मराठी बातम्या /बातम्या /heatlh /

अॅसिडिटीला 'छू मंतर' करणं अवघड नाही; खाण्या-पिण्याचे हे साधे नियम फक्त पाळा

अॅसिडिटीला 'छू मंतर' करणं अवघड नाही; खाण्या-पिण्याचे हे साधे नियम फक्त पाळा

आपली जीवनशैली आणि खाण्याच्या सवयीमध्ये थोडी सुधारणा करून आपण अॅसिडिटीच्या समस्येपासून मुक्त होऊ शकतो. जर आम्लपित्ताची समस्या फार गंभीर नसेल, तर घरगुती उपायांनीही ते बरे होऊ शकते.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 30 सप्टेंबर : आपल्या खाण्याच्या सवयी, जास्त खाणे, झोपेमध्ये अनियमितता, या सर्व कारणांमुळे पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. आपली जीवनशैली आणि खाण्याच्या सवयीमध्ये थोडी सुधारणा करून आपण अॅसिडिटीच्या समस्येपासून मुक्त होऊ शकतो. जर आम्लपित्ताची समस्या फार गंभीर नसेल, तर घरगुती उपायांनीही ते बरे होऊ शकते. आयुर्वेदाचार्य आणि पोषणतज्ज्ञ जूही कपूर यांनी अशा काही आरोग्यविषयक टिप्स सुचवल्या आहेत, ज्या आपण अॅसिडिटीच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी वापरू शकतो. त्या म्हणतात की, “बहुतेक प्रकरणांमध्ये अॅसिडिटीचे कारण वाईट जीवनशैली आहे. जर आपण उशीरा झोपलो, वेळेवर जेवत नसू किंवा जास्त खाल्ले असेल तर आपण अॅसिडिटीच्या समस्येचे शिकार होऊ शकतो.

माहितीनुसार, जठरासंबंधी ग्रंथींमध्ये अॅसिडचा जास्त प्रमाणात स्राव झाल्यामुळे अॅसिडिटी होते. ज्याचे मुख्य कारण अत्यंत मसालेदार अन्न खाणे किंवा दोन जेवणांमधील दीर्घ अंतर राहणे.

हे वाचा - भारीच! Pizza Lovers साठी जबरदस्त नोकरी, पिझ्झा खाण्यासाठी मिळणार तब्बल 5 लाख रुपये

केळी

आपल्या दिवसाची सुरुवात केळीने करा, ज्यामुळे तुमच्या अॅसिडिटीची समस्या अर्धी कमी होऊन जाईल.

तुळशीच्या बिया

खरंतर याची सवय लावायला हरकत नाही. एक ग्लास पाण्यात भिजवलेल्या तुळशीच्या बियांचे किमान 2 चमचे घ्या. तुळशीच्या बिया नैसर्गिकरित्या थंड असतात आणि अॅसिडिटी समस्या कमी करण्यास मदत करतात. जुही कपूर म्हणते की मासिक पाळी दरम्यान आणि सर्दी / खोकला असताना त्याचा वापर टाळा.

नारळ पाणी - सकाळी 11 वाजता एक ग्लास नारळ पाणी पिल्याने अॅसिडिटीची समस्या कमी होते.

हे वाचा - Shiv Sena vs NCP: भाजीपाला विकणारे Bhujbal 25 वर्षांत 25 हजार कोटींचे मालक कसे झाले? आमदार Suhas Kande यांचा सवाल

जीवनशैलीतील काही बदल जे आंबटपणा कमी करण्यास मदत करतात.

- खूप भरपूर आहार न घेणे आणि नियमित वेळेत जेवण करणे

- जास्त प्रथिने खाणे टाळा

-  दर आठवड्यात फक्त 2 ते 3 वेळा मांसाहार खा, यापेक्षा जास्त नाही.

- प्रत्येक जेवणानंतर किमान 100 पावले तरी चाला.

- वज्रासनामध्ये बसण्याचा प्रयत्न करा

- सकारात्मक विचार करा, आनंदाच्या वातावरणात जगा

First published:

Tags: Health, Health Tips