आणि वॉक अत्यंत गरजेचा आहे. अन्यथा हार्ट अटॅक किंवा हार्ट फेलचा धोका असतो. पॅक्ड फूड आणि प्रक्रिया केलेलं अन्न खाणं टाळा.

First published:

Tags: Health, Health Tips, Tips for heart attack