मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

लिंबू पाण्याचे फायदे सर्वांनाचा आहेत माहीत; पण त्याचे हे तोटेही आपल्याला माहीत असावेत

लिंबू पाण्याचे फायदे सर्वांनाचा आहेत माहीत; पण त्याचे हे तोटेही आपल्याला माहीत असावेत

शॅम्पू आणि लिंबू : एका टबमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यात एका लिंबाचा रस पिळा. नंतर त्यात एक शॅम्पूची छोटी पॅकेट मिसळा. यानंतर काही वेळ या मिश्रणात नखे बुडवून ठेवा आणि नंतर साध्या पाण्याने स्वच्छ करा.

शॅम्पू आणि लिंबू : एका टबमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यात एका लिंबाचा रस पिळा. नंतर त्यात एक शॅम्पूची छोटी पॅकेट मिसळा. यानंतर काही वेळ या मिश्रणात नखे बुडवून ठेवा आणि नंतर साध्या पाण्याने स्वच्छ करा.

लिंबू-पाणी पिण्यामुळे काही तोटे देखील होऊ (side effects of lemon water) शकतात. 'अति तेथे माती' ही म्हण सर्वत्र लागू ठरते, त्यानुसार जर काहीही जास्त प्रमाणात घेतले गेले तर ते समस्या निर्माण करू शकते.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 30 सप्टेंबर : वजन कमी करणे असो, ताजेतवाने वाटणे असो किंवा त्वचेच्या उजळपणासाठी असो, लिंबूपाणी ( lemon water) या प्रत्येक ठिकाणी उपयोगाचे आहे. आपल्या सर्वांना लिंबू पाणी पिण्याचे फायदे माहीत आहेत. परंतु, लिंबू-पाणी पिण्यामुळे काही तोटे देखील होऊ (side effects of lemon water) शकतात. 'अति तेथे माती' ही म्हण सर्वत्र लागू ठरते, त्यानुसार जर काहीही जास्त प्रमाणात घेतले गेले तर ते समस्या निर्माण करू शकते. त्यामुळं, जर तुम्ही दररोज जास्त प्रमाणात लिंबूपाण्याचे सेवन करत असाल तर तुम्हाला काही समस्यांना तोंड द्यावे लागेल.

जास्त लिंबूपाणी ( lemon water) पिण्याचे तोटे

जर एखादी व्यक्ती दररोज आणि वारंवार लिंबूपाणी पित असेल तर ते नुकसानकारक ठरते. त्यामुळे आपल्याला आरोग्याच्या काही इतर समस्यांना सामोरे जावे लागते.

लिंबू नैसर्गीकरित्या आम्लीय आहे, म्हणून त्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने दातांचे आरोग्य बिघडू शकते. आपल्या दातांचा संरक्षणात्मक स्तर खराब होऊ शकतो. ज्यामुळे दात कमकुवत होऊ शकतात..

हे वाचा - सेम टू सेम! विराट कोहली आणि शफाली वर्मा यांच्यातील फरक ओळखता येतो का? Photo

अनेक संशोधनांमधून हे उघड झाले आहे की, लिंबूपाण्याचे जास्त सेवन केल्याने छातीत जळजळ होऊ शकते. त्याच वेळी यामुळे पोटाच्या आतील आवरणालाही नुकसान होऊ शकते.

लिंबू पाणी ऊर्जा देते, परंतु कोमट पाण्यात लिंबूचा जास्त वापर केल्याने वारंवार लघवी होऊ शकते. यामुळे, आपल्या शरीरातून जास्त प्रमाणात इलेक्ट्रोलाइट्स आणि सोडियम काढून टाकले जातात आणि डिहाइड्रेशन होते.

हे वाचा - धक्कादायक ! आधी इंजेक्शन देत बेशुद्ध केलं आणि मग गाडीत कोंबून गुरांची चोरी, अमरावतीमधील घटनेचा VIDEO

लिंबूचे आम्लीय स्वरूप हाडांसाठी देखील हानिकारक ठरू शकते. म्हणूनच लिंबूचा जास्त वापर टाळावा.

लिंबूमध्ये व्हिटॅमिन-सी असते, जे शरीरातील लोहाचे शोषण वाढवते. पण व्हिटॅमिन-सीच्या जास्त प्रमाणामुळे शरीरातील लोहाची पातळी देखील वाढू शकते, ज्यामुळे वेगळ्याच समस्या निर्माण होऊ शकतात.

First published:

Tags: Health, Health Tips