मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

सांधेदुखीने त्रस्त आहात का? शरीरातील घातक यूरिक अ‌ॅसिडला असा दाखवा बाहेरचा रस्ता

सांधेदुखीने त्रस्त आहात का? शरीरातील घातक यूरिक अ‌ॅसिडला असा दाखवा बाहेरचा रस्ता

जेव्हा यूरिक अ‌ॅसिड अनियंत्रित होते, तेव्हा हृदयविकाराचा झटका, मूत्रपिंड निकामी होणे आणि अनेक अवयव निकामी होणे यासारख्या घातक परिस्थितीला सामोरे जावे लागते. त्यामुळे यूरिक अ‌ॅसिड नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

जेव्हा यूरिक अ‌ॅसिड अनियंत्रित होते, तेव्हा हृदयविकाराचा झटका, मूत्रपिंड निकामी होणे आणि अनेक अवयव निकामी होणे यासारख्या घातक परिस्थितीला सामोरे जावे लागते. त्यामुळे यूरिक अ‌ॅसिड नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

जेव्हा यूरिक अ‌ॅसिड अनियंत्रित होते, तेव्हा हृदयविकाराचा झटका, मूत्रपिंड निकामी होणे आणि अनेक अवयव निकामी होणे यासारख्या घातक परिस्थितीला सामोरे जावे लागते. त्यामुळे यूरिक अ‌ॅसिड नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

    नवी दिल्ली, 06 ऑक्टोबर : यूरिक अ‌ॅसिड (Uric acid) हा शरीरातील एक टाकाऊ पदार्थ आहे, जो प्युरिन नावाच्या प्रथिनांच्या विघटनामुळं चयापचय प्रक्रियेदरम्यान रक्तात विरघळतो. सामान्यत: मूत्रपिंडात (किडनी) यूरिक अ‌ॅसिड फिल्टर केले जाते आणि लघवीद्वारे शरीरातून बाहेर पडते, परंतु कधीकधी त्याचे प्रमाण जास्त असल्याने ते रक्तात जमा होऊ लागते. जेव्हा रक्तात यूरिक अॅसिडचे (Uric acid) प्रमाण वाढते, तेव्हा त्यामुळे क्रिस्टलसारखे पदार्थ तयार व्हायला सुरुवात होते. या क्रिस्टलचे नंतर लहान तुकडे होतात आणि ते हाडांच्यामध्ये जमा होऊ लागतात. यामुळे सूज निर्माण होऊ लागते आणि हाडांमध्ये तीव्र वेदना होतात. संधिरोग, संधिवात, संधिरोग इत्यादी उच्च यूरिक अ‌ॅसिडमुळे होणारे रोग आहेत. एवढेच नाही तर रक्तातील यूरिक अ‌ॅसिडचे प्रमाण वाढल्याने सूज आणि लालसरपणासह इतर अनेक समस्या निर्माण होतात. जेव्हा यूरिक अ‌ॅसिड अनियंत्रित होते, तेव्हा हृदयविकाराचा झटका, मूत्रपिंड निकामी होणे आणि अनेक अवयव निकामी होणे यासारख्या घातक परिस्थितीला सामोरे जावे लागते. त्यामुळे यूरिक अ‌ॅसिड नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. मेडिकल न्यूज टुडेमध्ये दिलेल्या माहितीनुसार, शरीरातील यूरिक अ‌ॅसिडची पातळी कमी करण्यासाठी, आपण आपल्या आहारात असे अन्न समाविष्ट केले पाहिजे, ज्यामुळे शरीरातील प्युरिनची पातळी वाढत नाही. तर अशा काही खाद्यपदार्थांविषयी जाणून घेऊया, ज्यामुळे शरीरातील यूरिक अ‌ॅसिडचा स्तर नियंत्रणात राहील. यूरिक अ‌ॅसिड कमी करणारे पदार्थ प्युरिन वाढवणाऱ्या खाद्यपदार्थांवर नियंत्रण - प्यूरिन हे एक रसायन आहे जे नैसर्गिकरित्या जवळजवळ सर्व प्रकारच्या अन्नात आढळते, परंतु ते काही पदार्थांमध्ये खूप जास्त प्रमाणात आढळते. ट्युना, टूना, सार्डिन सारख्या माशांमध्ये प्युरिनचे प्रमाण जास्त असते. याशिवाय अल्कोहोल, बिअर इत्यादी देखील शरीरात यूरिक अ‌ॅसिड वाढवण्यासाठी जबाबदार असतात. दुग्धजन्य पदार्थ, लाल मांस, उच्च चरबीयुक्त पदार्थ देखील प्युरिनची पातळी वाढवतात. चेरी - चेरींद्वारे संधिवात वेदना कमी - 2012 च्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, चेरीचे सेवन केल्याने संधिवाताचा त्रास कमी होतो. चेरीमध्ये एन्थोसायनिन नावाचा नैसर्गिक दाहक-विरोधी घटक असतो जो यूरिक अ‌ॅसिडची पातळी कमी करतो. हे वाचा - Nandurbar ZP Election Result: आमदार विजयकुमार गावित यांच्यासाठी ‘एका डोळ्यात आसू अन् दुसऱ्यात हासू’, मुलगी विजयी तर पुतण्या पराभूत व्हिटॅमिन सी - अभ्यासात असे आढळून आले आहे की, व्हिटॅमिन सी यूरिक अ‌ॅसिडची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. त्यामुळे लिंबू, संत्र्याचे सेवन यावर नियंत्रण ठेवू शकते. लिंबू आणि संत्र्यांमध्ये सायट्रिक अ‌ॅसिड असते. हे शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास मदत करते. लिंबूमध्ये असलेले व्हिटॅमिन सी संधिवात होण्यास प्रतिबंध करते. केळी- केळ्यात कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळतात, ज्यामुळे शरीरातील केटोन्सची पातळी वाढते. केटोन यूरिक अ‌ॅसिडचे उत्पादन नियंत्रित करते. केळीचे नियमित सेवन केल्याने शरीरातील यूरिक अ‌ॅसिडची पातळी नियंत्रणात राहते. हे वाचा - IPL मध्ये संधी देतो सांगून तरुण खेळाडूंकडून लाखो रुपये उकळले, बड्या नावांचा प्रकरणात सहभाग सफरचंद - सफरचंदात पुरेशा प्रमाणात फायबर आढळते. तसेच, त्यात असलेले आम्ल यूरिक अ‌ॅसिडसिडचा प्रभाव कमी करते.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या