मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

Health tips : कच्चा कांदा खाताय? तर आधी जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम

Health tips : कच्चा कांदा खाताय? तर आधी जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम

 कच्चा कांदा अतिसेवनाचे दुष्परिणाम लक्षात आल्यानंतर आता पुढच्यावेळी कच्चा कांदा अधिक प्रमाणात खाताना तुम्ही नक्की दोनदा विचार कराल.

मुंबई, 11 मे : सध्या चांगल्या तब्येतीसाठी अनेक जण सॅलड खाण्याचा सल्ला देतात. सॅलड म्हणजे कच्च्या भाज्या, फळं आणि सोबत काही जुजबी मसाले. सॅलडच्या सेवनानं आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर होतातही; पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. सॅलडमध्ये मुख्यतः मुबलक व बाराही महिने मिळणारा कांदा असतोच. उन्हाळा म्हटलं, की कांदा तर हवाच. थंड गुणधर्माच्या या कांद्याचे अनेक फायदे आहेत. जेवणात विशेषतः मसालेदार जेवण असेल, तर तोंडी लावायला कांदा खाणारेही अनेक जण आहेत. तुम्हालाही असा कच्चा कांदा खायला आवडत असेल, तर मात्र थोडा विचार करा. कारण कच्च्या कांद्याचं अतिरिक्त सेवन रक्तातील साखरेची पातळी आणि पित्तही वाढवतं. त्यामुळे जास्त कच्चा कांदा (Row Onion) तब्येतीसाठी चांगला नाही.

कच्चा कांदा अतिखाण्याचे अनेक दुष्परिणामही आहेत. ते माहीत नसल्याने अनेकदा आवडतो म्हणून कांदा खाल्ला जातो. त्यामुळे आरोग्य चांगलं राखायचं असेल तर कच्च्या कांद्याच्या अतिसेवनाचे दुष्परिणामही आपण जाणून घ्यायला हवेत. कांद्यामध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचं प्रमाण जास्त असतं. तसंच त्यात फायबरही (Fiber) भरपूर असतात. काही जणांच्या शरीरात या जास्तीच्या घटकांचं व्यवस्थित पचन होत नाही. त्यामुळे अॅसिडिटी (Acidity) होण्याची शक्यता असते. कच्चा कांदा अधिक खाल्ला, तर रक्तातील साखरेची पातळी (Blood sugar) वाढण्याबरोबरच पोट खराब होण्याची समस्याही उद्भवू शकते. मधुमेही (Diabetes) रुग्णांना काहीही खाताना विशेष काळजी घ्यावी लागते. आवडला म्हणून कोणताही पदार्थ जास्त खाऊन चालत नाही. त्यामुळे कच्चा कांदा खातानाही मधुमेही रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे, याबाबतचं वृत्त झी न्यूजने दिलं आहे.

सामान्यतः कच्चा कांदा न खाण्याचं पहिलं कारण म्हणजे कांदा खाल्ल्यावर येणारा तोंडाचा वास. अनेक जण आवडत असूनही बरेचवेळा याच कारणासाठी कांदा खात नाहीत. परंतु, घरी असताना रात्रीच्यावेळी किंवा हॉटेलमध्ये जेवताना भरपूर कांदा खातात. मात्र अशावेळी कांद्याचे हे दुष्परिणाम माहीत असतील, तर अनावश्यक प्रमाणात कांदा खाल्ला जाणार नाही. त्यामुळे कच्च्या कांद्याच्या अतिसेवनामुळे तब्येतीवर होणारे परिणाम निश्चितच टाळता येतील.

कच्चा कांदा खाण्याचा आणखी एक दुष्परिणाम म्हणजे छातीत जळजळ होणं. अनेकदा आपण पंजाबी जेवणासोबत कांदा खातो आणि घरी गेल्यावर छातीत जळजळ होते. त्यात पंजाबी मसाले, बाहेरचे पदार्थ जरी आपण जळजळ होण्यासाठी कारणीभूत धरले तरीही कच्चा कांदा हाही एक घटक त्यात असतो तो आपण विसरतो. त्यामुळे अतिकांदा खाल्ला की छातीत जळजळ होऊ शकते हे पण ध्यानात घ्यायला हवं.

कच्चा कांदा अतिसेवनाचे दुष्परिणाम लक्षात आल्यानंतर आता पुढच्यावेळी कच्चा कांदा अधिक प्रमाणात खाताना तुम्ही नक्की दोनदा विचार कराल.

health tips

First published:

Tags: Health, Health Tips, Onion