Home /News /heatlh /

Work from home ने तुमचे शरीर जखडून गेलंय का? या 5 टिप्स वापरून मिळेल आराम

Work from home ने तुमचे शरीर जखडून गेलंय का? या 5 टिप्स वापरून मिळेल आराम

अनेकजण लॅपटॉपसमोर (Laptop) कित्येक तास सतत काम करत असतात, ज्यामुळे त्यांना अनेक शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागते. यातील सर्वात सामान्य बाब म्हणजे शरीर जखडून जाणे.

    Work from home : कोरोना काळात सध्या अनेक लोक घरातून काम करत आहेत. अनेकजण लॅपटॉपसमोर (Laptop) कित्येक तास सतत काम करत असतात, ज्यामुळे त्यांना अनेक शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागते. यातील सर्वात सामान्य बाब म्हणजे शरीर जखडून जाणे. यातून सुटका मिळवण्यासाठी येथे आम्ही काही सोप्या टिप्स सांगत आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या खुर्चीवर बसून असे काही स्ट्रेचिंग एक्सरसाइज सहज करू शकता, ज्यामुळे तुम्हाला त्यातून आराम मिळेल. या व्यतिरिक्त सोशल मीडियावरही असे बरेच ग्रुप किंवा सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर आहेत, जे शरीर जखडण्यापासून आराम मिळवण्यासाठी टीप्स देत असतात. Work from home सुरू असताना नेमके कसे बसावे, झोपणे, उठणे यासह फोनवर देखील कसे बोलावे याचा देखील सल्ला दिला आहे. सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर यास्मीन कराचीवाला यांनी अलीकडेच याबाबत अनेक इंस्टाग्राम व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यामध्ये त्यांनी सतत उठताना आणि फोनवर बोलतानाही आपली मुद्रा कशी टिकवायची याबाबत माहिती दिली आहे. 5 टिप्स, शरीराची जखडण दूर करण्यासाठी एका जागी बसून किंवा काम करताना योग्य पोजिशन ठेवणे गरजेचे आहे. जसे की खूप पुढे वाकू नये किंवा खांदे नीट ठेवावेत. आपले पाय जमिनीवर ठेवा आणि आरामदायक बसा. जर आपली उंची कमी असेल तर पायाखाली स्टूल ठेवणे सोइस्कर होईल. हे वाचा - धक्कादायक! अभिनेत्रीला सेक्स टॉय आणि अंतर्वस्त्रे पाठवून दिला जातोय त्रास; पोलिसांनी सुरु केला तपास पाणी पिण्यासाठी किंवा एक कप चहा घेण्यासाठी अधून-मधून ब्रेक घ्या. पूर्ण कामाच्या वेळात एकदा तरी 30 ते 40 मिनिटे चालले पाहिजे. त्यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया चांगली राखली जाईल. घरातील शारीरिकदृष्ट्या कष्टाची कामे करा. सकाळी किंवा कामाच्या अगोदर आपल्या घरातील कामे स्वतःच करा. यामुळे व्यायामही होईल. हे वाचा - Ola देणार 10 हजारहून अधिक महिलांना नोकरी, केवळ महिला कर्मचारी चालवणार जगातील सर्वात मोठा E-scooter plant पुरेशी झोप मिळण्यासाठी झोपेचे वेळापत्रक ठेवा. तुम्ही कितीही काम केले तरी झोपेकडे दुर्लक्ष करू नका. दरम्यान, कामात अधेमधे उठ-बस करणे गरजेचे आहे, जर ते शक्य नसेल तर प्रत्येक अर्ध्या तासाने किमान खुर्चीतून उठून उभे रहा. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. हे उपाय लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांशी संपर्क साधा.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Work from home

    पुढील बातम्या