नवी दिल्ली 04 डिसेंबर : दमा हा असा आजार आहे, वरवर पाहता ती व्यक्ती स्वस्थ वाटत असली तरी, ती बरी नसते. केव्हाही त्यांना दम्याचा अटॅक येऊ शकतो. याच भीतीत दम्याचे पेशंट जगत असतात. अलिकडे कोरोनामुळे दम्याच्या रुग्णांना स्वत:ची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. ज्यांना श्वसानासंबंधी त्रास आहेत किंवा श्वासोच्छवासाच्या आजाराने ग्रस्त किंवा ज्यांना आणखी काही गंभीर आजार आहेत, त्यांच्यावर कोरोनासारख्या विषाणूचा परिणाम जास्त होतो.
दमा हा एक दीर्घकाळ टिकणारा रोग आहे, त्यामुळे रुग्णांना दीर्घकालीन उपचारांची आवश्यकता असते. श्वासोच्छवासाला त्रास, छातीत दुखणं, खोकला आणि अस्वस्थ वाटणं, असा त्रास दम्याच्या रुग्णांना होतो. दम्याच्या अटॅकचं मुख्य कारण असतं शरीरातील कफ वाढणं आणि श्वासनलिका अरुंद होतात, याशिवाय इतरी अनेक कारणांमुळे दम्याचा अटॅक येतो. दम्याच्या रुग्णांना इनहेलर वापरावं लागतं. याबरोबर दम्याच्या रूग्णांनी आहाराकडेही लक्ष द्यायला हवं.
दम्याच्या रुग्णांचा आहार
व्हिटॅमीन-सी
व्हिटॅमीन सीमध्ये ऍन्टीऑक्सिडंन्ट मुबलक प्रमाणात असतं. ज्यामुळे फुफ्फुसांचं संरक्षण होतं. व्हिटॅमीन सीयुक्त आहार घेणाऱ्यांमध्ये दम्याचा अटॅक येण्याचा धोका कमी असतो. दम्याच्या रूग्णांनी संत्रा, ब्रोकोली, किवी ही फळं नक्की खावीत.
मध आणि दालचिनी
दम्याच्या रुग्णांनी मध आणि साखरेचा मर्यादित प्रमाणात वापर करावा. पण, दमाच्या रुग्णांसाठी मध आणि दालचिनी यांचं मिश्रण खूप फायदेशीर आहे. रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा मध, 2 ते 3 चिमूटभर दालचिनी पावडरबरोबर घेतल्यास फुफ्फुसांशी संबंधित रोग कमी होतात.
तुळस
आयुर्वेदिक औषध म्हणून तुळशीला महत्व आहे. तुळशीमध्ये ऍन्टीऑक्सिडंन्ट मुबलक प्रमाणात आढळतात. चहामध्ये 2 ते 3 तुळशीची पानं घालून प्यायल्याने दम्याच्या रुग्णांमध्ये अटॅकचा धोका कमी होतो. तुळशीमुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. याबरोबर तुळस फ्लू आणि सर्दी, खोकला यासारख्या आजारांमध्येही आराम देते.
विविध प्रकारच्या डाळी
डाळींना विविध प्रकारच्या प्रॉटिनचा सोर्स मानलं जातं. काळे चणे, मूग डाळ, सोयाबीनसारखी कडधान्य आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. याची डाळ खाल्ल्यास फुफ्फुसं अधिक मजबूत बनतात आणि संक्रमणापासून बचाव होतो. त्यामुळे दम्याच्या रुग्णांनी नियमितपणे किमान एक प्रकारची डाळ खावी. याशिवाय डाळीमुळे पचनशक्तीही सुधारते.
हे वाचा - हिवाळ्यात कोंडा आणि केसगळतीचा त्रास वाढतो! हे घरगुती उपाय नक्की करून बघा
हिरव्या भाज्या
हिरव्या भाज्या फुफ्फुसांसाठी खूप फायदेशीर असतात. हिरव्या भाज्या खाल्ल्यामुळे फुफ्फुसात कफ जमा होत नाही. त्यामुळे दम्याचा त्रास होण्याची शक्यता कमी होते. हिरव्या भाज्या खाल्ल्यास रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्या. )
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Winter, Winter session