मराठी बातम्या /बातम्या /heatlh /हेल्दी आहेत म्हणून जास्त खाऊ नका! उन्हाळ्यात Dryfruits चा होईल उलट परिणाम

हेल्दी आहेत म्हणून जास्त खाऊ नका! उन्हाळ्यात Dryfruits चा होईल उलट परिणाम

बाळाचं प्लॅनिंग करताना दोघांनीही ड्रायफ्रूट्स खायला सुरूवात केली पाहिजे. ड्रायफ्रूट्समध्ये मोठ्या प्रमाणात अ‍ॅन्टीऑक्सिडन्ट असतात. त्यामुळे शरीरामध्ये रिअॅक्टिवे ऑक्सिजन स्पीशीज केमिकल कमी होतं हे केमिकल फर्टिलिटीवर परिणाम करत असतं.

बाळाचं प्लॅनिंग करताना दोघांनीही ड्रायफ्रूट्स खायला सुरूवात केली पाहिजे. ड्रायफ्रूट्समध्ये मोठ्या प्रमाणात अ‍ॅन्टीऑक्सिडन्ट असतात. त्यामुळे शरीरामध्ये रिअॅक्टिवे ऑक्सिजन स्पीशीज केमिकल कमी होतं हे केमिकल फर्टिलिटीवर परिणाम करत असतं.

Side Effects Of Dry Fruit : ड्रायफ्रुट्स हिवाळ्यात जितके फायदेशीर तितकेच उन्हाळ्यात (Summer) हानिकारक ठरू शकतात.

मुंबई, 30 मे : ड्रायफ्रुट्स (Dry Fruit) खाणं शरीरासाठी फायदेशीर (Health Benefitsआहे. यामुळे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी सर्वच जण हिवाळ्यात सुकामेवा खाण्याचा सल्ला देतात. पण रोग प्रतिकारशक्ती (Immunity) आणि ताकद वाढवण्यासाठी बरेच लोक उन्हाळ्यातही (Summer) ड्रायफ्रुट खातात. मात्र हे घातक ठरू शकतं (Eating Dry fruit Daily Is Sometimes Harmful).

ड्रायफ्रूट खाण्याचे फायदे तुम्हाला माहितीच असतील. पण होणाऱ्या नुकसानाबद्दल माहिती जाणून घेऊयात.

पोटाला त्रास

उन्हाळ्यात ड्रायफ्रुट्स जास्त प्रमाणात खाल्ल्याने पोटाला त्रास होऊ शकतो. ड्रायफ्रुट्समुळे पचन संस्था खराब होऊ शकते. ओटीपोटात दुखणं, वेदना, अपचन आणि लूज मोशन्स होऊ शकतात. त्यामुळे शक्य असल्यास उन्हाळ्यात ड्रायफ्रुट्स खाणं टाळावं किंवा कमी प्रमाणात खावेत. उन्हाळ्यात ड्रायफ्रुट्स रात्रभर पाण्यात भिजत ठेवून खावेत.

(काम करताना झोप, कंटाळा येऊ नये म्हणून तुम्हीही सतत Coffee पिता का? मग हे वाचाच)

नाकामधून रक्त येणं

ड्रायफ्रुट्स प्रकृतीने गरम असतात. उन्हाळ्यात वातावरणात उष्णता असताना हे खाल्ल्यामुळे शरीरात आणखीन उष्णता वाढवते. ज्यामुळे नाकातून रक्तस्त्राव होण्याची समस्या होऊ शकते. ज्यांना नाकातून रक्तस्त्राव होण्याचा त्रास होत असेल. त्यांनी उन्हाळ्यात ड्रायफ्रुट्स खाणं टाळावं.

मुरुम वाढतात

रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसातही ड्रायफ्रुट्स खात असाल तर, त्यामुळे चेहऱ्यावर पुरळ येणं आणि मुरुमांचा त्रास होऊ शकतो. ड्रायफ्रुट्स अत्यंत गरम असतात. ज्यामुळे शरीरात उष्णता आणखीन वाढवते. त्यामुळे उन्हाळ्यात ड्रायफ्रुट्सऐवजी रसाळ फळे खाणं चांगलं.

( कोरोना संसर्गाचा Menstrual Period वर परिणाम होतो? तज्ज्ञ काय म्हणतात वाचा)

वजन वाढेल

ड्रायफ्रुट्स जास्त प्रमाणात खाल्ल्याने वजनही वाढू शकते. ड्राय फ्रूटमध्ये भरपूर कॅलरी असतात. ज्यामुळेच वजन वाढण्यासाठी खाल्ले जातात. त्यामुळे वजन जास्त असणाऱ्यांनी ड्रायफ्रूट्स जास्त खाणं टाळलं पाहिजे. आवडत असल्यास कमी प्रमाणात खावेत किंवा एक्ससाईज करावी. ज्यामुळे कॅलरीज बर्न होतील.

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle