नवी दिल्ली,31 मे : उन्हाळ्यामध्ये (Summer Season) शरिराला थंडावा मिळावा यासाठी घराघरांत बनणारा पदार्थ म्हणजे, ताक किंवा लस्सी. दही (Yogurt) हा एक पौष्टीक पदार्थ आहे. त्यामुळं पचनक्रिया (Digestion) सुधारते. ज्यांना उन्हाळ्यात बद्धकोष्टाचा (Constipation) किंवा पोटात उष्णता (Stomach warmth) वाढण्याचा त्रास असेल, त्यांनी दही आणि दह्यापासून बनणारे पदार्थ खावेत. दह्यापासून बनणारी लस्सी किंवा ताक यामुळं वजनही कमी (Weight loss) होतं. दह्यात कॅल्शियम, प्रोटीन, झिंक आणि व्हिटॅमिन बी 12 (Vitamin B12)भरपूर प्रमाणात असतं. तसेच दह्यापासून बनणाऱ्या लस्सी आणि ताक यांचे अनेक फायदे आहेत.
वजन कमी करण्यास फायदेशीर
लस्सी आणि ताक दोन्ही प्यायल्याने फायदा होतो. त्यात व्हिटॅमीन सी असतं. त्यामुळं इम्युनिटी सुधारते. पण, वजन कमी करण्यासाठी लस्सीपेक्षा ताकच अधिक चांगलं मानलं जातं. ताकामध्ये कॅलरीज कमी असतात. शिवाय ताक जेवणाबरोबर घेतल्यास भूक लवकर मिटते. त्यामुळं आपण कमी जेवतो.
( Alert! केरळात मान्सूनचं आगमन लांबणीवर; 24 तासांत पुण्यासह मुंबईत पूर्वमोसमी पाऊस)
लस्सी
पोट लवकर भरण्यासाठी लस्सी प्यावी, यामुळं लवकर भूकही लागत नाही. ताकापेक्षा जास्त घट्ट असल्यानं यात फॅट आणि कॅलरीजही जास्त असतात. लस्सी मीठ घालूनही बनवता येते. ज्यांना आवडते ते साखर घालूनही पितात. पण, त्यामुळं कॅलरीजचं प्रमाण वाढतं. बाजारात रेडी लस्सीही मिळते. त्यात वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर वापरलेले असतात. लस्सीमुळे इम्युनिटी वाढते आणि प्रोबायोटिक्स असल्यानं पोटाचे त्रास थांबतो. पोटात सूज आली असेल तर, लस्सी प्यावी. लस्सी शरिरातील उष्णता कमी करते आणि अॅसिडीटी झाली असेल तरीही लस्सी प्यायल्याने फायदा होतो.
लस्सी बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे. घट्ट दह्यामध्ये साखर घालून चांगलं फेटून घ्यावं. त्यात चवीसाठी कोणतही सिरप टाकता येतं.
(दुसऱ्या लाटेत तरुणांच्या मृत्यूचं कारण ठरतोय Happy Hypoxia, वाचा काय आहेत लक्षणं)
ताक
उन्हाळ्यात ताक आवडीनं प्यायलं जातं. ताकात मोठ्या प्रमाणात पाणी असते. त्यामुळं पचायला अगदी हलकं असतं. जेवणाबरोबर ताक प्यायल्यास भूक भागते. यात खूप कमी कॅलरीज असतात. ताक लस्सीपेक्षा आंबट असतं. त्यामुळं त्यात आम्लीय पदार्थ जास्त असतात. ताक प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. नियमित प्यायल्यास वजनही कमी होतं. तास सहज बनवता येतं. दह्यामध्ये भरपूर पाणी घालून घोटावं, आवडत असल्यास जीरेपूड, मीठ, पुदीना, कोथिंबीरही घालता येते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Lifestyle