मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

मन नाही तर मेंदूत दडलंय तुमच्या भावनांचं सिक्रेट; दु:ख विसरून कायम आनंदी राहण्याचं समजून घ्या फंडा

मन नाही तर मेंदूत दडलंय तुमच्या भावनांचं सिक्रेट; दु:ख विसरून कायम आनंदी राहण्याचं समजून घ्या फंडा

या काळात मूड स्विंग होण्यास सुरूवात होते. सतत मूड बदलत राहतो. रागावणे आणि रडणे असे बदल जाणत असले तरी  घाबरू नये.

या काळात मूड स्विंग होण्यास सुरूवात होते. सतत मूड बदलत राहतो. रागावणे आणि रडणे असे बदल जाणत असले तरी घाबरू नये.

आपल्या मेंदूमध्ये (Brain) असे काही हार्मोन्स असतात जे आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवतात.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 19 मे: आतापर्यंत तुम्हाला वाटत असेल की, एखाद्या घटनेत आपण आनंदी होतो किंवा दु:खी हे आपलं मन ठरवतं. पण तसं नाही. आपण दु:खी व्हायचं की आनंदी हे आपले हार्मोन्स (Hormonesठरवतात. आपल्या शरीरात काही असे हार्मोन्स असतात जे आपल्याला आनंदी किंवा सकारात्मक (Positive) ठेवण्यासाठी कारणीभूत असतात. डोपामाइन (Dopamine) हे असंच केमिकल (Chemicalमेसेंजर आहे. जो मेंदूला (Brain) चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रेरित करतो.

जेव्हा मेंदूमध्ये मोठ्या प्रमाणात डोपामाइन केमिकल (Dopamine Chemical) रिलीज होतं. तेव्हा सकारात्मक भावना म्हणजेच प्रेरणा, चांगल्या आठवणी, आनंद आणि समाधान मिळतं. त्याचबरोबर जेव्हा हे केमिकल कमी रिलीज होतं तेव्हा आपल्याला निराश वाटायला लागतं.

डोपामाइन केमिकलच प्रमाण वाढवणं किंवा कमी करणं मानवी मेंदू आणि न्यूरोट्रांसमीटर बँड्सवर अवलंबून असतं. मात्र त्याला नैसर्गिकरित्या (Naturally) काही प्रमाणात वाढवता येऊ शकतं. सकारात्मक आणि आनंदी जगण्यासाठी या गोष्टी नक्की करा.

भरपूर प्रमाणात प्रोटीन घ्या

हेल्थलाईन नुसार, प्रोटीन (Protein) मध्ये 12 प्रकारचे अमिनो अॅसिड (Acid) असतात. यातले काही अॅसिड डोपामाइन केमिकल बनवण्याचं काम करतात. एका संशोधनानुसार प्रोटीनयुक्त पदार्थांमध्ये असणाऱ्या अमिनो अॅसिड मुळे मेंदूमध्ये डोपामाइनची पातळी पटकन वाढते. त्यामुळे विचार करण्याची क्षमता आणि स्मरणशक्तीही मजबूत होते.

सॅच्युरेटेड फॅटचा कमी वापर

एका संशोधनानुसार सॅच्युरेटेड फॅट, बटर, फूल फॅट डेअरी प्रोडक्ट, पामतेल, नारळाचं तेल यांचं जास्त प्रमाणात सेवन मेंदूमध्ये डोपामाइनची लेव्हल कमी करतं. त्यामुळे जेवणात सॅच्युरेटेड फॅटचा वापर कमी करा.

प्रोबायोटिकचा वापर

संशोधकांच्या मते आतडे आणि मेंदूचा जवळचा संबंध असतो. आपल्या इंटेस्टाइनमध्ये गुड बॅक्टेरीया असेल तर त्यामुळे मेंदूमध्ये डोपामाइन लेव्हलही वाढायला लागते. ज्याचा परिणाम मूड आणि वागण्यावर व्हायला लागतो. त्यामुळे प्रोबायोटिक प्रोडक्टचं सेवन करा.

(Yuck! सकाळी उठताच स्वतःची लघवी पिते ही महिला; कारण वाचून तर बसेल आणखी धक्का)

नियमित व्यायाम

आवड्यामधून 6 दिवस दररोज 1 तास योगा केल्याने आपल्या डोपामाइन केमिकल लेव्हलवर याचा परिणाम होतो. मेंदूमध्ये डोपामाइन लेव्हल कमी झाल्याने पार्किंसनसारखा आजार होतो. त्यामुळे दररोज योगा आणि व्यायाम केल्याने आपला मूड चांगला राहतो आणि अनेक आजारांपासून आपलं संरक्षण होतं.

पुरेशी झोप

झोप कमी झाल्यास आपल्या मेंदूमधील कोमिकलवर त्याचा परिणाम होतो. पूर्ण झोप होत नसल्याने शरीरात नॅचरल डोपामाइन रिदम डिस्टर्ब होतं आणि काही मानसिक आजार डोकं वर काढतात.

(Rheumatoid Arthritis: पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त त्रासदायक; काय आहेत लक्षणं)

म्युझिक आण मेडिटेशन

संशोधनानुसार म्युझिक ऐकल्याने मेंदूमध्ये 9 टक्के डोपामाइन वाढतं. तर आणखी एका संशोधनानुसार 1 तास म्युझिक ऐकल्याने 64 टक्के डोपामाइन वाढतं. त्यामुळे म्युझिक ऐकावं आणि योगा करावा.

सूर्यप्रकाशात बसा

डिप्रेशनमध्ये असाल किंवा निगेटिव्ह भावना मनात येत असतील तर अशा वेळी घरात राहण्यापेक्षा बाहेर निघून सूर्यप्रकाशात बसावं. सनलाईट एक्सपोजर आपल्या शरीरात डोपामाइनला बूस्ट करतं.

First published:

Tags: Health Tips, Lifestyle, Mental health