मराठी बातम्या /बातम्या /heatlh /health tips : हिवाळ्यात कमी पाणी प्यायल्यामुळे होऊ शकतो गंभीर आजार? ही माहिती जाणून द्या

health tips : हिवाळ्यात कमी पाणी प्यायल्यामुळे होऊ शकतो गंभीर आजार? ही माहिती जाणून द्या

सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचा रस प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते, शरीराला अनेक संक्रमणांपासून दूर ठेवता येते आणि वजन कमी होते.

सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचा रस प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते, शरीराला अनेक संक्रमणांपासून दूर ठेवता येते आणि वजन कमी होते.

शरिरातल्या विषारी पदार्थांना बाहेर फेकण्यासाठी पाण्याची गरज असते. त्यामुळे शरीरातली पाण्याची पातळी बिघडली तर भयंकर आजारांचा सामना ( Avoid Diseases In Winter) करावा लागू शकतो.

    मुंबई, 15 डिसेंबर : हिवाळा (Winter Health Care Tips) सुरू झाला असून, वातावरणातही गारवा जाणवू लागला आहे. वातावरण थंड असल्याने तहान लागण्याचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे पाणी पिण्याकडे दुर्लक्ष होतं. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. पाणी (Water) म्हणजे जीवन असून आयुर्वेदात पाणी पिण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. पाणी हा आपल्या शरीराचा एक सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. आरोग्यासाठी नियमित व पुरेसं पाणी पिणं आवश्‍यक आहे. शरिरातल्या विषारी पदार्थांना बाहेर फेकण्यासाठी पाण्याची गरज असते. त्यामुळे शरीरातली पाण्याची पातळी बिघडली तर भयंकर आजारांचा सामना ( Avoid Diseases In Winter) करावा लागू शकतो.

    मानवी शरीरामध्ये 60 टक्के पाणी असतं. आपलं शरीर दररोज 5 लिटर पाणी शरीरातून बाहेर टाकतं. 10% पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास तहान लागते. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तहान लागेल तेव्हा पाणी पिणं निरोगी राहण्यासाठी आवश्यक आहे. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने आरोग्य चांगलं राहण्यास मदत होतं. हिवाळ्यात कोमट पाणी प्यावं. तसंच उभं राहून पाणी पिऊ नये. त्याचा किडनी आणि सांध्यांवर विपरीत परिणाम होतो, असे वृत्त दैनिक भास्करने प्रसिद्ध केले आहे.

    रुपाली पाटील ठोंबरेंच्या राजीनाम्याचं कारण आलं समोर, मनगटावर 'घड्याळ' बांधणार?

    वातावरण बदल झाल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती (Immune System) कमकुवत होते. म्हणूनच आपण आजारी पडतो. पाणी कमी प्यायल्याने शरीरातलं पाणी कमी होतं. त्याला डिहायड्रेशन म्हणतात. तसंच अपचनाचा त्रास होतो. हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी पुरेसं पाणी पिणं आवश्यक आहे. प्रत्येकाने दररोज 8 ते 10 ग्लास पाणी पिणं आवश्यक आहे. शरीराची पाण्याची गरज ही लिंग, वय आणि महिलांमध्ये गर्भवती असताना बदलते. शरिराला योग्य प्रमाणात पाणी मिळालं नाही, तर समस्या निर्माण होऊ लागतात. म्हणून पाणी कधी, किती आणि कसं प्यावं हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. दररोज पाण्याचं व्यवस्थापन (Manage Water) कसं करावं, याबद्दल हेल्थलाइनने माहिती दिली आहे.

    पाणी कमी पिण्याचे परिणाम

    कमी पाणी पिण्याचा परिणाम किडनी आणि मूडवर होतो. कमी पाणी प्यायल्याने विषारी पदार्थ शरीराबाहेर जात नाहीत. ते शरीरात जमा होतात. याचा परिणाम आरोग्यावर होतो आणि आजारांना आमंत्रण मिळतं.

    शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास त्याचा हृदयावरसुद्धा परिणाम होतो. शरीरात पाण्याची कमतरता असल्यास रक्तप्रवाहावर परिणाम होतो आणि सर्व भागांपर्यंत रक्त वेळेत पोहोचू शकत नाही. त्यामुळे हृदयाला मोठा धोका निर्माण होतो.

