मराठी बातम्या /बातम्या /heatlh /छोट्या-छोट्या गोष्टी तुम्ही विसरून जात आहात का? स्मरणशक्ती तरबेज करतील हे उपाय

छोट्या-छोट्या गोष्टी तुम्ही विसरून जात आहात का? स्मरणशक्ती तरबेज करतील हे उपाय

आपण स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काही उपाय करू (How To Improve Your Memory Power) शकतो. जर तुम्ही तुमच्या मनाच्या आरोग्यासाठी दररोज काही मिनिटं काढलीत, तर तुम्हाला विसरण्याच्या समस्येपासून सुटका मिळू शकते.

आपण स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काही उपाय करू (How To Improve Your Memory Power) शकतो. जर तुम्ही तुमच्या मनाच्या आरोग्यासाठी दररोज काही मिनिटं काढलीत, तर तुम्हाला विसरण्याच्या समस्येपासून सुटका मिळू शकते.

आपण स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काही उपाय करू (How To Improve Your Memory Power) शकतो. जर तुम्ही तुमच्या मनाच्या आरोग्यासाठी दररोज काही मिनिटं काढलीत, तर तुम्हाला विसरण्याच्या समस्येपासून सुटका मिळू शकते.

नवी दिल्ली, 28 सप्टेंबर : बऱ्याच वेळा आपण कुठेतरी काहीतरी ठेवून देतो आणि नंतर लाख प्रयत्न करूनही ती गोष्ट सापडत नाही, कुठे ठेवली ते आठवत नाही. असं अनेकांच्या बाबतीत होत असतं. पण, वारंवार आपल्याबाबतीत असं घडू लागल्यास मग आपल्याला काळजी वाटू लागते. अशा परिस्थितीत चिडचिड होणं सामान्य आहे. आपण स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काही उपाय करू (How To Improve Your Memory Power) शकतो. जर तुम्ही तुमच्या मनाच्या आरोग्यासाठी दररोज काही मिनिटं काढलीत, तर तुम्हाला विसरण्याच्या समस्येपासून सुटका मिळू शकते. शिवाय तुम्ही बऱ्याच काळासाठी अनेक गोष्टी लक्षात ठेवू शकाल.

वयोमानानुसार शारीरिक आणि मानसिक आरोग्य (Mental Health) कमी होत जातं. अशा परिस्थितीत व्यायाम तुम्हाला निरोगी राहण्यास मदत करतो. एनडीटीव्ही हेल्थच्या बातमीनुसार, संशोधनात असं दिसून आलंय की, असे अनेक उपक्रम आहेत, ज्यांच्या मदतीनं तुम्ही तुमची मानसिक जागरूकता सुधारू शकता. तुमची स्मरणशक्ती, एकाग्रता आणि लक्षात ठेवण्याची क्षमताही सुधारू शकते.

1. कोडे खेळ

संशोधनात असे आढळून आलंय की, दररोज जिगसॉ पझल खेळणं तुम्हाला अनेक संज्ञानात्मक क्षमता वाढवण्यास मदत करतं. हे तुमच्या मेंदूला आव्हान देतं आणि मानसिक व्यायाम करण्यास मदत करतं. हा एक सोपा आणि मजेदार मार्ग असू शकतो.

2. पत्ते खेळणं

प्रौढांसाठी मानसिक उत्तेजक क्रियाकलापांवर केलेल्या संशोधनात असं आढळून आलंय पत्त्यांचे वेगानं खेळले जाणारे खेळ मेंदूच्या अनेक क्षेत्रांमध्ये सुधारणा करू शकतात. या संशोधनात असंही आढळलंय की कार्ड गेमसह स्मृती आणि विचार करण्याची क्षमताही मोठ्या प्रमाणात सुधारली जाऊ शकते.

हे वाचा - उलटी झालेली रिक्षा कशीबशी सरळ केली, पण पुढं असं झालेलं पाहुन लोकांना हसावं का धावावं कळेना

3. शब्दसंग्रह वाढवण्याचे खेळ

संशोधनात असं आढळून आलंय की, तुम्ही शब्दसंग्रह वाढवण्याचे धडे घेतले तर, त्याचा तुमच्या मेंदूला खूप फायदा होतो. वास्तविक, शब्दसंग्रह वाढवण्यासाठी आणि नवे शब्द तयार करण्यासाठी मेंदूच्या अनेक भागांचा वापर होत असतो. विशेषतः पाहणं आणि ऐकणं या प्रक्रियेसाठी आवश्यक आहे. अशा स्थितीत, वाचताना एक वही तुमच्याकडे ठेवली आणि नवीन शब्द त्यात लिहून ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करता येईल. हा नवीन शब्द सतत 5 दिवस वापरा. हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं.

4. नृत्य करणंही फायदेशीर

अनेक संशोधनांमध्ये असं आढळून आलंय की नृत्य आपल्या मेंदूची चलन गती आणि स्मरणशक्ती वाढवण्याचं काम करतं. अशा परिस्थितीत तुम्ही साल्सा, टॅप, हिप-हॉप, झुम्बा आदी नृत्य करू शकता.

हे वाचा - Changes from 1 October 2021: 1 ऑक्टोबरपासून बदलणार महत्त्वाचे आर्थिक बदल, LPG ते ऑटो डेबिटचे नियम बदलणार

5. सर्व इंद्रियांचा वापर करा

एका संशोधनानुसार, चांगल्या स्मृतीसाठी आपण आपल्या सर्व इंद्रियांचा वापर करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, एकाच वेळी वास, स्पर्श, चव, पाहणं आणि ऐकणं यावर लक्ष केंद्रित करा. असं केल्यानं तुमची स्मरणशक्ती झपाट्यानं सुधारू शकते.

First published:
top videos

    Tags: Health Tips, Mental health