मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

Bad Taste: तोंडाची चव बिघडलीय? 'हे' आयुर्वेदिक उपाय ठरतील फायदेशीर

Bad Taste: तोंडाची चव बिघडलीय? 'हे' आयुर्वेदिक उपाय ठरतील फायदेशीर

काही वेगळं खावं आणि मस्त मजेत रहावं असं अनेकांना वाटतं. प्रत्येक जण अगदी खवैया नसला तरीही चवीनी पदार्थ मात्र खात असतो.

काही वेगळं खावं आणि मस्त मजेत रहावं असं अनेकांना वाटतं. प्रत्येक जण अगदी खवैया नसला तरीही चवीनी पदार्थ मात्र खात असतो.

काही वेगळं खावं आणि मस्त मजेत रहावं असं अनेकांना वाटतं. प्रत्येक जण अगदी खवैया नसला तरीही चवीनी पदार्थ मात्र खात असतो.

 मुंबई, 12 ऑगस्ट-   काही वेगळं खावं आणि मस्त मजेत रहावं असं अनेकांना वाटतं. प्रत्येक जण अगदी खवैया नसला तरीही चवीनी पदार्थ मात्र खात असतो. आपल्या जेवणातला अविभाज्य घटक म्हणजे चव. पदार्थाची चव  बिघडली तर आपण तो बेचव झाला आहे असं करणाऱ्याला सांगतो. एखाद्या प्रसंगातली मजा किंवा गंमत काही करणामुळे गेली तर त्याची चवच गेली रे... असा वाक्प्रचारही मराठीत रूढ आहे. त्यामुळे थोडक्यात काय तर तोंडाची चव ही अत्यंत महत्त्वाची आहे. कधीकधी इन्फेक्शन , हिरड्यांचा त्रास, सर्दी-खोकला, दातांच्या समस्याया कारणांमुळे आपल्याला पदार्थांची चव लागत नाही. त्यामुळे समोर अगदी आवडीचा पदार्थ जरी आणला तरीही तो खायचीच इच्छआ होत नाही. कधीकधी आजारी पडल्यानंतर डॉक्टरांनी दिलेल्या औषधांमुळेही तोंडाची चव जाते. पण या चव जाण्याच्या समस्येवर काही घरगुती उपाय आयुर्वेदात सांगितले आहेत. जाणून घेऊ या काही आयुर्वेदिक घरगुती उपचारांबाबत- तोंडाची चव गेली असेल तर मीठ तुम्हाला फार उपयुक्त ठरतं. मीठाच्या पाण्याने गुळण्या केल्या तर चव परत यायला मदत होते. मीठ अँटिसेप्टिक (Antiseptic) असतं त्यामुळे तोंडातील चव जाण्याची समस्या दूर होते. तसंच तोंडाच्या आतील पीएच पातळीही सुधारते. त्यामुळे तुमच्या तोंडाची चव गेली असेल तर तुम्ही मीठाच्या पाण्याने  गुळण्या करा आणि फरक स्वत: अनुभवा. एक काळजी मात्र घ्या जर हिरड्या सुजल्या असतील किंवा तोंड आलं असेल तर मात्र मीठाच्या गुळण्या करताना चरचरू शकतं त्याची काळजी मात्र घ्या. (हे वाचा: Healthy kids : ऋतु कोणताही असो, निरोगी आरोग्यासाठी मुलांच्या आहारात या गोष्टी हव्याच ) थोडी हळद घ्या त्यात लिंबाचा रस टाका आणि हे मिश्रण तुमच्या दातांवर लावा. तसंच हे मिश्रण जीभ आणि हिरड्यांवरही लावा. थोड्या वेळाने चुळा भरून तोंड धुवून टाका. हा उपाय तुम्हाला दिवसातून दोन वेळा करायला लागेल. हळद ही अँटिसेप्टिक आहे त्यामुळे ती जंतू नष्ट करते. हा हळद आणि लिंबाच्या रसाचा उपाय केल्यावर तुमच्या तोंडाची चव परत येऊ शकते, करून तर पहा. दालचिनी हा आपल्या स्वयंपाकघरातल्या मिसळणाच्या डब्यातला आणखी एक मसाला. दालचिनी मसाला असला तरीही औषधी आहे त्यातील अँटिऑक्सिडंट गुणधर्म शरीरातील अनेक अडचणी सोडवण्यासाठी फायद्याचा ठरतो. एका ग्लासात कोमट पाणी घेऊन त्यात दालचिनीची पूड  मिसळा. या पाण्यात मध टाका आणि या पाण्याने गुळण्या करा. या पाण्याने गुळण्या केल्यावर तोंडाची चव परत येईल. तसं तोंडाची चव जाणं हा त्रास साधाच आहे. हे आयुर्वेदिक उपाय करून बघा तुम्हाला नक्की दिलासा मिळेल. पण जर तो कमी झाला नाही तर डॉक्टरांकडे जाऊन या.
First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle

पुढील बातम्या