    पाणी कमी प्यायल्याने सांधेदुखीचा त्रास होतो. तसंच कमी पाण्यामुळे त्वचेचा ओलसरपणा कमी होतो आणि त्वचा कोरडी पडते. यामुळे चेहऱ्यावरची चमक निघून जाते. पाणी न मिळाल्याने किडनीसुद्धा फेल होऊ शकते किंवा किडनीसंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. याशिवाय, शरीरात पाण्याची कमतरता होऊन डिहायड्रेशन होतं आणि इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात. यामुळे शरीरातल्या पेशींना संदेश मिळत नाही आणि स्नायूंवर ताण पडतो.

    हिवाळ्यात कोमट पाणी फायदेशीर

    हिवाळ्यात कोमट पाणी प्यायल्याने पचनाशी संबंधित समस्या दूर होतात आणि रक्ताभिसरण सुधारतं. तसंच स्नायूंचा ताण कमी होतो. सर्दी, खोकला यांपासून आराम मिळतो. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी 1 ग्लास कोमट पाण्यात लिंबू रस घालून प्याल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसंच कोमट पाणी प्याल्याने शरीराचं तापमान वाढतं. यामुळे घाम येतो आणि घामाद्वारे शरीरातले विषारी पदार्थ बाहेर पडतात. तसंच मासिकपाळीमध्ये कोमट पाणी पित राहिल्यास आराम मिळतो.

    पाणी पिण्यासाठी रूटीन

    काही व्यक्तींना पाणी पिण्याची आठवण राहत नाही. अशा व्यक्ती काही अॅप्सची मदत घेऊ शकता. पाणी पिण्यासाठी रूटीन तयार करावं. तसंच आपल्याजवळ आवडती पाण्याची बाटली ठेवावी. स्ट्रॉ असलेल्या बाटलीने पाणी प्यावं. यामुळे सहज घोट-घोट पाणी पिता येतं. रात्री झोपताना पाण्याची एक बाटली आपल्याजवळ ठेवावी. रात्रभर पाणी न प्याल्याने डिहायड्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर बाटलीमधलं पाणी प्यावं. तसंच थंडीत पाणी प्यायलं जात नसेल, तर लिंबू पाणी किवा जिऱ्याचं पाणी प्यावं.

    कोणी किती पाणी प्यावं (Water Drink Daily According To Age And Gender) -

    4 ते 8 वर्ष वयोगटातल्या बालकांनी दिवसभरात 8 ग्लास किंवा 1.18 लीटर पाणी प्यावं.

    9 ते 13 वर्षीय वयोगटातल्या मुलांनी दिवसभरात 11 ते 12 ग्लास किंवा 1.65 ते 1.89 लीटर पाणी प्यावं.

    14 ते 18 वर्षीय वयोगटातल्या मुलांनी 12 ते 17 ग्लास किंवा 1.89 ते 2.60 लीटर पाणी प्यावं.

    19 वर्षं किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या पुरुषांनी 20 ग्लास किंवा 3 लीटर पाणी पिणं गरजेचं असतं.

    19 वर्षं किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या महिलांनी 14 ग्लास किंवा 2 लीटर पाणी प्यायला हवं.

    गर्भवती महिलांनी 16 ग्लास किंवा 2.36 लीटर पाणी प्यावं.

    स्तनपान करणाऱ्या महिलांनी 20 ग्लास किंवा 3 लीटर पाणी प्यायला हवं.

    पाणी पिण्याची योग्य पद्धत (The Right Way of Drinking Water) -

    पाणी नेहमी बसून आणि आरामात प्यावं. उभं राहून पाणी पिऊ नये. घोट-घोट करून पाणी प्यावं. एकाच दमात ग्लास भरून पाणी पिणं चुकीचं आहे. कोमट पाणी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं.

    पाणी कधी प्यावं

    तहान लागल्यानंतर लगेचच पाणी प्यावं. जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर लगेचच पाणी पिऊ नये. जेवण्यापूर्वी आणि नंतर पाणी पिण्यासाठी नेहमी किमान 30 मिनिटांचं अंतर ठेवावं. उच्च रक्तदाब, पोटाचा त्रास, लघवी (urine) करताना जळजळ होत असलेल्यांनी अधिक पाणी प्यावं.

    कधी पाणी पिऊ नये

    गरम चहा किंवा कॉफी घेतल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये. काकडी, टरबूज, मका खाल्यानंतर पाणी पिणं टाळावं. बाहेरून आल्यानंतर शरीराचे तापमान सामान्य झाल्यावर पाणी प्यावं. थंड पदार्थ खाल्ल्यानंतर गरम पाणी आणि गरम जेवण केल्यानंतर अगदी थंड पाणी पिऊ नये.

    First published:

    Tags: पाणी