Red Ladyfinger : लाल भेंडीला बाजारात का आहे इतकी मागणी; चौपट मिळतोय जास्त दर

Red Ladyfinger : लाल भेंडीला बाजारात का आहे इतकी मागणी; चौपट मिळतोय जास्त दर

लाल भेंडीमध्ये हृदयरोग, लठ्ठपणा आणि मधुमेह नियंत्रित करण्याची क्षमता असते. याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल रोखण्यास मदत होते. त्यातील 94 टक्के पॉली अनसॅच्युरेटेड फॅट खराब कोलेस्ट्रॉल कमी करते.

  • Share this:

नवी दिल्ली, 02 नोव्हेंबर : कृषी तज्ज्ञांच्या मते, लाल भेंडी (Red Ladyfinger) ही आरोग्याचा खजिना आहे. लाल भेंडीमध्ये हृदयरोग, लठ्ठपणा आणि मधुमेह नियंत्रित करण्याची क्षमता असते. याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल रोखण्यास मदत होते. त्यातील 94 टक्के पॉली अनसॅच्युरेटेड फॅट खराब कोलेस्ट्रॉल कमी करते. तसेच त्यातील 66 टक्के सोडियम उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त आहे. यामध्ये असलेले 21 टक्के आयर्न अॅनिमिया आणि अॅनिमियाशी संबंधित इतर आजार बरे करते. तसेच, 5 टक्के प्रथिने शरीरातील चयापचय प्रणाली चांगल्या स्थितीत (Health benefits Red Ladyfinger) ठेवतात.

आचार्य नरेंद्र देव कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ कुमारगंज, अयोध्याचे कुलगुरू डॉ. बिजेंद्र सिंह यांनी लाल भेंडीचे (Red Ladyfinger) वर्णन औषधी भाजी म्हणून केले आहे. भाजीपाला पीक संशोधनात डॉ.बिजेंद्र सिंह यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी भाजीपाल्याच्या एकूण 56 प्रजाती विकसित केल्या आहेत. यापैकी भेंडीच्या सर्वात जास्त 15 प्रजाती आहेत.

भेंडीच्या पाच संकरित प्रजाती विकसित केल्यानं डॉ. सिंह हे पहिल्यांदा प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यांनी सांगितले की, लाल रंगाची भेंडी खायला स्वादिष्ट आहे. यासोबतच लाल रंगामुळे तिच्यात अँथोसायनिन आढळते. या कारणामुळेच तिचे मूल्य वाढते.

हे वाचा - कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा अखेर काँग्रेसला राम-राम; नवीन पक्षाचे नावही केलं जाहीर

साखरेची पातळी नियंत्रणात राहते

त्यांनी सांगितले की, चवीला ही भेंडी हिरव्या भेंडीसारखीच आहे. यात लाल, हिरवी, काळी सर्व पोषक घटक आढळतात. या भेंडीमध्ये वेगळे जीन टाकल्यामुळे तिचा रंग लाल झाला. यात क्रूड फायबर असते. त्यामुळे साखरेची पातळी नियंत्रणात राहते. या भाजीमध्ये बायकॉम्प्लेक्सही मोठ्या प्रमाणात आहे.

हे वाचा - Fraud Alert! Online Shopping करताना अशी होऊ शकते फसवणूक; या गोष्टी लक्षात ठेवाच

बाजारात 3-5 पट जास्त किंमत

अलिकडे उत्तर प्रदेशमध्ये लाल भेंडीचे अनेक ठिकाणी शेतकरी पीक घेत आहेत. हातरसचे शेतकरी मनोज कुशवाह यांच्या मते, लाल भेंडी दिसायला वेगळ्या प्रकारची आहे. लाल भेंडीला हिरव्या भेंडीपेक्षा सुमारे 3 ते 5 पट जास्त किंमत मिळते. घाऊक बाजारात हिरवी भेंडी 12 ते 15 रुपये किलोने विकली जात असेल, तर लाल भेंडी 45 ते 80 रुपये किलो दराने विकली जाते. शेतकर्‍यांच्या मते, लाल भेंडी पेरणीसाठी फेब्रुवारी ते एप्रिलचा दुसरा आठवडा हा उत्तम काळ आहे. मात्र, नोव्हेंबरमध्येही पेरणी करता येते. डिसेंबर-जानेवारीमध्ये त्याचे पीक घेणं कठीण आहे.

Published by: News18 Desk
First published: November 2, 2021, 8:53 PM IST

ताज्या बातम्या