मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

उन्हाळ्यात COOL राहण्यासाठी मलायका अरोरानं सांगितली 3 योगासनं; तुम्हीही करून बघा

उन्हाळ्यात COOL राहण्यासाठी मलायका अरोरानं सांगितली 3 योगासनं; तुम्हीही करून बघा

उन्हाळ्यात शरीराची उष्णता कमी करण्यासाठी मलायकाने काही योगासनांचा उपाय (Malaika Arora Yoga Pose) सांगितला आहे. इन्स्टाग्रामवरून तीन सोप्या योगा पोझ मलायकाने शेअर केल्या आहेत.

उन्हाळ्यात शरीराची उष्णता कमी करण्यासाठी मलायकाने काही योगासनांचा उपाय (Malaika Arora Yoga Pose) सांगितला आहे. इन्स्टाग्रामवरून तीन सोप्या योगा पोझ मलायकाने शेअर केल्या आहेत.

उन्हाळ्यात शरीराची उष्णता कमी करण्यासाठी मलायकाने काही योगासनांचा उपाय (Malaika Arora Yoga Pose) सांगितला आहे. इन्स्टाग्रामवरून तीन सोप्या योगा पोझ मलायकाने शेअर केल्या आहेत.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 01 मे : मलायका अरोरा ही बॉलिवूडमधील फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. ती आपल्या आरोग्य आणि तंदुरुस्तीला इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा जास्त महत्त्व देते. 48 वय असूनही ती अजून एकदम फिट आहे. ती अनेकदा तिचे फिटनेस व्हिडिओ शेअर करते, अनेक महिलांना त्यांच्या फिटनेस आणि आरोग्यासाठी ते फायदेशीर ठरतात. उन्हाळ्यात शरीराची उष्णता कमी करण्यासाठी मलायकाने काही योगासनांचा उपाय (Malaika Arora Yoga Pose) सांगितला आहे.

इन्स्टाग्रामवरून तीन सोप्या योगा पोझ मलायकाने शेअर केल्या आहेत, या उन्हाळ्यात त्याद्वारे आपण शरीर थंड ठेवू शकता. ऑल-ब्लॅक योग एटायर (ड्रेस) मध्ये एक वीडियो शेयर करत तिनं लिहिलं आहे की, "या कडक उन्हाळ्यात उष्णतेमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी योगाचा उपाय करा. या आठवड्यात मलायकाच्या मूव्ह ऑफ द वीकमध्ये, तिने 3 आसनांची माहिती दिली आहे, ज्याद्वारे उकाड्यातही शरीर थंड राहण्यास मदत होईल.

पिजन पोज (एक मुद्रा राजकपोतासन)

हे आसन स्नायूंना बळकट करण्यासाठी आणि शरीरात लवचिकता आणण्यासाठी फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. यामुळे खांदे, छाती आणि नितंब स्ट्रेच करण्यासाठी देखील मदत होते. याशिवाय ते शरीराच्या अनेक भागांना जसे की कंबर, पोट, छाती, मान आणि खांदे स्ट्रेच होण्यास मदत होते. हे आसन नवीन योगासने करणारे देखील करू शकतात आणि जसजसे तुम्ही व्यवस्थित करू लागाल, तसतसे अधिक फायदे मिळवण्यासाठी तुम्ही द्वि पाद राजकपोटासनवर स्विच करू शकता.

हे वाचा - मनुके की द्राक्षे? काय खाणं आहे जास्त फायदेशीर; पोषण तज्ज्ञांनी दिलं याचं उत्तर

कॅट-काऊ पोज (चक्रवाकासन) -

मणका लवचिक ठेवण्यासाठी योगासने खरोखरच फायदेशीर मानली जातात. पाठीचा कडकपणा दूर करण्यासाठी कॅट-काऊ मुद्रा हे एक आवश्यक आसन आहे. या व्यतिरिक्त हे आसन उत्तम पचनास मदत करते आणि तुमचे पोट निरोगी ठेवण्यासाठी उत्तम आहे. चक्रासन शरीरात संतुलन आणि पोश्चर आणते. हे मेंदूचे संतुलन देखील करते, ज्यामुळे आपल्याला उन्हाळ्यात थंड आणि शांत वाटू शकते.

हे वाचा - दिवसातून एकदा तरी खा काजू; स्कीन आणि केसांवर दिसायला लागेल परिणाम

ट्री पोज (वृक्षासन)

कोणतीही व्यक्ती हे आसन करू शकते, मग तो योग शिकणारा असो किंवा योग तज्ज्ञ असो. हे आसन शरीरात संतुलन आणण्यासाठी केले जाते, कारण ते एका पायावर उभे राहून केले जाते. ज्या लोकांच्या पायांमध्ये वारंवार मज्जातंतूचा त्रास होतो त्यांच्यासाठी देखील हे खूप उपयुक्त आहे. याशिवाय हे आसन एकाग्रता, शक्ती वाढवण्यासाठी आणि चेतापेशी समन्वय (न्यूरोमस्कुलर कोऑर्डिनेशन) सुधारण्यासाठी देखील फायदेशीर आहे.

First published:

Tags: Fitness, Health, Lifestyle, Malaika arora, Summer, Yoga day