मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

गरोदर असताना पॅरासिटामॉल औषध घेणं टाळा; बाळाच्या आरोग्यावर होऊ शकतात हे गंभीर परिणाम

गरोदर असताना पॅरासिटामॉल औषध घेणं टाळा; बाळाच्या आरोग्यावर होऊ शकतात हे गंभीर परिणाम

गर्भवती महिलांनी पॅरासिटामॉलचा (Paracetamol demerits during pregnancy) वापर करणे घातक ठरू शकते.  तज्ज्ञांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार गर्भधारणेदरम्यान पॅरासिटामोल घेतल्याने पोटातील गर्भाचा विकास खुंटु शकतो आणि अनेक विकार होऊ शकतात.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 28 सप्टेंबर : जर तुम्हाला वारंवार पॅरासिटामॉल (Paracetamol) घेण्याची सवय असेल तर तुम्ही थोडी काळजी घ्यायला हवी. डेलीमेलमध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, गर्भवती महिलांनी पॅरासिटामॉलचा (Paracetamol demerits during pregnancy) वापर करणे घातक ठरू शकते. तज्ज्ञांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार गर्भधारणेदरम्यान पॅरासिटामोल घेतल्याने पोटातील गर्भाचा विकास खुंटु शकतो आणि अनेक विकार होऊ शकतात.

पॅरासिटामॉलचा (Paracetamol) आई आणि मुलाच्या आरोग्यावर काही परिणाम होतो, याबद्दल न्यूज 18 लोकमत कोणताही दावा करत नाही. डेलीमेलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार आम्ही यासंबंधी माहिती देत ​​आहोत. डझनभर संशोधनांमध्ये, पॅरासिटामॉलचा संबंध अटेन्शन डेफिसिट हायपरएक्टिव्हिटी डिसऑर्डर, ऑटिझम, मुलींमध्ये भाषेच्या समस्या आणि बुद्ध्यांक कमी झाल्याशी जोडला गेला आहे. डेन्मार्कमधील संशोधकांनी या अभ्यासाच्या पुराव्यांचे विश्लेषण केले आहे आणि असे आढळले आहे की, गर्भधारणेदरम्यान (pregnancy) पॅरासिटामोल घेतल्याने पोटातील बाळाच्या विकास नीट होऊ शकत नाही. पॅरासिटामॉलचे दुष्परिणाम पाहता, संशोधकांनी गर्भवती महिलांना अत्यंत कठीण परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच पॅरासिटामॉल वापर करण्याचा इशारा दिला आहे.

हे वाचा - शिक्षिकेचे अश्लील फोटो बनवून केले व्हायरल; अहमदनगरमधील अल्पवयीन विद्यार्थ्यांचा कांड

91 शास्त्रज्ञांनी पॅरासिटामॉल विरोध

खरं तर, पॅरासिटामोल औषध खूप स्वस्त आहे, जे स्त्रिया किंवा इतर कोणीही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही प्रकारच्या वेदनांमध्ये घेतात. अमेरिकेतील 65 टक्के स्त्रिया गर्भधारणेदरम्यान हे औषध कोणत्या ना कोणत्या प्रकारे वापरतात. याबाबत चिंता व्यक्त करत 91 शास्त्रज्ञांनी माता बननाऱ्या महिलांना असे करू नका, असे बजावले आहे. हे संशोधन नेचर रिव्ह्यू एंडोक्राइनोलॉजीमध्ये प्रकाशित झाले आहे. अभ्यासातील अनेक संशोधनांचा हवाला देत असे सांगितले गेले आहे की, गर्भधारणेदरम्यान पॅरासिटामॉलचा वापर मुलांमध्ये मज्जातंतू विकारांना कारणीभूत ठरतो.

हे वाचा - स्वतःला गरोदर समजत होती महिला; रुग्णालयात जाताच झाला धक्कादायक खुलासा

बाळावर मानसिक परिणाम

कोपेनहेगन विद्यापीठाचे डॉ.केविन क्रिस्टेंसेन यांच्या नेतृत्वाखाली मानव आणि प्राण्यांवर पॅरासिटामॉलच्या परिणामावर हे संशोधन करण्यात आले. यामध्ये 1995 ते 2020 पर्यंतच्या डेटाच्या आधारे असा निष्कर्ष काढण्यात आला की, गर्भधारणेदरम्यान पॅरासिटामॉलचा वापर मुलांच्या मानसिक क्षमतेवर परिणाम करतो आणि त्यांच्या शिकण्याच्या क्षमतेवरही परिणाम करतो. संशोधनात असेही आढळले आहे की, पॅरासिटामॉलच्या वापरामुळे मुलामध्ये रीप्रॉडक्टीव आणि मूत्रजनन विकार होऊ शकतात. यामध्ये, जननेंद्रियाच्या अवयवाच्या टोकावर मुलाचा मूत्रमार्ग (मूत्र छिद्र) उघडत नाही. अनेक प्रकरणांमध्ये वृषण कर्करोगाचा धोका देखील असतो.

First published:

Tags: Health, Pregnancy, Pregnant woman