Home /News /heatlh /

Dengue Symptoms: पावसाळ्यात डेंग्यू तापाचे रुग्ण वाढताहेत; जाणून घ्या त्याची ही लक्षणं

Dengue Symptoms: पावसाळ्यात डेंग्यू तापाचे रुग्ण वाढताहेत; जाणून घ्या त्याची ही लक्षणं

जुलै ते ऑक्टोबर दरम्यान एडीस डासांची वेगाने पैदास होते. या दिवसात पावसाचे पाणी ज्या ठिकाणी साठते तिथे या डासांची पैदास होते. यामुळं उच्च ताप आणि तीव्र डोकेदुखी होते. योग्य वेळी उपचार न झाल्यास रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो.

    मुंबई, 10 सप्टेंबर: कोरोना महामारीमुळं अगोदर लोकांना अनेक संकटांना सामोरे जावं लागत आहे. या महामारीचा कहर अजून थांबलेला नाही. तर दुसरीकडे, असे अनेक आजार आहेत ज्यामध्येही ताप येतो आणि हे आजार गंभीर रूप धारण करू शकतात. डेंग्यू ताप हा त्यापैकी एक आहे. हा एक संसर्गजन्य रोग आहे जो एडीस डास चावल्याने पसरतो. या दिवसांत डेंग्यूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला आहे. पावसाळा आणि पावसाळ्यानंतरच्या काळात हा आजार वेगानं पसरतो. ऑल इंडिया रिसर्च इन्स्टिट्यूट (एम्स) च्या एका संशोधन पत्रानुसार, जुलै ते ऑक्टोबर दरम्यान एडीस डासांची वेगाने पैदास होते. या दिवसात पावसाचे पाणी ज्या ठिकाणी साठते तिथे या डासांची पैदास होते. यामुळं उच्च ताप आणि तीव्र डोकेदुखी होते. योग्य वेळी उपचार न झाल्यास रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो. 1996 मध्ये दिल्ली आणि आसपासच्या भागात डेंग्यू रोगाने साथीचे रूप धारण केलं होतं. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. एम्सच्या मते, डेंग्यू तापाचे तीन प्रकार आहेत. या तीन प्रकारांची लक्षणं जाणून घेणं महत्त्वाचं आहे. साध्या डेंग्यू तापाची लक्षणे आहेत- -थंडी वाजून अचानक उच्च ताप. -डोके, स्नायू आणि सांध्यात वेदना. -डोळ्यांच्या मागच्या बाजूला दुखणे, डोळे दाबून चोळल्यास किंवा हलवल्या जास्तच त्रास होतो. -अत्यंत अशक्तपणा, भूक न लागणे आणि मळमळ होणे. -तोंडाची चव जाणे. -घशात किंचित दुखणे. -रुग्णाला अत्यंत दुःखी आणि आजारी वाटणं. -शरीरावर लालसरपणा येणं. हे वाचा - गर्भवती महिलांना का पडतात टेन्शन वाढवणारी स्वप्नं? डेंग्यू रक्तस्रावी तापाची लक्षणे साध्या डेंग्यू तापाच्या लक्षणांसह यामध्ये नाक आणि हिरड्यांमधून रक्तस्त्राव होतो, शौच किंवा उलटीमध्ये रक्त येणे, त्वचेवर निळे-काळे डाग. डेंग्यू शॉक सिंड्रोमची लक्षणे वरील लक्षणांव्यतिरिक्त, रुग्ण अस्वस्थ होतो आणि ताप असूनही त्याची त्वचा थंड राहते. रुग्ण हळूहळू त्याच्या संवेदना गमावतो. रुग्णाची नाडी वेगवान आणि कमकुवत वाटते. रुग्णाचा रक्तदाबही कमी होऊ लागतो.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या