मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

आरोग्यासाठी फायदेशीर आहे Broccoli, प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उत्तम!

आरोग्यासाठी फायदेशीर आहे Broccoli, प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उत्तम!

ब्रोकोली ही भाजी असली तरी, यात 3 ग्रॅम प्रोटीन असतं. त्यामुळे शरीरात प्रोटीन कमी असेल तर, ब्रोकोली खायला सुरूवात करा.

ब्रोकोली ही भाजी असली तरी, यात 3 ग्रॅम प्रोटीन असतं. त्यामुळे शरीरात प्रोटीन कमी असेल तर, ब्रोकोली खायला सुरूवात करा.

फार कमी लोक आपल्या आहारात ब्रोकली(Broccoli) चा समावेश करता. मात्र ब्रोकोलीमध्ये अनेक पोषक द्रव्य (Full of Nutrients) असून ते खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे (Benefits) मिळतात.

  • Published by:  News18 Desk

दिल्ली, 24 मे :  आरोग्य (Health) चांगलं राहण्यासाठी अनेक प्रकारच्या भाज्या आणि फळं खाली जातात. परंतु फ्लॉवरसारखी दिसणारी ब्रोकली (Broccoli)  फार क्वचितच वापरील जाते, ब्रोकोली पुष्कळ पोषक द्रव्यांनी (Full of Nutrients) परिपूर्ण असून ते खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.चला, जाणून घेऊयात ब्रोकोली खाण्याच्या फायद्यांविषयी.

हाडं आणि दात यांचं आरोग्य|

ब्रोकली खाल्ल्याने हाडं आणि दात मजबूत होतात. त्यात कॅल्शियमच प्रमाण भरपूर असतं. त्यामुळे हाडं आणि दात मजबूत होण्यास मदत होते. ब्रोकोलीचं सेवनाने दात कमकुवत होण्यापासून वाचतात.

(भयंकर! इटलीमध्ये केबल कार कोसळून 12 जणांचा मृत्यू, दोन जखमी)

पचनक्रिया चांगली

आपलं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी पानशक्ती चांगली ठेवणं देखील महत्त्वाचं आहे. ब्रोकोलीमध्ये भरपूर फायबर आणि व्हिटॅमिन-ए असतं,जे पाचनतंत्र चांगल्या प्रकारे काम करण्यास मदत करतं. ब्रोकोली केल्याने चयापचय देखील मजबूत होतं.

(हॉलिवूडसाठी सज्ज असलेल्या हुमाचा हटके लूक; पाहा अभिनेत्रीच्या घायाळ करणाऱ्या अदा)

डोळ्यांसाठी उत्तम

डोळ्यांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी ज्या गोष्टी घेणे आवश्यक असल्याचं सांगितलं जातं त्यात ब्रोकलीला महत्व आहे. त्याच्या वापरामुळे डोळ्यांची दृष्टी वाढते. डोळेही सशक्त होतात. ब्रोकोलीमध्ये ल्यूटिन आणि गिआझॅथिन सारखे पोषक घटक असतात जे डोळ्यांना दुर्बल होण्यापासून वाचवतात.

प्रतिकारशक्तीसाठी

ब्रोकोलीचं सेवन प्रतिरक्षा म्हणजेच रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास देखील मदत करतं. सल्फोराफेन आणि व्हिटॅमिन सी ब्रोकोलीमध्ये असतं जे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. ज्यामुळे रोग दूर पळतात.

(कोरोनापासून लहान मुलांना वाचवण्यासाठी धडपड; काय आहे सरकारचा प्लॅन?)

केसांसाठी

आरोग्यासह,ब्रोकोलीच्या सेवनाने सौंदर्याशी निगडीत समस्या कमी होण्यास मदत होते. ब्रोकोली खाल्याने केस गळणे आणि तुटणे कमी होते, केसांना ताकद देखील मिळते. ब्रोकोलीमधील मॅग्नेशियम,पोटॅशियम,कॅल्शियम,प्रोटीन आणि व्हिटॅमिन सी यासारखे पौष्टिक घटक मदत करतात.

त्वचेसाठी

ब्रोकोलीमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात. ज्यामुळे शरीर डिटॉक्स होत,ज्यामुळे मुरुम, फाइन लाइन्स आणि सुरकुत्यांची समस्या कमी होण्यास मदत होते. ब्रोकोलीचं सेवन केल्याने त्वचेत टाईटनेस येतो आणि त्वचा चमकदार होते.

First published:

Tags: Health Tips, Superfood