Home /News /heatlh /

Fruits or Fruit Juice Better : ज्युस की ताजी फळं खावीत; काय आहे आपल्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर?

Fruits or Fruit Juice Better : ज्युस की ताजी फळं खावीत; काय आहे आपल्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर?

लिंबूपाणी योग्य वेळी प्यायल्यास त्याचा फायदा अधिक होतो.

लिंबूपाणी योग्य वेळी प्यायल्यास त्याचा फायदा अधिक होतो.

वास्तविक या दोन्ही पर्यायांमध्ये फळे खाणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे. हेच कारण आहे की, डॉक्टर अनेकांना ज्यूसऐवजी ताजी फळे खाण्याची शिफारस करतात.

    मुंबई, 05 सप्टेंबर : तुमच्या समोर एकिकडे फळे (Fruits) आणि दुसरीकडे फळांचा रस (Fruit Juices) ठेवला आणि यापैंकी एक निवडण्यास सांगितले तर? बहुतेक लोकांचा कदाचित फळांचा रस घेण्याकडं कल दिसून येईल. मात्र, वास्तविक या दोन्ही पर्यायांमध्ये फळे खाणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे. हेच कारण आहे की, डॉक्टर अनेकांना ज्यूसऐवजी ताजी फळे खाण्याची शिफारस करतात. फळे खाणे हे फळाच्या रसापेक्षा अधिक आरोग्यदायी आणि फायदेशीर का आहे, हे जाणून घेऊयात. 1. फायबरचा अभाव मेयोक्लिनिकच्या मते, फायबर हा आपल्या शरीरासाठी एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. त्यामुळं आतड्यांची हालचाल बरोबर राहते आणि पोटही दीर्घकाळ भरून राहण्यास मदत होते. पण, जेव्हा आपण फळाऐवजी रस घेतो, तेव्हा फळातील सर्व फायबर फिल्टर होऊ निघून गेलेली असतात. 2. हाय कॅलरी सामान्यत: फळांमध्ये कॅलरीज कमी असतात, परंतु जेव्हा ते रस स्वरूपात घेतले जाते, तेव्हा कॅलरींची संख्या लक्षणीय वाढते. जर तुम्ही एक ग्लास रस प्यायला तर त्यात अनेक फळांचे रस असतात. जर तुम्ही पॅकबंद केलेला रस घेत असाल, तर त्यात साखर मिसळल्याने त्यात आणखी कॅलरीज वाढतात. हे वाचा - कृष्ण जन्माष्टमीला उपवास केला म्हणून शिक्षकाची विद्यार्थ्यांना बेदम मारहाण 3. साखरेचे प्रमाण जास्त जर तुम्ही पॅकबंद केलेला फळांचा रस घेत असाल तर ते फायद्याऐवजी तोटे अधिक असू शकतात. खरं तर, पॅक्ड केलेल्या फळांच्या रसांमध्ये फळांची चव जास्त असते आणि त्यात साखर घातली जाते. ज्यामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढू शकते. हे वाचा - हे पदार्थ उपवास काळात टाळाच; वाढेल अ‍ॅसिडिटी, होतील पोटाचे विकार 4. सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता पॅक्ड केलेल्या फळांच्या रसांना अनेक प्रक्रियांमधून जावं लागते. त्यातून व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी सारखी अनेक सूक्ष्म पोषक घटक बाहेर टाकली जातात. वरील सर्व कारणास्तव, निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात ज्युस ऐवजी फळांचा समावेश करणे फायद्याचे ठरते.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Fruit, Health Tips

    पुढील बातम्या