मराठी बातम्या /बातम्या /heatlh /Health Tips: विविध आजारांपासून दूर राहायचं असेल तर Walking महत्त्वाचं, हे आहेत 7 महत्त्वाचे फायदे

Health Tips: विविध आजारांपासून दूर राहायचं असेल तर Walking महत्त्वाचं, हे आहेत 7 महत्त्वाचे फायदे

सध्या वॉकसाठी घराबाहेर पडण्याची भीती वाटत असेल तर, आपल्या फ्लॅटच्या गॅलरीत किंवा एखाद्या रुममध्ये देखील वॉक(Walk)घेऊ शकता. दिवसातून किमान 20 मिनटं ते 1 तास चालणं आवश्यक आहे.

सध्या वॉकसाठी घराबाहेर पडण्याची भीती वाटत असेल तर, आपल्या फ्लॅटच्या गॅलरीत किंवा एखाद्या रुममध्ये देखील वॉक(Walk)घेऊ शकता. दिवसातून किमान 20 मिनटं ते 1 तास चालणं आवश्यक आहे.

Benefits Of Daily Walking: दररोज अर्धा तास चालत असाल तर, यामुळे कोणत्याही प्रकारचे कोरोनरी हृदयाशी संबंधित आजर (Coronary heart disease) होण्याचा धोका 19 टक्क्यांनी कमी होतो

नवी दिल्ली, 23 मे: कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंग, मास्क परिधान करणे याबरोबरच योग्य व्यायामही महत्त्वाचा आहे. सध्या मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडू शकत नसलो तरी घराच्या अंगणात  किंवा अगदीच शक्य नसेल तर अगदी घरातही चालण्याचा व्यायाम करता येऊ शकतो. चालण्याला (Walking) जगभरात सर्वोत्तम व्यायामांच्या (Best Exercise) कॅटेगरीत महत्वाचं स्थान आहे. चालणं हा व्यायाम कोणत्याही वयोगटातील लोकं, कोणत्याही उपकरणांशिवाय करू शकतात आणि तेही कुठेही. दररोज 20 मिनिटांपासून एका तासापर्यंत चालू शकता.

दररोज चालण्याने शरीराला बरेच फायदे (Benefits of Walking) मिळतात. त्यामुळे आपला फिटनेस (Fitness) बराच काळ टिकून राहतो आणि बर्‍याच आजारांपासून आपलं संरक्षणही होतं. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनामुळे आपली जीवनशैलीच खूप बदलली आहे. अनेक राज्यात कोरोना (corona) मुळे लॉकडाऊन (Lockdown) लागू आहे. अशा परिस्थितीत घराबाहेर पडणं अशक्य आहे. त्यामुळे आपल्या फ्लॅटच्या गॅलरीत किंवा एखाद्या रुममध्ये देखील वॉक (Walk) घेऊ शकता. दिवसातून किमान 20 मिनटं ते 1 तास चालणं आवश्यक आहे. त्यासाठी घड्याळात वेळ पाहून चालालयला सुरुवात करा.

(हे वाचा- VIDEO: कोविड सेंटरमधील डॉक्टरांनी गायलं सुशांतचं गाणं, मनसोक्त थिरकले रुग्ण)

आताच्या काळात फिटनेस (Fitness)राखण्यासाठी घरातल्याघरात करण्यासारखा हा सोपा व्यायाम आहे. चालण्याचे काय फायदे आहेत जाणून घेऊया.

1. स्ट्राँग हार्ट

हेल्थलाईनच्या मते,जर आपण दररोज अर्धा तास चालत असाल तर, यामुळे कोणत्याही प्रकारचे कोरोनरी हृदयाशी संबंधित आजर (Coronary heart disease) होण्याचा धोका 19 टक्क्यांनी कमी होतो. दररोज बराच वेळ आणि स्पीडने चालण्याने आजार दूर पळतात.

2. ब्लड शुगर कंट्रोल

दररोज जेवणानंतर चालल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात येते. एका संशोधनानुसार, दररोज जेवल्यानंतर 15 मिनिटं चालण्याने ब्लड शुगर कंट्रोल होऊ शकते.

(हे वाचा- Positive News:देशातील ऑक्सिजन तुटवड्याचं संकट दूर होण्याच्या मार्गावर! मागणीत घट)

3.जॉइंट पेन

हिप आणि गुडघ्याच्या हाडात वेदना होत असतील तर, दररोज वॉक करायला हवा. त्यामुळे स्नायू बळकट होऊन, लूब्रीकंट वाढण्यास खूप मदत होते. ज्यांना आर्थराइटिस आहे त्यांनी तर, दररोज चाललं पाहिजे.

4. प्रतिकारशक्ती वाढवते

वातावरणातील बदलामुळे लगेच खोकला आणि सर्दी होण्याचा त्रास असेल तर, इम्‍यूनिटी वाढवण्यासाठी रोज चालावे. यासाठी फ्लू होण्याच्या सिझनमध्ये 1000 लोकांवर संशोधन केलं गेलं. त्यानुसार जे लोक 30 ते 45 मिनीटं वॉक घेत होते. त्यांची आजारी पडण्याची शक्यता 45 टक्क्यांनी कमी झाली असल्याचं लक्षात आलं.

5. मेंदूसाठी चांगलं

आठवड्यातून 2 तास चालण्याने मेंदूचे टिश्यू चांगल्या प्रकारे काम करतात. ज्यामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका 30 टक्क्यांनी कमी होतो.

(हे वाचा- PPE Kits बाबत सरकारवर टीका करणाऱ्या डॉक्टरचा मृत्यू, निलंबनामुळे नैराश्यान घेरलं)

6. वजन राहतं नियंत्रित

दररोज 30 मिनिटं चालण्याने लठ्ठपणाची समस्या 50 टक्क्यांनी कमी होते. चालण्यामुळे मसल्स मजबूत होतात आणि कामं करण्याचा उत्साह वाढतो.

7. मूड चांगला राहतो

संशोधकांनूसार, दररोज 30 मिनिटं चालण्याने मूड चांगला राहतो. तर,यामुळे आपल्यामध्ये तणाव, भीती, नैराश्य आणि नकारात्मक विचार देखील कमी होतं आणि ऊर्जा देखील वाढते. एवढेच नाही तर, मानसिक आरोग्य देखील चांगलं राहतं.

First published:

Tags: Coronavirus, Health Tips