Home /News /heatlh /

केसांचं सौंदर्य वाढवणारी ब्राह्मी डायबेटिज रुग्णांसाठी खूपच फायदेशीर

केसांचं सौंदर्य वाढवणारी ब्राह्मी डायबेटिज रुग्णांसाठी खूपच फायदेशीर

ब्राम्ही केवळ केसांसाठीच फायदेशीर नाही तर बर्‍याच प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक समस्या कमी करण्यात देखील चांगली भूमिका बजावते.

ब्राम्ही केवळ केसांसाठीच फायदेशीर नाही तर बर्‍याच प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक समस्या कमी करण्यात देखील चांगली भूमिका बजावते.

Benefits of Brahmi : ब्राह्मी बर्‍याच प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक समस्या कमी करण्यासाठी देखील फायदेशीर ठरते.

    मुंबई, 30 मे : केसांसाठी ब्राह्मीचे (Brahmi) बरेच फायदे तुम्ही ऐकले असतील. ब्राह्मीच्या तेलाचा वापर केसांसाठी फायदेशीर असतो पण, पानांचीही उपयोग होतो. केसांना लांब आणि दाट बनवायचं असेल तर केसांना ब्राह्मीची पेस्ट लावता येते. पण चांगल्या आरोग्यसाठीही ब्राह्मीचा (Health benefits of Brahmi) वापर करता येतो. याबद्दल अनेकांना काहीच माहिती नसतं. वास्तविक ब्राह्मी केवळ केसांसाठीच फायदेशीर (Brahmi Benefits) नाही तर बर्‍याच प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक समस्या कमी करण्यात देखील चांगली भूमिका बजावते. ब्राह्मीला आयुर्वेदात मेंदूची ताकद वाढवणारी औषधी वनस्पती म्हणून महत्व आहे. ब्राह्मीचे फायदे किती आहेत ते जाणून घेऊयात. तणाव मुक्ती ब्राह्मीचं सेवन केल्याने मानसिक तणाव दूर होण्यास मदत होते. ब्राह्मी हार्मोनल बॅलन्स करते आणि तणाव कमी करण्यात मदत करते. यात कॉर्टिसोलची पातळी कमी करण्याची क्षमता आहे जी स्ट्रेस हार्मोन म्हणूनही ओळखली जाते. ब्राह्मीच्या तेलाने मॉलिश केल्यास डोक शांत होतं. (Gold: 8000 रुपयांनी स्वस्त झालं सोनं! लग्नसराईच्या काळात खरेदीची सुवर्णसंधी) मेंदूची ताकद वाढवते ब्राह्मीच्या सेवनाने मेंदूची ताकद वाढते. यामुळे बुद्धी तल्लख होतो आणि एकाग्रताही वाढवते. ब्राह्मीच्या अर्काचं दररोज सेवन केल्याने स्मरणशक्ती वाढते, विचार करण्याची क्षमता वाढते. ब्राह्मीमध्ये एमिलॉईड असतं. जे अल्झायमरच्या त्रासात उपयोगी आहेत. रोग प्रतिकारशक्ती वाढते ब्राह्मीचं सेवन केल्याने शरीर मजबूत होतं आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. ज्यामुळे आजारी पडण्याचा धोका कमी होतो. यातील अँटी-ऑक्सिडंटमुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होण्यास मदत होते. (पोस्टात नोकरीसाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख, महाराष्ट्रात 1940 पदासांठी भरती) पचनशक्ती सुधारते ब्राह्मीच्या सेवनाने पचनशक्ती मजबूत होते. त्यातील फायबर आतड्यांमधून हानिकारक पदार्थ काढून पचनशक्ती मजबूत करते. ब्लड शुगर कंट्रोल दररोज ब्राह्मीचं सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होते आणि हायपोग्लाइसीमियाची समस्या कमी करण्यात मदत करते.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Brain, Health, Health Tips, Lifestyle

    पुढील बातम्या