मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

Diabetes च्या औषधांना कंटाळलात; हे घरगुती उपायही करून पाहा

Diabetes च्या औषधांना कंटाळलात; हे घरगुती उपायही करून पाहा

डायबेटीस (Diabetes) असेल तर, लाइफस्‍टाईल बदलून आणि औषधोपचारांनी नियंत्रणात येऊ शकतो. काही घरगुती उपाय (Home Remedies) टाइप 2 डायबिटीसमध्ये उपयोगी पडतात.

डायबेटीस (Diabetes) असेल तर, लाइफस्‍टाईल बदलून आणि औषधोपचारांनी नियंत्रणात येऊ शकतो. काही घरगुती उपाय (Home Remedies) टाइप 2 डायबिटीसमध्ये उपयोगी पडतात.

डायबेटीस (Diabetes) असेल तर, लाइफस्‍टाईल बदलून आणि औषधोपचारांनी नियंत्रणात येऊ शकतो. काही घरगुती उपाय (Home Remedies) टाइप 2 डायबिटीसमध्ये उपयोगी पडतात.

  • Published by:  News18 Desk

दिल्ली,27 मे : कोरोना (Corona) काळात संपूर्ण देशात गंभीर परिस्थिती आहे. त्यातच आता ब्लॅक फंगसने(Black Fungus) डोकं वर काढलेलं आहे. ज्या लोकांना मधुमेहाचा (Diabetes) त्रास आहे. त्यांना ब्लॅक फंगसनचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. अशा परिस्थितीत, लोक मधुमेहापासून बचाण्यासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. लाईफस्‍टाईल बदलून आणि मेडिकेशने डायबेटीस (Diabetes)   कंट्रोल (Control) करता येतो. मेडिकल न्‍यूज टुडे  नुसार, काही घरगुती उपाय (Home Remedies) टाइप 2 डायबिटीजमध्ये उपयोगी पडतात. तर, जाणून घेऊयात ते उपाय.

कोरफडचा वापर

कोरफड (Aloevera) एक अशी वनस्पती आहे. जिचा वापर बर्‍याच गोष्टींमध्ये करता येतो. बहुतेक लोक स्किन केयरसाठी याचा वापर करतात. पण, टाइप 2 डायबेटीसमध्येही कोरफडचा वापर करता येतो. त्यात अँटीऑक्सिडेंट आहेत जे, बीटा सेल्स रिपेर करण्यात खूप उपयुक्त आहे. डायबेटीसचे रुग्ण कोरफडची स्मूदी किंवा कॅप्सूल ही घेऊ शकता.

दालचिनीचा वापर

सगळ्यांच्याच स्वयंपाकघरात मिळणारी दालचिनीचा (Cinnamon) रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करु शकते. पण, यासाठी सकाळी चहापूर्वी उपाशीपोटी दररोज दालचिनीचं सेवन केलं पाहिजे. दररोज 1 ग्रॅम दालचिनी खल्ली तर, तुम्ही मधुमेहाला दूर ठेवू शकता.

(काय सांगता! तिसऱ्या लाटेपूर्वीच 30 टक्के लहान मुलांना होऊन गेला कोरोना?)

शेवग्याची पानं

आयुर्वेदात शेवग्याला (Drumstick) खूप महत्त्व आहे. यालाच मोरिंगा असंही म्हणतात. आयुर्वेदानुसार शेवग्याच्या शेंगा आणि पानं रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवतात आणि मधुमेहापासून बचाव होते. ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे. ते देखील शेवग्याच्या शेंगांच्या वापराने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करू शकतात.

कडुलिंबाची पानं

कडुनिंबाच्या पानांमध्ये इन्सुलिन रिसेप्टर सेन्सिटिविटीवाढविण्याची क्षमता आहे. एवढंच नही तर,शरीरात ब्लड सर्क्युलेशन चांगलं ठेवण्यासही मदत करतं,ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज रिकाम्या पोटी कडुलिंबाच्या पानांचा रस प्यावा. मधुमेह नसलेले लोकही मधुमेह टाळण्यासाठी याचं सेवन करु शकतात.

(''सर..माझं नाव सनी, मी बाहेर जाऊ शकतो का?'', यावर काय म्हणाले मुंबई पोलीस)

तुळशीच्या पानांचा रस

 मधुमेह टाळायचा असेल तर, दररोज रिकाम्या पोटी 2 ते 3 तुळशीची पाने चावून खा. तुळशीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट्स असतं. जे इंसुलिन रिलीज करण्याबरोबर शरीरातील पेशी हेल्दी ठेवते.

मेथी दाण्यांचा वापर

सगळ्यांच्या स्वयंपाकघरात मेथी असतेच. दररोज मेथी दाण्यांचं सेवन करून तुम्ही ब्लड शुगर नियंत्रित करू शकता. रात्री झोपण्यापूर्वी एका ग्लास पाण्यात 1 चमचा मेथीचे दाणे भिजवून जर सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्यायलं तर त्याचा फायदा होतो.

First published:

Tags: Diabetes, Health Tips, Home remedies