दिल्ली, 1 जून: कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) संपूर्ण जगामध्ये हाहाकार माजलेला आहे. कोरना रुग्णांची (Corona Patient) संख्या सध्या कमी होत असली तरी देखील कोरोना काळामध्ये काळजी (Care) घेणे आवश्यक आहे. मास्क(Mask)घालणं, सोशल डिस्टंसिंग पाळणं (Social Distancing), सॅनिटायझरचा वापर करणं आवश्यक आहे. अनेक ठिकाणी कोरोनामुळे लॉकडाऊन (Lockdown) अजूनही ठेवण्यात आलेला आहे. केवळ आवश्यक वस्तूंची खरेदीची परवानगी लोकांना देण्यात आलेली आहे. कोरोना होऊ नये यासाठी सगळेच काळजी घेत असले तरी देखील कोरोनाची लागण होते. त्यामुळे लसीकरण सुरु झालं असलं आणि कोरोना रुग्ण संख्या घटत असली तरी, कोरून होऊ नये याची काळजी घ्यायलाच हवी शिवाय कोरोना मधून बरं झाल्यानंतर Post Covid syndromeच्या काळात येणारा थकवा आणि खोकला (Cough) बरा होण्यासाठीही लक्ष द्यायला हवं. त्यासाठी काही टिप्स (Tips) जाणून घेऊयात.
कोरडा आणि कफ असलेल्या खोकल्याचा जास्त त्रास
covid-19वर आत्तापर्यंत अनेक संशोधन झालेले आहेत. कोरोना रुग्णांना लागण झाल्यानंतर इतर लक्षणांबरोबर सर्दी आणि खोकल्याचाही त्रास व्हायला लागतो. करोना बरा झाल्यानंतर देखील काही काळ खोकला राहतो. कोरडा खोकला आणि कफामुळे थकवा जास्त येतो. त्यामुळेच तो बरा होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
कोरडा खोकला होत असेल तर, शरीर हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा. थोड्या थोड्या वेळाने वाफ घेण्याने देखील घसा मोकळा व्हायला फायदा होईल.
(प्रेग्नन्सीत आईने दिला कोरोनाशी लढा; जन्मानंतर काही तासांत बाळाला MIS-C चा विळखा)
कोरडा खोकला असल्यास सतत खोकल्याने छातीमध्येही दुखायला लागतं. अशा वेळेस शरीर हायड्रेट ठेवायला हवं. त्यासाठी कोमट पाणी घेतल्याने फायदा होऊ शकेल.
खोकल्यामुळे पाणी पिताना त्रास होत असेल तर, छोटा छोटा घोट घेऊन पाणी प्यावं.
कोरडा खोकला असेल तर, वाफारा घेण्यानेही फायदा होऊ शकतो. यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये गरम पाणी घ्या. त्या भांड्यावर आपला चेहरा नेऊन श्वासाद्वारे वाफ आत घेण्याचा प्रयत्न करा. यासाठी टॉवेल देखील वापरू शकता. टॉवेलने चेहरा झाकून वाफ घेतल्यास जास्त चांगली वाफ मिळते. यासह आज-काल स्टीम मशीन देखील मिळातात.
कोरडा खोकला असेल तर लिंबू आणि मध गरम पाण्यामध्ये टाकून पिण्याने देखील घशाला आराम मिळेल.
कोरड्या खोकल्यात एखादा आयुर्वेदिक काढा घेऊन बरं वाटू शकतं.
(तुम्ही बनावट तूप तर खात नाही ना? अशी ओळखा तुपातील भेसळ)
कफाचा त्रास
कफाचा खोकला झाला असेल तर त्यातून बरं होणं जरा कठीण जातं. सतत कफ येत असल्यामुळे थुंकून बाहेर काढावा लागतो. मात्र कोरोनाच्या काळामध्ये बाहेर थुंकल्यामुळे कोरोना पसरण्याची भीती आहे. घरात देखील कफ थुंकत असल्यास त्या ठिकाणी डिसइन्फेक्टर वापरणं गरजेचं आहे.
खोकल्यात कोमट पाणी, एखादं सूप, हर्बल टी किंवा काढा प्यायल्यामुळे शरीरात हायड्रेशन वाढतं.
(स्वयंपाकाशिवाय बेकिंग सोड्याचा असा करा वापर; खुलेल त्वचेचं सौंदर्य)
छातीमध्ये कफ साठून राहिला असेल तर, तो पातळ होण्यासाठी दिवसातून किमान 3 वेळा वाफारा घ्या.
झोपताना पाठीवर झोपण्या ऐवजी डाव्या किंवा उजव्या कुशीवर झोपावं. यामुळे कफ बाहेर निघण्यास मदत होते.
सतत खोकला येत असेल तर घरातल्या घरात थोडं चालण्यानेही फरक पडेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Health Tips