मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

Diabetes Cure Diet: अवघ्या काही दिवसांमध्ये Diabetes होईल कमी; या एका फळाचा आहे मोठा फायदा

Diabetes Cure Diet: अवघ्या काही दिवसांमध्ये Diabetes होईल कमी; या एका फळाचा आहे मोठा फायदा

रक्तातील साखर कमी करण्यासाठी महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील डॉक्टरांना फणस खूप प्रभावी असल्याचं आढळलं आहे. कच्च्या फणसाची भाजी आणि पिकल्यावर फळ म्हणून फणस खाल्ला जातो. हे दोन्ही प्रकार फायदेशीर आहेत.

रक्तातील साखर कमी करण्यासाठी महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील डॉक्टरांना फणस खूप प्रभावी असल्याचं आढळलं आहे. कच्च्या फणसाची भाजी आणि पिकल्यावर फळ म्हणून फणस खाल्ला जातो. हे दोन्ही प्रकार फायदेशीर आहेत.

रक्तातील साखर कमी करण्यासाठी महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील डॉक्टरांना फणस खूप प्रभावी असल्याचं आढळलं आहे. कच्च्या फणसाची भाजी आणि पिकल्यावर फळ म्हणून फणस खाल्ला जातो. हे दोन्ही प्रकार फायदेशीर आहेत.

  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 16 सप्टेंबर : गेल्या दोन वर्षात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. विशेषत: कोरोनामुळं दक्षिण भारतातील तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये मधुमेहाचे रुग्ण झपाट्यानं वाढले आहेत. केवळ वृद्धच नव्हे तर, मुलेही सहजपणे या आजाराला बळी पडत आहेत. रक्तातील वाढलेल्या साखरेमुळे रुग्णांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. मधुमेहाच्या (jackfruit in diet help lower diabetes) रुग्णांनी त्यांच्या आहाराकडे खूप लक्ष देणं आवश्यक आहे. रक्तातील साखर कमी करण्यासाठी महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील डॉक्टरांना फणस खूप प्रभावी असल्याचं आढळलं आहे. कच्च्या फणसाची भाजी आणि पिकल्यावर फळ म्हणून फणस खाल्ला जातो. हे दोन्ही प्रकार फायदेशीर आहेत. आंतरराष्ट्रीय नियतकालिक 'नेचर' मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, फणसामुळं मधुमेह अतिशय प्रभावीपणे नियंत्रित होतो. पुण्याच्या चेलाराम मधुमेह संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एजी उन्नीकृष्णन आणि श्रीकाकुलम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सामान्य वैद्यकशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. गोपाल राव यांनीही यावर संशोधन केलं आहे. हे वाचा - Alert राहा: पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये वेगळी दिसतात Pre Diabetes ची लक्षणं अभ्यासात असे आढळून आले आहे की, फणसाचं पीठ सात दिवसात रक्तातील ग्लुकोज कमी करते. डॉ राव यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं की, 'अमेरिकन डायबेटीस असोसिएशननं केलेल्या अभ्यासाचे निकाल मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरू शकतात. विशेषतः भारतात हे अधिक महत्त्वाचं आहे. कारण, इथं खाण्यापिण्याचे अनेक पर्याय आहेत. संशोधनासाठी, आम्ही टाइप -2 मधुमेह असलेल्या 40 रुग्णांच्या आहारात तांदूळ आणि गव्हाऐवजी फणसाचं पीठ दिलं. डॉ राव म्हणाले, 'आम्ही रूग्णांना तीन महिन्यांसाठी 30 ग्रॅम फणसाची पावडर दिली. तीन महिन्यांनंतर, त्यांच्या रक्तातील फास्टिंग ब्लड शुगर, पोस्टप्रांडियल ब्लड ग्लूकोज आणि HbA1c चे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाल्याचं आढळलं. याशिवाय या रुग्णांचं वजनही कमी झालं होतं. हे वाचा - Diabetes असेल 'तर या' तिन पांढऱ्या गोष्टींपासून रहा दूर तथापि, पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारतीयांमध्ये मधुमेहाचा वेगळा प्रकार दिसून येतो. इथं मधुमेहाचे 30 टक्क्यांहून अधिक रुग्ण लठ्ठपणाच्या श्रेणीत येत नाहीत. अभ्यासानुसार, फणसाचं पीठ रक्तातील साखर कमी करतं. तसंच ग्लायसेमिक नियंत्रण सुधारते. फणसाचं पीठ कसं तयार करावं? (how to make jackfruit flour at home) फणसाचं पीठ तयार करण्यासाठी, प्रथम त्याच्या बिया चांगल्या वाळवा. कोरडे झाल्यावर त्याची वरची साल पूर्णपणे काढून टाका. यानंतर, या बिया कापून बारीक करा. आपण दररोज 30 ग्रॅम फणसाचं पीठ रोजच्या पिठात मिसळून खाऊ शकता. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची हमी देत नाही. हे उपाय लागू करण्यापूर्वी कृपया संबंधित तज्ञांशी संपर्क साधा.)
First published:

Tags: Diabetes, Tips for diabetes

पुढील बातम्या