मुंबई, 07 डिसेंबर : हिवाळा सुरू झाला असून, वातावरणात गारवा जाणवू लागला आहे. हिवाळ्यात शरीरात विविध बदल होत असतात. अनेक जण हिवाळ्यात शेंगदाणे (Peanuts) किंवा शेंगदाण्यापासून तयार झालेले पदार्थ खातात. हिवाळ्यात शेंगदाणे खाण्याचे अनेक फायदे आहेत. शेंगदाणे पित्तशामक असून, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात. शेंगदाणे खाल्ल्याने खूप वेळ भूक लागत नाही आणि पोट भरल्यासारखं वाटतं. यासोबतच शेंगदाणे (Peanuts Benefits) आरोग्यासाठी फायदेशीर असतात. शेंगदाणे आपल्या शरीराला अनेक रोग आणि आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतात.
शेंगदाणे खाणं आरोग्याला लाभदायक असतं. शेंगदाण्यांमध्ये प्रथिनं असतात. शेंगदाणे खाल्ल्याने शरीरातली लोहाची कमतरता दूर होते. शेंगदाणे खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढतं. शेंगदाण्यांमध्ये लोहाचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे अॅनिमियापासून बचाव होतो. शेंगदाण्यांमध्ये भरपूर फायबर्स असतात. शेंगदाणे भिजवून (Soaked Peanuts Benefits) खाल्ल्यास त्यांचे गुणधर्म अधिक चांगले होतात. भिजवलेले शेंगदाणे सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने गॅस आणि अॅसिडिटीची समस्या दूर होते. पोटॅशियम, मॅगनीज, तांबे, कॅल्शियम, लोह, सेलेनियम ही पोषक तत्त्वं शेंगदाण्यात आढळतात. यामुळे पचनसंस्थादेखील चांगलं कार्य करतं, याबद्दलचे वृत्त टीव्ही ९ हिंदीने दिली आहे.
जॉब मिळताच तरुणीने रस्त्यावर असं काही की CCTV VIDEO पाहून बॉसनेही जोडले हात
भिजवलेल्या शेंगदाण्यांमधली (Health Benefits Of Soaked Peanuts) पोषक तत्त्वं (Nutrition) शरीर पूर्णतः शोषून घेतं. हे घटक शरीरासाठी उपयुक्त असतात. हिवाळ्यात भिजवलेले शेंगदाणे गुळासोबत खाल्ल्याने सांधे आणि पाठदुखीचा त्रास कमी होतो. भिजवलेल्या शेंगदाण्यांमुळे दृष्टी आणि स्मरणशक्ती वाढते, असं म्हणतात. तसंच शारीरिक ऊर्जा आणि जोमही कायम राहतो. दिवसभर व्यक्तीला खूप उत्साही वाटतं.
शेंगदाणे खाल्ल्यास हृदयाचे आजार होण्याचा धोका कमी राहतो. दररोज भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने रक्तातली साखर नियंत्रित राहते. मधुमेह नियंत्रित करण्यासाठी शेंगदाण्यांचं सेवन करावं. मधुमेहग्रस्त रुग्णांनी दररोज सकाळी नियमितपणे पन्नास ग्रॅम शेंगदाणे खाल्ल्यास त्यांना बराच आराम मिळतो.
कर्जासह जीवनातील अन्य समस्या सुटण्यासाठी `हे` व्रत ठरेल फलदायी
शेंगदाण्यात असलेली पोषक तत्त्वं शरीराला कॅन्सरपासून दूर ठेवू शकतात. दररोज 20 शेंगदाणे खाल्ले तर कॅन्सरसारख्या घातक आजारापासून बचाव होऊ शकतो. शेंगदाण्यांमध्ये असलेले पोषक घटक (Peanuts protein) खोकला आणि भूक न लागण्याची समस्या दूर करतात. शेंगदाण्यातले अँटी-ऑक्सिडंट्स, लोह, फोलेट, कॅल्शियम आणि झिंक हे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. शेंगदाणे खाताना काही गोष्टींची काळजी घ्यावी. खोकला असल्यास शेंगदाण्यांची सालं काढून खावेत आणि लगेच पाणी न पिता किमान अर्धा तास गेल्यानंतर पाणी प्यावं.
100 ग्रॅम कच्च्या शेंगदाण्यात एक लिटर दुधाएवढी प्रथिनं आढळतात. दररोज शेंगदाण्यांचं सेवन केल्यास तुमच्या शरीराला दूध, बदाम, तूप, मांस आणि अंडी यांतून मिळणारी सर्व पोषक तत्त्वं मिळतात. भिजवलेले शेंगदाणे (Soaked Peanuts) तुम्ही कधीही आणि कोणत्याही ऋतूत खाऊ शकता. शेंगदाण्यांचं अति सेवन मात्र करू नये. ते आरोग्याला हानिकारक असतं. योग्य प्रमाणात शेंगदाणे खाल्ले, तर त्यापासून तुम्हाला कित्येक आरोग्यदायी लाभ मिळतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips