मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

Healthy Benefits :आळशीपणा द्या सोडून! सकाळी लवकर उठा; निरोगी राहाल

Healthy Benefits :आळशीपणा द्या सोडून! सकाळी लवकर उठा; निरोगी राहाल

मुलांना जगात जगण्याची कला शिकवण्याचा प्रयत्न करा. ऑफिसमध्ये बॉसने केलेला अपमान पचवून कशा प्रकारे काम करायचं हे त्यांना माहिती असायला हवं. म्हणजे त्यांना अपयश पचवण्याची आणि लढण्याची ताकद येईल.

मुलांना जगात जगण्याची कला शिकवण्याचा प्रयत्न करा. ऑफिसमध्ये बॉसने केलेला अपमान पचवून कशा प्रकारे काम करायचं हे त्यांना माहिती असायला हवं. म्हणजे त्यांना अपयश पचवण्याची आणि लढण्याची ताकद येईल.

सकाळी उठल्याने आपली सगळी काम वेळेत होतात. दिवसाची सुरुवात लवकर झाल्याने व्यायामाला (Exercise) ही वेळ देता येतो. लवकर उठण्याच्या सवयी (Habit) मुळे आपलं शरीर हेल्दी (Health) राहतं.

  • Published by:  News18 Desk

दिल्ली, 24 मे : आपण लहानपणापासून ऐकत आलेलो असतो की, सकाळची हवा आरोग्या (Health) साठी चांगली असते. पण बऱ्याचवेळा सकाळ (Morning)च्या वेळीचं गाढ झोप (Good Sleep) लागते आणि कितीही उठण्याची ईच्छा असली तरी, आपण स्वत:ला आवरू शकतं नाही. पण, सकाळी उठण्याचेच जास्त फायदे (Benefits) असतात. ज्यांची आपल्याला माहितीच नसते.

सकाळी उठण्याचे अनेक फायदे असतात. दिवसाची सुरुवात लवकर झाली की, कोणतही काम करताना गडबड होत नाही. उलट कामं लवकर आटपतात. त्यामुळे याच वेळामधून वेळ काढून व्यायामा (Exercise) कडेही लक्ष देता येतं.

(Good News : भारतात तयार होतेय अधिक प्रभावी Corona Vaccine, 8 पट अधिक अँटिबॉडीज)

दररोज सकाळी उठल्यावर एक्‍सरसाइज (Exercise), योगा (Yoga), वॉकिंग (Walking) सारख्या गोष्टी करण्याने आपलं आरोग्य चांगलं राहतं. तर, कोणतीही धावपळ न करता ऑफिस (Office)ची तयारी करता येते. तर, जाणून घेऊ यात सकाळी लवकर उठण्याचे फायदे.

दिवसाचं प्लॅनिंग

सकाळची वेळ दिवसभरातली सगळ्यात चांगली वेळ असते. त्यामुळे तुम्हाला फेश वाटतं आणि दिवसातला भरपूर वेळ मिळाल्याने कोणतंही काम निवांत करता येतं. सकाळी विचलित न होता, कोणतंही काम भराभर पूर्ण करता येतं. दिवसभरात काय कराचं याचं प्लॅनिंग करत असाल तर, हिच वेळ चांगली असते, दिवसाचं प्लॅनिग सकाळीच करावं. त्यामुळे आत्मविश्वासही वाढतो.

(मास्कमधून पसरतोय Black Fungus? तुम्ही ही चूक तर करीत नाही ना...)

सकाळचा नाश्ता

सकाळी लवकर उठण्यामुळे तुम्हाला हेल्दी नाश्ता बनवण्यासाठी वेळही मिळतो. जास्तीतजास्त वेळ उपलब्ध असल्यामुळे आपल्या परिवारासाठी आणि स्वत:साठी चांगला नास्ता बनवू शकता. हेल्दी राहण्यासाठी सकाळच्या वेळी नाश्ता करणं आवश्यक असतं. त्यामुळे दिवसभरासाठी उर्जा मिळते. सकाळी कामावर जाण्याच्या गडबडीत नाश्ता टाळणारे लोक जे मिळेल ते खाऊन सकाळची भूक भागवतात. त्य़ामुळे त्यांची भूक भागते मात्र, आरोग्याचं नुकसान होतं.

तणावमुक्त दिवस

सकाळी उठल्यावर दिवसभराचं नियोजन करता येतं. त्यामुळे पुढे काय करायचं हे माहित असेल तर, कोणतही काम करताना धावपळ होत नाही. त्यामुळे स्ट्रेस फ्री (Stress Free) राहता येतं. लवकर उठल्याने तुमच्याकडे बराच वेळ असल्याने त्याचा उपयोग स्वत:ला तणावमुक्त ठेवण्यासाठी करु शकता. त्यामुळे शांत मनाने काम करता येतं.

(आजार चालेल पण इंजेक्शन नको; कोरोना लसीच्या भीतीनं गावकऱ्यांनी मारल्या नदीत उड्या)

रात्रीची झोप

लवकर उठणारे लवकर झोपतात. सकाळी उठण्यासाठी तुम्ही रात्री लवकर झोपता.तर,लवकर उठण्याच्या सवयीमुळे,रात्रीही चांगली झोप येते,त्यामुळे आपलं आरोग्य देखील चांगलं राहतं.सकारात्मक भावनालवकर जागं होणं आपल्यात सकारात्मकतेची भावना जागवतं. एका संशोधनानुसार जे लोक लवकर उठतात ते केवळ थोड्या काळासाठीच नही तर, आयुष्यभर आनंदी असतात.दररोज व्यायाम सकाळी व्यायाम करणं सर्वोत्तम मानलं जातं,कारण यामुळे अ‍ॅड्रेनालाईन हार्मोन बूस्ट होतात. अमेरिस्लीपच्या अहवालानुसार,अ‍ॅड्रेनालाईन वाढवतं ज्यामुळे कमी झोपेची समस्या संपून झोप पूर्ण होते. दुसरीकडे,संध्याकाळच्या वेळी व्यायाम करावा न लागल्याने,यासाठी द्यावा लागणार अतिरिक्त वेळ वाचतो.

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle