मुंबई, 16 मे: केवळ कोरोना काळातच नाही तर, आपली इम्युनिटी (Immunity) चांगली करण्यासाठी हेल्दी डाएट, योगा आणि एक्ससाईज करणं महत्वाचं आहे. तसचं काही प्रमाणात व्हिटॅमीन सी देखील फायदेशीर आहे. आज काल लोक इम्युनिटी (Immunity) वाढवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय व्हिटॅमीन सी मिळवण्यासाठी सप्लीमेंट घेतात. काही जण आंबट फळं खाऊन व्हिटॅमीन सीची गरज भागवत आहेत. तर, त्याच्याबरोबरीने व्हिटॅमीन सी सप्लीमेंटही घेतात. मात्र व्हिटॅमीन सीच्या अतिरिक्त सेवनाने (Excess Intake of Vitamin C) आपल्या शरीरावर वाईट परिणामही होऊ शकतो.
(लस घेताना मराठी अभिनेत्रीचा ड्रामा, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स Video Viral)
छातीत जळजळ
जास्त प्रमाणात व्हिटॅमिन-सी घेतल्यास छातीत जळजळ होऊ शकते. यामुळे आपल्याला छातीच्या खालच्या आणि वरच्या भागात तसंच, घशातही जळजळ होण्याचा त्रास होऊ शकतो.
पोटात जळजळ
व्हिटॅमिन-सी जास्त प्रमाणात घेतल्यामुळे पोटात जळजळ होणो पोट खेचल्यासारखं वाटणे, पोट फुगण्याचा त्रासही होऊ शकतो. त्यामुळे पोटदुखीही होऊ शकते.
(Antibiotic चा अति डोस ठरतोय घातक; नष्ट होण्याऐवजी अधिक मजबूत होत आहेत बॅक्टेरिया)
मूत्रपिंडाचा त्रास
जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी घेतल्याने मूत्रपिंडावर दुष्परिणाम होण्याचा धोका असतो. यामुळे किडनी स्टोन तयार होण्याची शक्यता असते.
(Dementia: स्मृतिभ्रंशावर औषधं घ्याच, पण त्याबरोबर करा हे उपाय, होईल फायदा)
उलट्या आणि अतिसार
जास्त प्रमाणात व्हिटॅमिन-सी पूरक आहार घेतल्यास उलट्या आणि अतिसाराचा त्रास होऊ शकतो. पोट खराब होऊन शरीराच्या डिहायट्रेड होण्याचाही प्रॉब्लेम होऊ शकतो.
डोकेदुखी आणि निद्रानाश
जास्त प्रमाणात व्हिटॅमिन-सी घेतल्यामुळे डोकं जड होणं आणि तीव्र डोकेदुखी देखील होऊ शकते. तर, झोप न येण्याची समस्या देखीलव्हिटॅमिन-सी जास्त प्रमाणात घेतल्यामुळे होऊ शकते.
(प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम नसतं; तो असतो Hormones चा झोल!)
अस्वस्थ वाटणे
जास्त प्रमाणात व्हिटॅमिन-सी घेतल्याने अस्वस्थ वाटाला लागतं. बैचेनी वाढायला लागते. त्यामुळे इम्युनिटी वाढवण्यासाठी व्हिटॅमीन सी घेत असलात तरी, योग्य प्रमाणात घेणं किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणं चांगलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips