Home /News /heatlh /

हे तेल वजन वाढवत नाही तर कमी करतं, नियमित वापरणं ठरू शकतं फायदेशीर

हे तेल वजन वाढवत नाही तर कमी करतं, नियमित वापरणं ठरू शकतं फायदेशीर

मोहरीच्या तेलात अ‍ॅन्टी-ऑक्सिडन्ट्स गुण असतात. त्यामुळे त्वचेवर खाज सुटणे, आग होणे असे त्रास कमी होतात. या तेलाने त्वचेची मॉलिश करावी.

मोहरीच्या तेलात अ‍ॅन्टी-ऑक्सिडन्ट्स गुण असतात. त्यामुळे त्वचेवर खाज सुटणे, आग होणे असे त्रास कमी होतात. या तेलाने त्वचेची मॉलिश करावी.

झटपट वजन कमी (Weight Loss) करायचं असेल तर, नारळ तेलाचा (Coconut Oil) उपयोग होऊ शकतो त्यासाठी रोजच्या आहारात समावेश करायला हवा.

    दिल्ली, 31 मे : आजकाल वजन वाढण्याची समस्या (Weight Gain Problems) नॉर्मल झालेली आहे. वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी आपण कितीतरी उपाय करतो. पण, वाढलेलं वजन सहजासहजी कमी होत नाही. अशा वेळेस आहारात बदल (Change in Diet) किंवा एखाद्या वस्तूचं सवेन फायदेशीर (Benefit) ठरतं. आहारातील जास्त तेल (Oil) खाण्याची सवय वजन वाढीचं एक कारण आहे. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी जेवणातून तेल कमी करायला सांगितलं जातं. मात्र, असं एक तेल आहे ज्यामुळे वजन वाढण्याऐवजी कमी होतं. हे तेल आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे. पण, आपल्याला त्याचे काही मर्यादित उपयोग माहिती आहेत. वजम कमी करण्यासाठी नारळाचं तेल (Coconut Oil) वापरता येतं.जाणून घेऊयात याचे उपयोग आणि वापर सर्वच फॅट (Fat) खराब नसतात. काही हेल्दी फॅट(Healthy Fat) आपलं चयापचय (Digestion) सुधारतात. असंच एक फॅट म्हणजे, नारळ तेल नारळाचं तेल केस, त्वचा आणि आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. नारळ तेलामुळे वजनही कमी होण्यास मदत होते. नारळ तेलात व्हिटॅनमीन ई आणि ऍन्टीऑक्सिडंट असतं त्यामुळे हार्मोनल बॅलन्स बिघडण्याचा त्रास कमी होतो. त्यामुळे वजन नियंत्रीत राहतं. तर, नारळ तेलामुळे मेटबॉलिजम सुधारतं. भूक आणि चरबी कमी नेहमीच्या आहारात वापरलं जाणारं तेल आणि नारळ तेलात फरक आहे. नारळ तेलात फॅट कमी असतं, त्यामुळे इतर तेलाप्रमाणे शारीरात गेल्यावर त्याचं रुपांतर चरबीत होत नाही. परिणामी वजन नियंत्रणात राहतं. त्यामुळे नारळ तेलात बनलेले पदार्थ पौष्टिक असतात. नारळ तेलामुळे पचन हळूहळू होतं. म्हणून अन्नास रक्तप्रवाहात जाण्यास जास्त वेळ लागतो. त्यामुळे आहारात बदल करुन वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल आणि भूक नियंत्रित करायची असेल तर, नारळ तेलातले पदार्थ खावेत. मेटाबॉलिजम सुधारतं नारळाच्या तेलात आपल्या शरीरासाठी लागणारं मीडियम ट्रायग्लिसराईड लोरिक अॅसिड आहे. जे एक प्रकारचं फॅटी अॅसिड आहे. त्यामुळे शरीराच्या गरजेनुसार फॅट बनतं. त्यामुळे मेटाबॉलिजम सुधारून वजन नियंत्रणात राहायला जास्त फायदा होतो. नारळ तेलाच्या सेवनाने कमरेचा घेर कमी होतो. त्यासाठी दिवसातून एक चमचा तेल खाल्ल्यासही फायदा होतो. हे ही वाचा-Yoga Guide राग, चिडचिडेपणा यासह अनेक गोष्टींसाठी फायदेशीर ठरणारी आसनं रक्तातील साखर नियंत्रणात येते ज्यांना डायबेटीस आहे, त्यांना वजन वाढण्याची समस्या असते. डायबेटीसच्या रुग्णांमध्ये चयापचय बिघडल्याने काही काळाने लठ्ठपणा वाढतो. पण, नारळ तेल रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतं. परिणामी, आपल्या शरीरात तयार झालेली ऊर्जा वापरली जाते आणि कार्बोहायड्रेचं चरबीत रुपांतर होणं थांबतं. रोग प्रतिकारशक्ती वाढते नारळाच्या तेलामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. नारळाच्या तेलामध्ये लॉरिक अ‍ॅसिड आहे. लॉरिक अ‍ॅसिडमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. रोगजंतू आणि कोणत्याही संसर्गाविरोधात लढण्याचं काम लॉरिक अ‍ॅसिड करतं. यामुळे वजन कमी करण्यासही मदत होते. वजन कमी करण्यासाठी आहारात बदल करताना व्यायमही करायला हवा, शारीरात लॉरिक अ‍ॅसिड असेल तर, शरीराची ताकद वाढते आणि जास्त वेळ व्यायाम करणं शक्य होतं. कसं वापरायचं ? वजन कमी करण्यासाठी नारळ तेल वापरताना त्याचा योग्य प्रमाणात वापरही आवश्यक आहे. ज्यांना नारळ तेल खाणं शक्य आहे ते एक छोटा चमचा नारळ तेल खाऊ शकतात.पण, त्यासाठी व्हर्जिन ऑईलच वापरावं. तसतर बाजारात विविध कंपन्यांचं नारळ तेल उपलब्ध असतं. पण, त्यात भेसळही असू शकते. त्यामुळे चांगल्या प्रतीचं व्हर्जिन ऑईल निवडावं. नेहमी खाण्याची सवय नसेल तर, सुरवातीला कमी प्रमाणात खावं. सॅलडमध्येही वापरता येतं. जेवण बनवताना एक एक मोठा चमचा नारळ तेल वापरू शकता. कोणत्याही किराणा दुकानात नारळ तेल सहज उपलब्ध होतं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Home remedies

    पुढील बातम्या